मुख्य सामग्रीवर वगळा

दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा

         दुर्वांची  जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा

दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथाकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी

“भक्तीत दडलीय अमोल शक्ती,
नको मनात कुशंका नस्ती।
लीन हो बाप्पा चरणी,

परमानंद होईल अंतःकरणी॥ 

दुर्वांची  जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा

गणपती बाप्पाच्या २१ दुर्वांचे महत्त्व

दुर्वांची एक साधी जुडीही श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचे प्रतीक असते. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या दुर्वांमागे धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते दडलेले आहे. 'दुर्वांची जुडी' ही कथा या साध्या वाटणाऱ्या दुर्वांभोवती विणलेल्या भावना, आठवणी आणि जीवनमूल्यांचा सुंदर वेध घेते. श्रद्धा, संस्कार आणि माणुसकीचा संदेश देणारी ही मराठी कथा प्रत्येक वाचकाच्या मनाला स्पर्श करून जाईल.
श्रीगजाननाला, गणेशाला आपल्या प्रिय बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय मानल्या जातात. गणेशाच्या पूजेच्या आधी 21 निवडलेल्या दुर्वा वाहूनच त्याची पूजा सुरू होते.ही साधी दिसणारी गवताची वनस्पती असली तरी हिंदू धर्मातील परंपरेत तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.ती पावित्र्य, साधेपणा आणि चिरंतन जीवनाचे द्योतक मानले जाते. दुर्वा सहज उगवते, तुडवली गेली तरी पुन्हा तितक्याच जोमाने वाढते.  संकटांवर मात करण्याचा आणि त्यातून परत नव्याने जीवन उभे प्रेरणा मानवाला दुर्वा देते.दुर्वा निवडून भक्तांच्या श्रद्धेनुसार, गणेशाला अर्पण केलेल्या दुर्वा या केवळ गवताच्या काड्या राहत नाहीत, तर त्या भक्ताच्या विश्वासाचे आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक बनतात.

हिंदू पुराणात अशी कथा सांगितली जाते की  ‘अनलासुर’ या उग्र असुराचा संहार करण्यासाठी श्रीगणेशाने त्याला गिळून टाकले. त्यामुळे गणपती बाप्पाच्या शरीरात प्रचंड दहाग्नी निर्माण झाला. अनेक उपाय करूनही तो दाह कमी झाला नाही. शेवटी ऋषी-मुनींनी गणपतीला २१ दुर्वा अर्पण केल्या. त्या दुर्वांच्या स्पर्शाने त्यांचा दाह शांत झाला. तेव्हापासून दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय मानल्या जातात, अशी श्रद्धा आहे.

परंपरेनुसार बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे. २१ या संख्येबद्दल विविध धार्मिक मते आढळतात. काहींच्या मते ती पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा यांचे प्रतीक मानली जाते. तर काही ठिकाणी हा केवळ प्राचीन पूजाविधीचा भाग असल्याचे सांगितले जाते. कोणतेही मत मानले तरी त्यामागचा मुख्य हेतू श्रद्धा आणि एकाग्रतेने केलेली उपासना हाच आहे.
मी या धार्मिक अर्थांचा अभ्यासक नाही. पण अनेक वर्षे अथर्वशीर्ष पठण करताना आणि गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करताना एक गोष्ट मात्र अनुभवली आहे.मनाला एक वेगळी शांतता लाभते. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते आणि संकटाच्या वेळी मन अधिक स्थिर राहते. कदाचित हीच भक्तीची खरी शक्ती असावी.
  तुम्ही कधी विचार केला आहे का,एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी खरंच इतकी शक्तिशाली असू शकते?आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो,पण त्या मागचं गूढ आणि भक्तीत दडलेली शक्तीआपल्याला खरंच माहिती आहे का?ही कथा आहे .
श्रद्धेची, भक्तीची आणि एका साध्या दुर्वाच्या जुडीमधून प्रकट झालेल्या चमत्कारिक शक्तीची…

