माझे वाचनालय | मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, गिरगाव शाखेच्या अविस्मरणीय आठवणी
कालोघात तिची होतेय क्षती l
'वाचेल तो वाचेल' म्हणण्याचे दिवस गेले
वाचन करणारे लोक सुद्धा आता कमी झाले l
वाचन तर आता डोळ्यांपुढून सरते
लिखाण फक्त आता कामापुरते उरते l
डिजिटल युगात पुस्तके फक्त धूळ खातील
ग्रंथसंग्रहालये ही वस्तू संग्रहालये म्हणून भविष्यात दाखविली जातील l

🔗 "अल्लड प्रेम| बालपणीच्या निरागस प्रेमाची हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा"
मागील लघु कथा ही एक सुंदर मराठी प्रेमकथा आहे. जी बालपणातील निरागस, नादान आणि मनात कायम राहणाऱ्या प्रेमाच्या आठवणींवर आधारित आहे. ' निमिष ' आणि 'रेवती ' यांच्या शाळेतील अल्लड प्रेमाची ही गोष्ट, आपल्याला त्या निष्पाप दिवसांची आठवण करून देते. वेळ बदलते, आयुष्य पुढे पुढे जात राहते, पण बालपणातील त्या कोवळ्या भावना मात्र कायम मनात जपलेल्या राहतात.
' माझे वाचनालय '- एक आठवण !
माझ्या आयुष्यातील तीन टप्पे बालपण,कुमारपण आणि तारुण्य खूप मोठा भाग मी मराठी ग्रंथ संग्रहालय, गिरगाव शाखेमध्ये व्यतीत केलेला आहे. तिथे जे अनुभवले जे काही शिकलो ते अवर्णनीय आहे. आयुष्यात आनंद, उत्साह आणि जगण्याची खरी मजा देणारी जी काही माणसे, घटना, विचार आणि संस्था आपल्याला भेटतात, त्यामध्ये ' माझे वाचनालय ' मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय गिरगाव शाखा ,अग्रस्थानी आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, गिरगाव शाखा हे केवळ पुस्तकांचे ठिकाण नसून अनेक पिढ्यांसाठी ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व घडवणारे प्रेरणास्थान राहिले आहे. माझ्या बालपणापासून तारुण्यापर्यंतचा मोठा काळ या वाचनालयात गेला. पुस्तकांचा सहवास, अभ्यासाचे वातावरण, जपलेली मैत्री आणि आयुष्याला नवी दिशा देणारे अनुभव यांची ही भावनिक आठवण आहे. वाचनाची आवड आणि ग्रंथालय संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा लेख प्रेरणादायी ठरेल.
मी ‘ लोकसत्ता ‘ दैनिक वाचत असताना, त्यात बातमी वाचली की माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,माजी केंद्रीय कृषी मंत्री, आणि विद्यमान खासदार मा.श्री.शरद पवार यांची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड. ते सलग 30 वर्षापेक्षा अधिक त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ती बातमी वाचताच माझ्या डोळ्या समोर उभे राहिले ‘मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाकूरद्वार, गिरगाव' या माझ्या वाचनालयाचे ते दिवस..
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे एक सार्वजनिक ग्रंथालय असून ते भारतातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे. त्याची स्थापना दिनांक १ ऑगस्ट १८९८ मध्ये झाली. देशात सव्वाशे वर्ष पूर्ण करणाऱ्या म्हणजे “शतकोत्तर रौप्य महोत्सव’ साजरा करणाऱ्या ग्रंथ संग्रहालयात याची गणना होते.येथे जवळपास साडे सहा लाखांपेक्षा जास्त मराठी पुस्तकांचा संग्रह आहे, ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ आणि ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‘या मान्यवरा सह विविध नामवंत व्यक्ती आणि मराठी विद्वानांनी या ग्रंथालयाचा वापर केला होता . माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने याला ‘विशेष संग्रहालय ‘म्हणून घोषित केलेले आहे.
मुंबई आणि पुणे भागात यांचे कार्यक्षेत्र आहे.मुंबईत 29 तर पुण्यात 4 शाखा आहेत.बृहन्मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र शासना कडून त्यांना वेळोवेळी अनुदान प्राप्त होत असते. महाराष्ट्रात मोठा पसारा आणि बहुआयामी कार्य असणारे हे ग्रंथसंग्रहालय आहे.मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती या क्षेत्रात सुद्धा यांची कामगिरी दमदार आहे.विशेष म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे स्वतःच्या शाखांसोबत मुंबई महानगर पालिकेची ग्रंथसंग्रहालये सुद्धा चालवित असते. तसेच ग्रंथालयाच्या अनेक शाखांमधून वाचनालये तसेच अभ्यासिका केंद्र सुद्धा चालविले जाते. अनेक साहित्यिक,लेखक,प्राध्यापक, शिक्षक,पत्रकार,विद्यार्थी यांच्या सह, सामान्य वाचक सुद्धा त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडला गेलेला आहे.
गिरगावातील ठाकूरद्वार येथील भाई जीवनजी लेन मध्ये यांची गिरगाव शाखा आहे. स.का. पाटील उद्यानाच्या समोर उत्तर पूर्व भागात असलेल्या एका इमारती मध्ये ती स्थित आहे.गिरगावची जेव्हढी वैशिष्ट्ये आहेत. त्या मध्ये मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धित करणाऱ्या संस्था मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,गिरगाव शाखेचा आवर्जून उल्लेख व्हायलाच हवा,गिरगावातील बहुतेक व्यक्तींचा या संस्थेशी कोणत्या नाही, कोणत्या कारणाने संबंध आलेला आहे. माझा तर या संस्थेशी बालपणापासून संबंध आलेला आहे. मराठी भाषेचा माझा हा विकास हा शाळा, परिसर, परिवार यांच्या सोबत या संस्थेने सुद्धा केलेला आहे.
माझ्या नवनिर्मित ‘शब्दांची मुसाफिरी’ या मराठी लघुकथा ब्लॉग मध्ये या संस्थेच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करून त्यांची महती सर्वदूर वाचकां पर्यंत पोहचवावी तसेच आमची वैचारिक जडणघडण यांच्या मुळे कशी तयार झाली ? हे कमी कमी शब्दात, जास्तीत जास्त सांगण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे
जपानी गार्डन हे आमच्या बालपणाचे पहिले कार्यक्षेत्र होते,तर कुमार वयात पदार्पण करता करता ते मागे पडले आणि पुढचे पर्व सुरू झाले ते या ग्रंथसंग्रहालयातील गिरगाव शाखेत.शाळा सुटली की घरी जाऊन ताजेतवाने होऊन मी पहिला या संग्रहालयातील वाचनालयात जायचो, वाचनालय एकदम प्रशस्त आणि हवेशीर होते. अरबी समुद्राचे वारे गिरगाव चौपाटीवरून थेट या वाचनालयातच शिरतात का ? असे मला नेहमी वाटायचे, कानाजवळ ‘पेडेस्टल फॅन’ लावल्या सारखे वाटायचे, तेथील वातावरण हवेशीर ,मोकळे आणि आल्हाददायक होते .कोणताही प्रकाराच्या ‘ दुर्गंधी ‘ ला तिथे थारा नव्हता.रीडिंग बेंचेच,खुर्च्या,बुक शेल्फ,फरसबंदी एकदम स्वच्छ आणि चकाचक असायची. धुळीला कुठेच वाव नव्हता. पुस्तक विभागातून जुनी पुस्तके काढली तरी त्यात धूळ दिसणार नाही .जर कुणाला एखाद्या जागेचे,वास्तूचे,संस्थेचे सुविधा परीक्षण करून जर त्या संस्थेला पुरस्कृत करायचे असेल तर त्यांनी पहिली सुरुवात त्या संस्थेच्या 'टॉयलेट ' पासून करावी, हे मी त्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीं सुचवू इच्छितो.