मुख्य सामग्रीवर वगळा

पूर्णगड कडे जाणारी वाट | रत्नागिरी, पूर्णगड किल्ला, निसर्ग, इतिहास आणि रहस्यमय दंतकथा

  पूर्णगडकडे जाणारी वाट|रत्नागिरी, पूर्णगड किल्ला, निसर्ग, इतिहास आणि रहस्यमय दंतकथा- निसर्ग, इतिहास आणि एक अनोखी दंतकथा.

पूर्णगडकडे जाणारी वाट - निसर्ग, इतिहास आणि एक अनोखी दंतकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी ”
रत्नागिरीहून निघते वाट, निसर्गाच्या कुशीत हरवणारी,
राजिवडा, भाट्ये, पावस, गुळे , गावांची माळ सजणारी |
स्वयंभू गणपतीची भक्ती, शांततेत अनुभवणारी,
शेवटी पूर्णगडच्या इतिहासाची साक्ष देणारी|
त्याग, प्रेम आणि दंतकथा दगडांत जपलेली,
कोकणची ही सफर मनात कायमची कोरलेली |

    🔗 " तो जळाला…पण अजूनही दार ठोकतोय "  एक थरकाप उडवणारी    भय कथा  

       ही लघुकथा मुंबईतील प्रभादेवी परिसरातील मूलचंद वाडीमध्ये घडलेल्या एका भयावह घटनेवर आधारित आहे. अपूर्ण प्रेम, आत्मघात आणि परकाया प्रवेश यामुळेनिर्माण झाले ही मागील कथा तुम्ही वाचली असेल आता वाचा...

        पूर्णगडकडे जाणारी वाट | रत्नागिरी, पूर्णगड किल्ला, निसर्ग, इतिहास आणि रहस्यमय दंतकथा