दुर्वाची जुडी - भक्तीतील अद्भुत शक्ती


         मी तसा दिवस भर देव देव करणारा व्यक्ती नाही. परंतु “देव सर्वत्र आहे” ही भावना माझ्या मनात कायम आहे. माझ्या परिवाराची पारंपारिक श्री दत्त उपासना माझ्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. इतर देवांची पूजा करणे हे मला कधीही चुकीचे वाटले नाही कारण इतर देवांचा सुद्धा मी भक्त आहे.
      माझ्या देव्हाऱ्यात अनेक देव आहेत आणि रोज सकाळची सुरुवात सर्व देवांची मनोभावे पूजा करूनच होते. शनिवारी हनुमंताचे दर्शन, गुरुवारी स्वामी समर्थ मठ भेट, आणि रोज स्वामी चरित्र वाचन,हा माझा भक्ती परिपाठ आहे, परंतु या सर्वांमध्ये एक गोष्ट अशी आहे. जी माझ्या दिवसाचा अविभाज्य भाग बनली आहे.
   अथर्वशीर्ष पठण आणि गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करणे.२१ दुर्वांचे महत्त्व दररोज २१ दुर्वा अर्पण करण्याची सवय कधी लागली हे मला कळलेच नाही, पण अनेक वर्षांपासून हा नित्यक्रम अखंड सुरू आहे. 
         प्रवासात असलो तरी दुर्वा उपलब्ध नसतील तर २१ अक्षता अर्पण करतो. माझा दृढ विश्वास आहे की देवाला दिखाऊ भक्ती नको, तर मनापासून केलेली साधी मनोभावे पुजा अधिक प्रिय असते.
संकटातून मिळालेला अनुभव
   माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली, पण प्रत्येक वेळी काहीतरी अदृश्य दैवी शक्तीने मला वाचवले असे वाटते.एक प्रसंग आजही मनात कोरलेला आहे..
   माझी मुलगी नववीत शिकत असताना, मी तिला बाईक वरून घरी आणत होतो. अचानक एका अरुंद रस्त्यावर ओव्हरटेक करताना समोरून वेगात ॲम्ब्युलन्स आली. ब्रेक लावताना बाईक घसरली आणि अपघात झाला. माझी मुलगी बसच्या चाकांच्या मधोमध पडली. त्याक्षणी जर थोडा वेळ पुढे-मागे झाला असता, तर मोठा अनर्थ झाला असता, परंतु माझे नशीब आणि ईश्वरी कृपेने, बस ड्रायव्हरने सुद्धा त्याच क्षणी ब्रेक लावला आणि माझी मुलगी सुरक्षित वाचली.
   आजही मला असे वाटते की, त्या दुर्वांच्या जुडीने संकट स्वतःवर घेतले आणि माझ्या मुलीचे प्राण वाचवले, कारण त्यादिवशी गणपती बाप्पाला वहावयाच्या दुर्वा संपल्याने  विकत घेतलेली एक दुर्वाची  जुडी शर्टाच्या खिशात होती. 
    अपघातात नेमकी ती उडून बसच्या मागच्या टायर खाली आली, हा फक्त योगायोग नव्हता, तर भक्तीची शक्ती होती.असे मला अजून सुद्धा वाटत आहे.

निष्कर्ष
     नास्तिक लोक विचारतात की देव कुठे आहे?परंतु जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा मनोमन जाणवते,देव आहे आणि तो आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा आहे.

वरील लेखातील प्रसंग हा माझ्या आयुष्यातील एक वैयक्तिक अनुभव आहे. काही जण याला निव्वळ योगायोग म्हणतील, तर काही दैवी कृपा मानतील. परंतु माझ्यासाठी मात्र त्या दिवशी ती श्रीगणरायाच्या कृपेची जाणीव होती. श्रद्धेचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असू शकतो पण मनापासून केलेली भक्ती माणसाला संकटाच्या प्रसंगी धैर्य, संयम आणि आशा नक्कीच देते.

    
मनाचा की मार्गाचा,जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? या बाबतचा अनुभव पुढील लेखात प्रचिती देऊन जाईल 

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा

पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.

तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा


SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved

🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

(ओमकार शिवलकर )






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook📌 Pinterest वर फॉलो करा

टिप्पण्या

  1. Great post! I love how you’ve broken things down—it makes it much easier for readers to connect. Keep up the amazing work

    उत्तर द्याहटवा
  2. गणपती बाप्पा मोरया. सुरेख उपक्रम असून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद ! सुंदर अभिप्राय कायम !!

    उत्तर द्याहटवा
  4. प्रत्युत्तरे
    1. आपले अभिप्राय उत्साहवर्धक आहेत

      हटवा
    2. धन्यवाद ! आपले अभिप्राय प्रार्थनीय आहेत !!

      हटवा
    3. खूप सुंदर, हृदयस्पर्शी कथा. भक्ती मध्येच शक्ती यांची प्रचिती होते.

      हटवा
  5. खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव 🙏✨
    दुर्वांच्या साध्या जुडीमागे इतकी गाढ श्रद्धा आणि दैवी शक्ती दडलेली असते, हे तुमच्या कथेतून प्रकर्षाने जाणवतं.
    अशा अनुभवांमुळेच “भक्तीत खरी शक्ती असते” यावर अधिक विश्वास बसतो.
    मनापासून नमस्कार आणि पुढील लेखाची उत्सुकता आहे

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय श्रद्धापूर्ण आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव 🙏✨
    साध्या दुर्वेमागे दडलेली भक्तीची शक्ती इतक्या सुंदरपणे उलगडली आहे की वाचताना अंगावर शहारे येतात.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा