मुख्य सामग्रीवर वगळा

सौंदर्य : शाप की वरदा एपिसोड ५ - कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व | | मराठी सामाजिक थरारक कथा

अस्वीकरण-

ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा."

सौंदर्य : शाप की वरदा एपिसोड ५ - कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व | | मराठी सामाजिक थरारक कथा..

एपिसोड ५ – कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व
कुशीत जन्मलेले दोन जीव.. नियतीच्या स्वाधीन झाले,
आईच्या डोळ्यांतले अश्रू शब्दांविना वाहत राहिले.
समाजाच्या भीतीने मातृत्व हरलं त्या पहाटे,
दोन निष्पाप जीवांनी आयुष्य सुरू केलं अंधाराच्या वाटे.

🔗सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ४ : नाकारलेलं नातं…

   या भागात सत्तेचा मोह, विश्वासाची फसवणूक आणि एका निष्पाप तरुणीच्या आयुष्याला मिळालेलं वेदनादायी वळण उलगडतं. विवाहाची गोड स्वप्नं दाखवणारा प्रभावशाली नेता अचानक सर्व संबंध नाकारतो आणि उमा, मोहनलाल व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. विश्वासघात, सामाजिक भीती, तुटलेली स्वप्नं, मातृत्वाची चाहूल आणि जगण्यासाठी सुरू झालेला संघर्ष यांचा हृदयस्पर्शी प्रवास या भागात अनुभवायला मिळतो. मानवी भावनांचा, सामाजिक वास्तवाचा आणि नियतीच्या क्रूर खेळाचा वेध घेणारा हा भाग वाचकाला अंतर्मुख करतो.तो वाचला जर नसेल तर वरील शीर्षकावर क्लिक करून अवश्य वाचून घ्यावा..

सौंदर्य : शाप की वरदा एपिसोड ५ - कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व | मराठी सामाजिक थरारक कथा..

सौंदर्य : शाप की वरदान | कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व - एपिसोड ५ ही एक हृदयस्पर्शी मराठी सामाजिक थरारक कथा आहे. समाजाची भीती, चुकीचे निर्णय, मातृत्वाची वेदना आणि दोन निष्पाप जुळ्या बाळांच्या नशिबाची ही अस्वस्थ करणारी कहाणी या भागात उलगडते. नेताजींच्या विश्वासघातानंतर उमाच्या आयुष्याला आलेले धक्कादायक वळण, मुंबईतील संघर्ष आणि पहाटे कचऱ्याच्या पेटीजवळ सापडलेली दोन नवजात बाळे यामुळे कथेला एक नवं रहस्य आणि भावनिक वळण मिळतं. पोलिसांचा तपास पुढे जात असताना या दोन जीवांचा संबंध नेमका कोणाशी आहे, याचा शोध वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

मागील भाग - 4 वरून...