     “रत्नागिरी ते पूर्णगड हा निसर्गरम्य प्रवास, सुंदर कोकणी गावे, किल्ल्याचा इतिहास आणि एक रहस्यमय दंतकथा जाणून घ्या."Ratnagiri Purnagad Travel” स्टोरी मराठीत पुढील प्रमाणे..
  रत्नागिरी ते पूर्णगड प्रवास हे केवळ पर्यटन नाही,तर इतिहास,लोककथा आणि कोकणातील निसर्गदत्त ठिकाणांचा अनुभव आहे.वळणावळणाचे रस्ते, विस्तीर्ण कातळ, अनेक आमराई आणि उंच टेकडीवरील पूर्णगड किल्ला प्रत्येक नवख्या प्रवाशाला भुरळ घालतो. मराठा आरमाराच्या इतिहासाशी जोडला गेलेला हा किल्ला आणि त्याच्याभोवती प्रचलित असलेली एक रहस्यमय दंतकथा या प्रवासाला वेगळीच रोमांचकता देतात. कोकण पर्यटन, इतिहास आणि गूढ कथा आवडणाऱ्यांसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल. 
      रत्नागिरी - पूर्णगड हा 25 कि.मी.चा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून येताना  9 ते 10 गावे लागतील. रस्ता अत्यंत नयनरम्य आणि डोळ्यात साठवून घेण्यासारखा आहे. या पूर्वी,या रस्त्यावरून प्रवास करताना  रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही गावात फक्त आणि फक्त कातळ पसरलेला दिसून यायचा. बहुदा आता तो सुद्धा   दिसणार नाही कारण  त्या कातळ जमिनीवर तेथील ग्रामस्थांनी आंब्याच्या बागा तयार केलेल्या आहेत. 
        अशा निसर्ग सुंदर रस्त्यावरील राजिवडा,भाट्ये,गोळप,पावस,गणेश गुळे,पूर्णगड ही प्रसिद्ध गावे आहेत. रत्नागिरी वरून येताना ‘राजिवडा’ आणि 'पूर्णगड'च्या बाजूने येणारा ‘भाट्ये’ गाव ही समुद्र किनाऱ्यावर वसलेली निसर्ग रम्य दोन गावे आहेत. हि दोन गावे  सागरी महामार्गाचा भाग असलेल्या 'भाट्ये खाडी' पुलामुळे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. त्यापैकी ‘भाट्ये’ गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख 'सरखेल मायनाक भंडारी'  यांची समाधी आहे.सदर समाधी खासगी जागेत आहे. तसेच  ‘भाट्ये’ गावात पर्यटनाने बाळसे धरलेले दिसेल. पुढे येणाऱ्या ‘गोळप’ या गावाचा टिळकांच्या कुटुंबाशी संबंध असल्याचे म्हटले जाते. टिळकांचा जन्म रत्नागिरी  शहरातील टिळक आळीत जरी झालेला असला तरी त्यांच्या परिवाराचा संबंध या गावाशी येतो असे म्हणतात. 
       यानंतर येतो ‘पावस’ गाव हे निसर्ग सुंदर गाव असून ते रत्नागिरी  जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले गाव आहे. कोकणातील शांतता, हिरवाई आणि साधेपणा अनुभवण्यासाठी हे ठिकाण खास मानले जाते. 'पावस' हे रत्नागिरी शहरापासून साधारण 15 किमी अंतरावर असलेले समुद्र किनाऱ्यालगतचे सुंदर कोकणी गाव आहे , समुद्र थोडा लांब आहे.   महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक  गुरु आणि महान संत ‘स्वामी श्री स्वरूपानंद’ यांची कर्मभूमी म्हणून ‘पावस’ हे  गाव विशेषतः ओळखले जाते. पावस येथील महान संत 'स्वामी स्वरूपानंद’ यांचे खरे नाव ‘श्री.रामचंद्र विष्णू गोडबोले’ असे होते. त्यांचा जन्म सन १९०३ साली झाला. त्यांनी साधना, ध्यान आणि आत्मज्ञान यावर भर दिला.पुढे त्यांनी आध्यात्मिक साधना, ज्ञान आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून असंख्य भक्तांना दिशा दिली. 