हा निकष जर विचारात घेतला तर या संग्रहालयाच्या गिरगाव शाखेला मी मनापासून वरचा क्रमांक देईन.कधीही टॉयलेट जा. ते एकदम स्वच्छ असायचे. ' स्वच्छता म्हणजे पावित्र्य ' असे मी समजतो.अशा जागेत रविवार सोडला तर दिवसाचे 3-4 तास माझे सहज व्यतीत व्हायचे.मी त्या लायब्ररीत लहानपणा पासून जात असल्याने, तुम्ही सभासद आहात का ? हा प्रश्न त्यांनी कधीच मला विचारला नाही.सुरुवातीला मी सभासद नव्हतो.इयत्ता नववीत गेल्या नंतर मी पुस्तक शाखेचा सभासद झालो.संग्रहालयातील वाचनालयात मी मासिके, पाक्षिके,नियत कालिके, वाचायला रोज जात असे. आणि जाताना कधी कधी पुस्तक विभागातून आवडीचे पुस्तक घेऊन जायचो.
किशोर,चंपक,चांदोबा, किलबिल,बालहंस या व अशा बाल मासिकांसह, रसरंग,साधना.पांचजन्य,दक्षता,स्त्री,मार्मिक,मनोहर,माहेर,विवेक,मेनका, जत्रा.लोकराज्य, गृहशोभा, किर्लोस्कर हे व असे अंक तिथे उपलब्ध असायचे.जुने वृत्तपत्र शोधायचे असतील तर खात्रीचे ठिकाण म्हणजे 'माझे वाचनालय ' खूप जुनी वृत्तपत्रे मी त्यात शोधली आहेत.जुन्या दैनिकांच्या मोठ्या नस्त्या शोधताना कुणाला तिकडे शिंकताना मी कधी पाहिलेले नाही. एवढी त्या जुन्या अभिलेख कक्षाची सुद्धा सफाई असायची. दरवर्षी दिवाळी सुरू झाल्याची पहिली चाहूल आम्हाला या वाचनालयात लागायची. घरी दिवाळीचा फराळ बनवायची सुरुवात आणि वाचनालयात दिवाळी अंक येण्याची सुरुवात झाली की खऱ्या अर्थाने मला दिवाळीची चाहूल लागायची. वाचनालयात दिवाळी अंक वाचायला आगंतुक वाचकांची जास्त गर्दी व्हायची. त्या मुळे आमच्या सारख्या नियमित वाचकांना कधी कधी दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळायचे नाहीत,मग ते अंक दिवाळी संपल्यावर शांतपणे वाचले जायचे. या वर उपाय म्हणजे लायब्ररीत लवकर जाऊन हवा असलेला तो अंक अधाशीपणे वाचून काढायचो. अंक वाचायला नंबर लागायचे, वाचताना हळूच कुणी जर हाताला स्पर्श केला की समजायचे की मी वाचत असलेल्या अंकासाठी यांना नंबर लावायचा असणार. कुणाला कशात तर कुणाला कशात आनंद होईल हे सांगणे फार मुश्किल आहे. मला मात्र जुना अंक बदलून नवीन अंक लावला जात असताना मनोमन आनंद व्हायचा.ज्या मासिकांची शेवटची तारीख असेल, बरोबर दुसऱ्या दिवशीच, त्या मासिकाच्या त्या पुठ्ठा कव्हर मध्ये, त्या मासिकाचा नवीन अंक असायचा.क्वचित प्रसंगी त्यांना सांगावे लागायचे की अमुक मासिकाच्या अंकाची मुदत संपली आहे. कृपया नवीन अंक लावा. जर तो अंकच उशिराने प्रकाशित होत असेल तरच तसे व्हायचे,अन्यथा नाही. वाचन गृहात पुरेशी प्रकाश योजना आणि खिडक्या बंद केल्यावर,हवा खेळती राहील एवढे फॅन होते,स्वछ पिण्याचे पाणी उपलब्ध असायचे.कर्मचारी वर्ग कायम मदतीच्या भूमिकेत असायचा.पुस्तक विभागात पाहिजे असलेली पुस्तके काही वेळातच उपलब्ध होत असायची.विशेष पुस्तकांसाठी मात्र इंडेक्स मधून नंबर शोधून द्यावा लागे.मला तरी प्रत्येक वेळी मी मागितलेली सर्व पुस्तके उपलब्ध झालेली होती.यदाकदाचित आवश्यक असलेले पुस्तक जर कोणी वाचक घेऊन गेलेला असेल तर त्या पुस्तकांचे प्रतिक्षाधीन वाचक म्हणून त्या मागणीकर्त्यां वाचकाचे नाव लिहून ठेवले जायचे. 'पिन ड्रॉप ' शांतता असायची.कोणी जर आवाज केला तर पुस्तक विभागातून "शांत राहा " म्हणून आवाज यायचा.