        सन १९७४ मध्ये ‘पावस’ येथे त्यांनी समाधी घेतली. “स्वतःचे स्वरूप ओळखा” म्हणजेच ‘सोहम’ हा त्यांचा मुख्य संदेश आहे. त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, ज्यात भक्ती, ध्यान, आत्मज्ञान यावर मार्गदर्शन आहे. त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र रत्नागिरीतील 'पावस' या गावात होते. समाधी मंदिर,ध्यान गुंफा (चिंतन मंदिर),आश्रम यामुळे हे स्थान प्रसिद्ध आहे. हजारो भक्त आणि पर्यटक त्यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर येथे येत असतात. अत्यंत शांत आणि सकारात्मक वातावरण येथे अनुभवायला मिळते. चारही बाजूंनी हिरवीगार झाडे नारळ,सुपारी,आंब्यांची बाग,स्वच्छ हवा आणि शांत वातावरण आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले निवांत वातावरण येथे आहे.साधी पण मन जिंकणारी पारंपरिक कोकणी घरे,आणि मनमोकळ्या स्वभावाचे, आपुलकीने वागणारे लोक हे या गावाचे वैशिष्ट्ये आहे. हे सगळंच या गावाला खास बनवते. धार्मिक कार्यक्रम या आश्रमात नियमितपणे होतात. गुरुपौर्णिमा आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
      पुढे लागणारे शांत आणि निसर्गरम्य गाव, ‘गणेश गुळे’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस जवळ वसलेले एक स्वयंभू आणि जागृत गणपती देवस्थान असून, हा 'गलबतवाल्यांचा गणेश' किंवा ‘इच्छापूर्ती गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे सुमारे ४०० वर्षांपेक्षा जुने मंदिर असून ते स्वयंभू स्थान आहे.जिथे गणपतीची मूर्ती नैसर्गिकरीत्या तयार झालेली आहे. निसर्गाच्या कुशीत, नैसर्गिक सौंदर्याने मंदिर वेढलेले आहे. थोड्या अंतरावर स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.  'गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला' अशी इथे एक म्हण प्रचलित आहे, असे मानले जाते की हे स्थान 'गणपती  'पुळ्या'पेक्षा फार जुने आहे. 'गणपती' हा 'गणेश गुळे' गावातून गेला म्हणजे तो प्रत्यक्ष मंदिर सोडून किंवा ते स्थान सोडून कुठेही गेलेला नाही.  त्या वेळच्या 'गणेश गुळे' गावातील  'स्वयंभू' गणेश मूर्तीच्या नाभी मधून भुगर्भिय पाण्याचा स्रोत वाहून तो मंदिरातील गोमुखातून मंदिरा बाहेर पडायचा ते पवित्र पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडून, 'स्वशुद्धी' करण्यासाठी हजारो भाविक मोठ्या प्रमाणावर तेव्हा 'गणेश गुळे' इथे यायचे, असे म्हणतात. भूगर्भातील नैसर्गिक हालचाली मुळे तो स्रोत काही वर्षांनी बंद झाला किंवा आटला. त्या नंतरचा भाविक हा 'गणपती पुळे' या स्थानाकडे वळला आणि त्या स्थानाला पुढे महत्व प्राप्त झाले आणि 'गणेश गुळे' गावाचे स्थान महत्व हळू हळू  कमी झाले म्हणून तसे प्रतिकात्मक म्हटले जात असावे.  
      ‘गणेश गुळे’  या  गावातील घरात ‘भाद्रपद’ महिन्यातील 'गणेश चतुर्थी'ला आणि ‘माघ’ महिन्यातील ‘गणेश जयंतीला ’ गणपती कोणी बसवत नाहीत. हे ठिकाण केवळ पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध नाहीत, तर जागृत देवस्थान म्हणून सुद्धा ते ओळखले जाते. येथे विराजमान असलेला गणपती हा 'स्वयंभू' मानला जातो. म्हणजेच तो कोणी स्थापलेला नसून स्वतः प्रकट झालेला आहे.
        ‘गलबतवाल्यांचा गणपती’ असे म्हणण्याचे कारण की पूर्वीच्या काळी समुद्रमार्गे व्यापार करणारे व्यापारी आपल्या होड्यांच्या सुखरूप प्रवासासाठी इथे नवस बोलत असत. ‘गणेश गुळे’ बीच हा एक अतिशय शांत, स्वच्छ आणि गर्दी नसलेला किनारा आहे, जो नारळाच्या आणि पोफळीच्या बागांनी वेढलेला आहे.
       रत्नागिरी ते पूर्णगड हा सुमारे २५ किमीचा निसर्गरम्य रस्ता आहे. या मार्गावरील शेवटचे गाव म्हणजे पूर्णगड. हा किल्ला इतर समुद्री किल्ल्यासारखा समुद्राने चारही बाजूंनी वेढलेला नाही. तर भुशिराचे एक टोक समुद्रात शिरलेले असून त्याच्या टोकावर उंच जागी हा किल्ला बांधलेला आहे.तो इतर किल्ल्यासारखा अवाढव्य नाही. काही वर्षापूर्वी तो बहुतांशी भग्नावस्थेत होता परंतु आताच सन 2019 नंतर या किल्ल्याचा जीर्णोध्दार झालेला आहे. या किल्ल्याभोवती ‘पूर्णगड’ हे  गाव वसलेले आहे.   
         या किल्ल्याच्या पायथ्याशी एकेकाळी ‘पूर्णगड बंदर’ अस्तित्वात होते, जिथून येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापारी गलबतांवर लक्ष ठेवले जात असे. शत्रूंच्या जहाजांची हालचाल ओळखण्यासाठी हे ठिकाण अत्यंत योग्य मानले जायचे.मराठा आरमाराच्या दृष्टीनेही हा किल्ला एक महत्त्वाचे रणनितीक केंद्र होते. आसपासच्या किनारी भागाचे संरक्षण करणे आणि समुद्री मार्गांवर नजर ठेवणे हीच या किल्ल्याच्या बांधकामा मागची प्रमुख उद्दिष्टे होती. प्रबळ मराठा आरमारामुळे गनिमांनी  कोकण किनारपट्टी  त्यांची दुष्ट नजर कधीच वळवली नाही. त्यामुळे 'पूर्णगड'च्या समुद्र इलाख्यात कोणत्याच युद्धाची नोंद असल्याचे दिसून आलेले नाही.
         काही अभ्यासू मंडळीचे म्हणणे असे आहे की  'छत्रपती शिवाजी महाराजां'चे पहिले आरमार प्रमुख 'सरखेल मायनाक भंडारी’  यांच्या देखरेखीखाली 17 व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात अंदाजे 325 च्या आसपास जिंकून घेतलेले किल्ले होते तर 15 ते 20 किल्ले महाराजांच्या कालावधीत बांधले गेले होते. त्यातील हा शेवटचा किल्ला बांधला गेला म्हणून सर्व किल्ले बांधून गड पूर्ण केले म्हणून या किल्ल्याला ‘पूर्णगड’असे नाव पडले.
       तर काही  इतिहास संशोधकांचे म्हणण्यानुसार हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात, मराठा आरमार प्रमुख 'सरखेल कान्होजी आंग्रे' यांनी सन १७२४ मध्ये  हा किल्ला बांधलेला आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार त्याचे श्रेय 'सरखेल कान्होजी आंग्रेंना' दिले जाते.हा किल्ला रत्नागिरीतील मुचकुंदी नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो,त्या पूर्णगड खाडीपाशी आहे. 
      या किल्ल्याच्या  निर्मितीबाबत काही अभ्यासू मंडळी आणि इतिहास संशोधक यांच्या कडील पुरावे या मध्ये दोन टोकाचे मतभेद आहेत.असे मतभेद असलेला बहुतेक हा इतिहासातील  एकमेव किल्ला असावा. या मतभेदांमुळे या किल्ल्याची निर्मिती आणि नावाच्या बाबतीत दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पहिली आख्यायिका अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  काळात गड किल्ल्यांची उभारणी पूर्णत्वाला आली होती, म्हणून हा शेवटी बांधलेला किल्ला हा ‘पूर्णगड’ म्हणून ओळखला जाऊ लागला. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार, बाजीराव पेशव्यांच्या काळात हा किल्ला बांधताना अनेकदा त्याचे बांधकाम कोसळत होते. शेवटी काही अघोरी विधी केल्यानंतरच गड पूर्ण झाला, म्हणून त्याला ‘पूर्णगड’ हे नाव पडले.