शाळेच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बाल मासिके आणि बाल साहित्यांची पर्वणी असायची या काळात ' पुस्तक मेळा 'भरायचा.मी गावी जायच्या अगोदर आणि नंतर आल्यावर त्या पुस्तकमेळ्या मधील बहुतेक पुस्तके मी वाचून काढत असे. शाळेच्या सुट्टीत नातेवाईकांकडे आलेली पाहुणी मुले त्या मेळ्यात खूप दिसायचीत.
रोज वाचनालयात गेल्याशिवाय चैन पडायची नाही. माझे लग्न झाले आणि मी गिरगाव सोडले आणि 'माझे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाशी ' असलेले खूप जुने नाते तुटले. पुढे कालांतराने पुस्तकांचा सहवास ही हातातून सुटत गेला. कार्यालयीन कार्यबाहुल्य ,पारिवारिक जबादाऱ्या, ट्रेनचा प्रवास या सर्व भाऊ गर्दीत माझा वाचन छंद आपसुक मागे पडला.ट्रेनच्या प्रवासा मधील रोजचे ‘वृत्तपत्र वाचन’ सोडले, तर अवांतर वाचना साठी वेळ मिळत नव्हता.
‘किशोर मासिक’ हे एकेकाळी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय होते. विशेषतः 1980 ते 2000 च्या काळात वय वर्ष 8 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी ‘किशोर ‘नावाचे मासिक ‘बालभारती' (महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळ,पुणे) यांच्या मार्फत चालविले जायचे. त्या वयोगट मी त्या मासिकाचा चाहता होतो. त्यातील लेख वाचून मी सुद्धा त्या काळात ‘बाल लेखक’ झालो होतो.एकदा नाही पाच वेळा मी लिहिलेल्या गोष्टी या पुण्याच्या बालभारती ऑफिसला पाठवलेल्या आहेत.त्या साठी येणारा पोस्टेज खर्च हा तेव्हा माझ्यासाठी जास्त असायचा.गंमत म्हणजे दोन आठवड्यांनी ,मी पाठवलेली ती गोष्ट “साभार परत “ हा लाल पेनाने शेरा मारून परत यायची.मुंबईत जर त्यांचे ऑफिस असते तर मी स्वतः जाऊन माहिती काढली असती की यात काय प्रॉब्लेम आहे ? त्यावेळी पब्लिक कॉल वरून कॉल केला तर फोन उचलला जायचा नाही.शेवटी हताश होऊन लेखन सोडून दिले. माझ्या कुठे कुठे चुका व्हायच्या ? त्या मला पुढील काही वर्षात लक्षात यायला लागल्या. ‘दारूबंदी निर्मूलन मंडळाने’ सन 1983 वर्षी राज्यस्तरीय ‘निबंध स्पर्धा’ भरवली होती. त्या साठी मी त्यातील एका विषयावर भला मोठा लेख लिहिला होता. आमच्या शाळेचे मराठी शिक्षक 'सावंत ' सर वर्गात आल्याबरोबर जरा हिंमत करून मी त्यांना तो लेख वाचायला दिला. त्यांनी माझा तो लेख अगोदर नीट वाचून काढला. त्या वेळेत ते वर्गात शिकवायचे सुद्धा थांबले होते,माझा लेख त्यांना फार आवडला होता.