       लहानपणापासून  दुसऱ्या आख्यायिकेनुसार  मी या गावात पुढील दंतकथा ऐकत आलेलो आहे, त्यामुळे या गडाबद्दल एक वेगळीच गूढता आणि आकर्षण माझ्या मनात कायम राहिले आहे. या गडाच्या निर्मिती बाबत ठोस माहिती उपलब्ध नाही, त्यात मतभेद आहेत. तशीच या किल्ल्याच्या निर्मिती संबंधात असलेल्या दंतकथेबाबत सुद्धा कोणतीही माहिती उपलब्ध नाही. 
        रत्नागिरी जिल्ह्यातील ‘पूर्णगड’ किल्ला हा इतिहास, निसर्ग आणि दंतकथेचा संगम म्हणून ओळखला जातो. समुद्रकिनाऱ्यावर  उभा असलेला हा किल्ला आज शांत आणि बेलाग दिसतो, पण त्याच्या भिंतींमध्ये एक वेदनादायक कथा दडलेली आहे. जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठा आरमाराचे प्रमुख 'सरखेल कान्होजी आंग्रे' होते त्यांच्या पुढाकाराने किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. जोरदार वारे, भुस्तराची अंतर्गत रचना आणि खडकाळ जमीन यामुळे गड निर्मितीचे काम कठीण होऊन बसले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते, परंतु काही दिवसांनी एक विचित्र समस्या समोर आली. कितीही मजबूत भिंती उभारल्या, तरी त्या वारंवार कोसळत होत्या. कारागिरांनी अधिक मजबूत दगड वापरले, बांधकामाची पद्धत बदलली, तरीही समस्या कायम राहिली. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
       काहींनी हे निसर्गाचे परिणाम मानले, तर काहींनी त्या जागेवर काहीतरी अशुभ शक्ती असल्याचे सांगितले. शेवटी, या समस्येवर उपाय म्हणून एका तांत्रिकाला बोलावण्यात आले. त्याने संपूर्ण जागेची पाहणी केली आणि सांगितले की किल्ला उभा राहण्यासाठी एका नवरा-बायकोचा जिवंत बळी द्यावा लागेल. ही गोष्ट ऐकून सर्वजण हादरले, कारण हा निर्णय मानवी दृष्टिकोनातून अत्यंत कठोर आणि अघोरी होता.
        पूर्णगड गावात आणि आजुबाजूच्या गावात मराठा आरमारातील सैनिकांची वस्ती होती.कोणी या साठी स्वतःहून पुढे येते का ? म्हणून दवंडी पिटण्यात आली. पूर्णगड गावच्या पंचक्रोशीत राहणारे ‘गणोजी’  आणि ‘यमुना’ नावाचे एक साधे, मेहनती आणि प्रेमळ जोडपे राहत होते.  त्यांच्या नात्यात अपार प्रेम आणि विश्वास होता. जेव्हा पेशव्यांच्या  माणसांनी  दवंडी द्वारे गावात सर्वांकडे बळीसाठी विचारणा केली असता सर्वांनी  नकार दिला. तेव्हा  फक्त ‘गणोजी’  आणि ‘यमुना’ स्वतःहून नरबळी साठी पुढे आले. गणोजी हा सुद्धा मराठा आरमारातील एक सैनिकच होता. त्याचे म्हणणे असे की मी कधी तरी लढाईत धारातीर्थ पडणारच आहे. माझ्या मागे माझ्या बायकोचे जीवन हे मृत्यूपेक्षा भयानक असेल.आम्हाला मुलबाळ नाही. आम्हाला  पुढे  जगून तरी काय उपयोग आहे. त्यापेक्षा  मराठा साम्राज्यासाठी आम्ही बळी गेलो तर चुकले कुठे ? जे मरण उद्या येणार आहे ते आज आले तर काय वाईट आहे ? असे म्हटल्याबरोबर तेव्हा गावात खळबळ उडाली. अनेकांनी विरोध केला, काहींनी रडारड केली परंतु ‘गणू आणि यमु’ने आपला निर्णय शांतपणे हा स्वीकारला आणि तडीस नेला. ‘गणू’ने ‘यमु’कडे पाहिले आणि म्हणाला, “आपल्या जीवाने जर  आपल्या गावाचे आणि आपल्या राज्याचे भले  होणार असेल, तर हा त्याग व्यर्थ नाही.” ‘यमु’ने डोळ्यांत पाणी आणत मान हलवली. तिच्या मनात भीती होती, पण तिचा गणूवरचा विश्वास अधिक ठाम होता. त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला आणि नियतीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. 
             त्या रात्रीचे वातावरण अत्यंत भयाण होते. आकाशात काळे ढग दाटले होते, वारा जोरात वाहत होता आणि समुद्राच्या लाटा प्रचंड आवाज करत होत्या. समुद्राची गाज मन विचलित करीत होती. किल्ल्याच्या पायाशी एक मोठा खड्डा खोदण्यात आला. मशालींच्या मंद प्रकाशात ‘गणू’ आणि ‘यमु’ उभे होते.त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या.यमुने आडवे मळवट भरले होते. सभोवताली अघोरी  विधीचे भयावह वातावरण तयार झाले होते. दोघांच्या चेहऱ्यावर भीती, दुःख आणि एकमेकांवरील प्रेम स्पष्ट दिसत होते.’यमु’ हळू आवाजात म्हणाली,“धनी,आपण पुन्हा भेटू का?” ‘गणू’ने तिचा हात घट्ट धरत उत्तर दिले, “आपण कधीच वेगळे होणार नाही.” त्यांनी शेवटचा निरोप घेतला आणि शांतपणे त्या खड्ड्यात उतरले. कामगारांनी जड मनाने त्यांच्यावर माती टाकण्यास सुरुवात केली. प्रत्येक मातीचा ढिग त्यांच्या आयुष्याला संपवत होता. काही वेळातच सर्व काही शांत झाले. फक्त तेव्हा  समुद्राची  गाज  आणि वाऱ्याची सळसळ ऐकू येत होती.
           दुसऱ्या दिवशी पुन्हा बांधकाम सुरू झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळी उभारलेली भिंत कोसळली नाही. दिवसेंदिवस किल्ला पूर्ण होत गेला आणि शेवटी तो भक्कम उभा राहिला. लोकांनी याला त्या बळीचे फळ मानले. गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. सर्वांनी मनोमन त्यांना प्रणाम केला. काळ पुढे सरकत गेला. किल्ला पूर्ण झाला, लोकांचे जीवन सुरक्षित झाले, आणि त्या जोडप्याची कथा गावाच्या स्मृतीत जपली गेली. भीतीपेक्षा त्यांच्या त्यागाची भावना अधिक मोठी ठरली. आजही, किल्ल्याजवळ उभे राहिले की समुद्राची मंद गाज ऐकू येते, वाऱ्याची सळसळ जाणवते आणि मनात एकच विचार येतो. प्रेम आणि त्याग यांची ताकद किती मोठी असते! ही कथा आपल्याला घाबरवत नाही तर एक खोल सत्य सांगून जाते,कधी कधी काही लोकांचा त्याग,अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आणि आशेचा प्रकाश निर्माण करतो.
          ही कथा खरी आहे की केवळ दंतकथा, याचा ठोस पुरावा नाही. मात्र ती आपल्याला त्या काळातील अंधश्रद्धा, कठोर निर्णय आणि मानवी भावनांची जाणीव करून देते. प्रेम आणि त्याग यांची ही कथा ऐकताना मन हेलावून जाते. ‘पूर्णगड’ किल्ला हा आज पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्या प्रत्येक दगडामध्ये एक वेदनादायक आठवण दडलेली आहे. शांत समुद्र, हिरवाईने वेढलेले वातावरण आणि भव्य भिंती यामागे एक अशी कथा आहे, जी ऐकणाऱ्याच्या मनात कायमची घर करून राहते. 
        वरील लेख हा रत्नागिरी - पूर्णगड ह्या 25 किमी च्या मार्गावरील काही मोजक्या गावातील वैशिष्ट्यांचा आणि 'पूर्णगड' किल्ला उभारणी मागील लपलेल्या दंतकथेचा आहे. 
    कोकणातील अशा आणखी सुंदर ठिकाणांची माहिती, प्रवास अनुभव आणि रहस्यमय कथा वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.
                                                                        समाप्त🖋️📖📚

     🔗 तो अनोळखी, गूढ माणूस: केळवा पुरातील जीवघेणा प्रवास | थरारक सत्यकथा..

      या पुढील लघु कथेत वाचा...धुवांधार पावसात, पुराच्या रौद्र प्रवाहात अडकलेली एक गाडीक्षणोक्षणी वाढणारा पाण्याचा वेग आणि जीव वाचवण्याची धडपड…पुढील कथा वाचा..👉

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.

तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर )

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...