मला म्हणाले "घाई नाही ना ? आज मी हा लेख ठेवून घेतो, उद्या तू तो घेऊन जा." दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यावर लाल शाईच्या पेनाने काही अल्प सुधारणा करून तो लेख मला परत दिला आणि ते म्हणाले “तुझा लेख, तुझे विचार, तुझी मांडणी, तुझा दृष्टिकोन सर्व काही अतिशय छान आहे. मात्र शब्द लिहिताना तू काही शब्द चुकवतोस उदा.'अनुषंगिक ' ऐवज 'अनुसंगिक ' हे व असे,त्या कडे फक्त लक्ष दे. मी केलेल्या थोड्याच सुधारणा असून त्या प्रमाणे तुझा लेख सुधारून पाठव.” त्या प्रमाणे मी तो लेख पाठवायला आणि मला त्यात प्रथम पारितोषिक 251 रुपयाचे बक्षीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांचे द्वारे श्री, वि.स.पागे थोर गांधीवादी नेते आणि अध्यक्ष,महाराष्ट्र दारू बंदी मंडळ यांचे कडून स्वीकारले, त्या वेळी ती रक्कम माझ्यासाठी खूप मोठी होती. ज्या कार्यालयात मी ते बक्षीस घेतले ,त्याच ठिकाणी पुढे जाऊन मी शासन अधिकारी म्हणून कार्यरत झालो, खरंच, नियतीचे खेळ खूप विलक्षण असतात.
माझे 'किशोर ' चे लेख 'साभार परत ' येण्याची दोन कारणे असावीत पहिले कारण म्हणजे 'सावंत ' सर यांनी सांगितलेल्या चुका , त्या जरी कमी असल्या तरी लेखकाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्या चुका मोठ्या होत्या. दुसरे कारण बाळबोध हस्ताक्षरात असायचे, त्यांना अक्षरांवरून वरून लेखकाच्या वयाचा अंदाज येत असावा, ते लेख बहुदा त्यांना टंकलिखित असायला हवे होते.याचाच अर्थ की माझ्या लेखांवर मी 'संस्करण ' व्यवस्थित करत नव्हतो किंवा तसे करताना मी कुणा लेखकाचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते. मराठी विषय शिकवणारे 'सावंत ' सर एकदम कडक आणि शिस्तप्रिय होते.सुरुवातीला त्यांच्या पर्यंत जायला भीती वाटायची परंतु जेव्हा त्यांच्या कडे मी मदतीसाठी गेलो तेव्हा कळले की काही व्यक्तिमत्वे दिसतात तशी नसतात, आपण त्यांना समजून घेण्यात चूक करत असतो.
सदर वाचनालयात मी वयाच्या दहाव्या वर्षापासून वयाच्या 27 वर्ष पर्यंत म्हणजे लगबग 17 वर्ष जात होतो. या काळात तेथे येणाऱ्या अनेकांशी माझ्या ओळखी झाल्या होत्या. प्रवासात जसे काही ओळखीची माणसे भेटतात आणि अचानक दिसायची बंद होतात तसेच काहीसे इथे सुद्धा व्हायचे. तिथे येणारी ओळखीची माणसे अचानक दिसायची बंद व्हायची, परंतु नवीन नवीन ओळखी सुद्धा वाढायच्या,त्या ओळखींमध्ये मध्ये असाच एक मित्र होता त्याचे नाव ‘प्रभात सावे ‘ तो सुद्धा लायब्ररीत मासिके वाचायला नियमित यायचा. 'लायब्ररी फ्रेंड ' म्हणून तो माझा चांगला परिचीत होता.कधीही कुठेही दिसला की हात दाखवणारा.हसमुख आणि बोलक्या स्वभावाच्या मुलाचा एके दिवशी अपघात झाला.त्याच्या अपघाताची आणि मृत्यूची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा माझे मन सुन्न झाले.त्याचा अपघात हा दुर्दैवी होता,पण नंतर पुढे जे घडले ते अधिक वेदनादायक होते.अपघातानंतर तातडीची मदत म्हणून एका ' टॅक्सी ड्रायव्हरने ' घाईघाईत त्याच्या जखमा या मळक्या आणि घाणेरड्या फडक्यांनी बांधल्या होत्या.त्या क्षणी त्या ड्रायव्हरला वाटले असेल की “रक्त थांबवणे महत्त्वाचे आहे” कधी कधी अज्ञानातून केलेली मदत ही मदत नसतेच,ती मदत संकट अधिक वाढवते.जखमांमध्ये जंतू गेले,सेप्टिक झाले.सुरुवातीला साधे वाटणारे जखमांचे दुखणे,हळूहळू गंभीर होत गेले.योग्य वेळी, योग्य ते स्वच्छ उपचार मिळाले नाहीत,आणि त्या घाणेरड्या फडक्यांमुळे झालेला संसर्ग शरीरभर पसरत गेला.डॉक्टरांकडे पोहोचे पर्यंत परिस्थिती खूप बिघडली होती, न थांबणारा रक्तस्राव आणि जंतु संसर्ग या मुळे त्याने जगाचा निरोप घेतला.
एक अपघात पण त्यानंतरच्या चुकीच्या उपचारांनी त्याचं आयुष्यच हिरावून घेतले.ही गोष्ट मनाला सतत टोचत राहिली. अपघात टाळता आला असता कां ? माहित नाही परंतु जर त्याला योग्य उपचार मिळाले असते,तर तो कदाचित आज जिवंत असता.त्या दिवसानंतर प्रत्येक गोष्ट वेगळ्या नजरेने दिसू लागली.“मदत” म्हणजे नेमके काय ?आणि “योग्य मदत” किती महत्त्वाची आहे,हे प्रकर्षाने जाणवले,तो मित्र आता नाही,पण त्याची ती गोष्ट एक शिकवण बनून राहिली आहे.अपघातापेक्षा भयंकर असते ते चुकीचे उपचार.आणि त्या एका चुकीमुळे,एक पूर्ण आयुष्य अपूर्ण राहून जाते,
अशी होती आमच्या बालपणातील, कुमार वयातील आणि तारुण्यातील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, गिरगाव शाखा.आयुष्यात आनंद, उत्साह आणि जगण्याची खरी मजा देणारी जी काही माणसे, घटना, विचार आणि संस्था आपल्याला भेटतात, त्यांची आठवण मनाच्या विशाल कोपऱ्यात कायमची घर करून राहते. या व अशा अमूल्य स्मृतींमध्ये ' माझे वाचनालय' मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय गिरगाव शाखेचा वाटा मात्र खूप मोठा आहे.

समाप्त🖋️📖📚
🔗 'पडझडपडझड |जुन्या इमारतीत राहणाऱ्यांनी हे नक्की वाचावे | धोकादायक वास्तव आणि जागरूकतेची कथा '
पुढील लघु कथा आहे 'पडझड ,घराची की मनाची, गिरगावातील जुन्या इमारतींची पडझड, चाळ संस्कृती आणि एका प्रत्यक्ष अनुभवाची हृदयस्पर्शी कहाणी. मुंबईच्या जुन्या आठवणींचा प्रवास.👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )
📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!
𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

तुम्ही आजही या ग्रंथालयास भेट द्यावी असे मत आहे.
उत्तर द्याहटवा