नेताजींच्या विश्वासघातानंतर उमाच्या आयुष्याला भीषण वळण मिळते. जुळ्या बाळांचा जन्म, समाजाची भीती आणि एका हृदयद्रावक निर्णयाची कहाणी वाचा.
सहा महिने कसे गेले, हे त्या घरातील कोणालाच कळले नाही. दिवसामागून दिवस सरकत होते. उमाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या चिंतेने सुरू होत होता, तर मोहनलाल प्रत्येक सकाळी एकाच आशेने जागा होत होता."आज कदाचित नेताजींचा निरोप येईल."
दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण राज्यभर रंगली. वर्तमानपत्रांमध्ये, रेडिओवर आणि चौकाचौकातील चर्चांमध्ये फक्त निवडणुकांचाच विषय होता. अखेर निकालाचा दिवस उजाडला.
नेताजींच्या पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला होता. राज्यभर जल्लोष सुरू झाला. फटाके, मिरवणुका, घोषणा आणि विजयाचे उत्सव अनेक दिवस सुरू होते.
मोहनलालच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला.
"आता निवडणूक संपली.. आता ते नक्की येतील."
पण दिवस गेले.. आठवडे गेले.. तरी कोणताही निरोप आला नाही.
शेवटी एक सकाळी त्याने स्वतःच जाण्याचा निर्णय घेतला.
रमादेवींनी डब्यात जेवण बांधून दिले. उमाने शांतपणे त्याच्या हातात नेताजींनी दिलेला जुना फोटो ठेवला.
"त्यांना दाखवा.. ओळख पटेल," ती एवढंच म्हणाली.
मोहनलाल पहिल्यांदा राज्याच्या राजधानीत पोहोचला.
समोर उभा होता भव्य सरकारी बंगला.
उंच लोखंडी गेट.. बंदुका खांद्यावर घेतलेले सुरक्षारक्षक.. आत ये-जा करणाऱ्या लाल दिव्यांच्या गाड्या..
क्षणभर त्याला वाटले, तो चुकीच्या ठिकाणी आला आहे.
धीर करून तो गेटजवळ गेला.
"मला साहेबांना भेटायचं आहे. सांगा की मोहनलाल आला आहे.. उत्तर प्रदेशच्या अमुक जिल्ह्यातून."
सुरक्षारक्षकाने आत फोन केला.
काही वेळाने उत्तर आले.
"साहेब बैठकीत आहेत."
मोहनलाल निराश होऊन परतला.
दोन दिवसांनी तो पुन्हा गेला.
यावेळी उत्तर मिळाले,
"साहेब दिल्लीला गेले आहेत."
तिसऱ्यांदा गेला, तेव्हा सचिवाने कागद पुढे करत म्हटले,
"आधी अपॉइंटमेंट घ्या."
मोहनलाल गोंधळून गेला.
"पण.. साहेब मला ओळखतात. ते माझ्या घरी राहिले होते.."
सचिवाने त्याच्याकडे निर्विकार नजरेने पाहिले.
"अशा गोष्टी रोज अनेक जण सांगतात."
हे शब्द ऐकताच मोहनलालच्या हातातील फाइल खाली पडली.
त्याला आठवलं..
तेच नेताजी..तोच हसरा चेहरा..खांद्यावर ठेवलेला विश्वासाचा हात..आणि आयुष्यभराची आश्वासने..
क्षणात सगळं धूसर झालं.
तो बंगल्याच्या बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर बसला.
हातात अजूनही नेताजीं सोबत काढलेला जुना फोटो होता.
त्याने त्या फोटोवरून अलगद हात फिरवला.
डोळ्यांतून नकळत पाणी ओघळलं.
त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच जाणवलं..
तो कोणाचाही सासरा नव्हता.
तो फक्त सत्तेच्या खेळात वापरला गेलेला एक सामान्य कार्यकर्ता होता.
मोहनलालला त्या दिवशी पहिल्यांदाच कळलं..मोठे लोक शब्द देतात, पण आठवण ठेवत नाहीत.
मुंबईहून परतताना मोहनलालच्या मनात एकच विचार घोंगावत होता.आपण फसलो गेलो आहोत.
ज्या स्वप्नांसाठी त्याने स्वतःच्या आयुष्याचा आधारच पणाला लावला, ती स्वप्ने एका क्षणात कोसळली होती. नेताजींनी दिलेली आश्वासने, वाढवलेली महत्त्वाकांक्षा आणि उज्ज्वल भविष्याची रंगवलेली चित्रे आता केवळ आठवणी उरल्या होत्या.
काही दिवस तो कोणाशी फारसा बोललाच नाही.
एके रात्री त्याने रमादेवी आणि तिच्या बहिणीला जवळ बसवले.
"आता या गावात राहणं योग्य नाही. लोकांच्या नजरा दिवसेंदिवस बदलत आहेत. उमाला शांत आयुष्य द्यायचं असेल, तर आपल्याला इथून निघावंच लागेल."
घरात क्षणभर शांतता पसरली.
शेवटी सर्वांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
मोहनलाल आधी एकटाच मुंबईला आला. नेताजींकडून मिळालेल्या पैशांतून त्याने उपनगरातील एका जुन्या बैठ्या चाळीत चार माणसे कसेबसे राहू शकतील, अशी एक छोटीशी खोली विकत घेतली, खोली लहान होती. पत्र्याचे छप्पर, एका कोपऱ्यात स्वयंपाकाची जागा, बाहेर सामायिक नळ आणि संपूर्ण चाळीसाठी एकच लांब गॅलरी.
ती आलिशान नव्हती पण त्या क्षणी तीच त्यांच्यासाठी आश्रय होती.
व्यवस्था करून तो पुन्हा गावात गेला.
काही दिवसांतच मोहनलाल, रमादेवी, उमा आणि तिची मावशी आवश्यक सामान घेऊन मुंबईला आले. दोन रिक्षांत त्यांचे मोजके संसाराचे सामान भरले होते. गाव कधीच मागे पडले होते, आता मोठ्या शहरातील झगमगाट त्यांचे डोळे दिपवत होता. पण प्रत्येकाच्या मनात काहीतरी तुटल्याची जाणीव होती.
मुंबईत पोहोचल्यावर त्यांनी त्या छोट्याशा खोलीत नवे आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्याच आठवड्यात मोहनलालने जवळच्या फळ बाजारातून फळे आणून तो रस्त्यावर विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पहाटे बाजारात जाऊन माल आणणे आणि दिवसभर हातगाडीवर फळे विकणे, हाच त्याचा दिनक्रम झाला.
उमाची प्रकृती मात्र दिवसेंदिवस अधिक काळजी घेण्यासारखी होत होती. रमादेवी आणि तिची बहीण तिची शक्य तितकी काळजी घेत होत्या. घरातील चर्चा आता एकाच विषयाभोवती फिरत होती,पुढे काय करायचे?
मोठ्या शहरात कोणी त्यांना ओळखत नव्हते. हेच त्यांच्या दृष्टीने दिलासादायक होते पण अनोळखी शहरात प्रत्येक निर्णय अधिक जबाबदारीने घ्यावा लागणार होता.घराच्या बाहेर मुंबईचा गोंगाट अखंड सुरू होता, पण त्या छोट्याशा खोलीत प्रत्येकजण आपापल्या मनातील शांत न होणाऱ्या प्रश्नांशी झुंज देत होता.
काही दिवस पुढे सरकले.अखेर उमाचे दिवस भरले. तिच्या मावशीला बाळंतपणाचा अनुभव असल्यामुळे घरातच सर्व तयारी करण्यात आली. रमादेवी आणि मावशीच्या मदतीने बाळंतपण सुखरूप पार पडले. उमाने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला.
त्या क्षणी घरात आनंदी आनंद असायला हवा होता पण तिथे शांतता होती. त्या दोन्ही नवजात बाळांकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांत वेगवेगळे भाव होते. उमाच्या डोळ्यांत माया होती, रमादेवीच्या डोळ्यांत अश्रू होते, तर मोहनलालच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.
त्याला वाटत होते, आपल्या एका चुकीच्या निर्णयाची किंमत आता या निष्पाप जीवांना मोजावी लागणार आहे.समाजाच्या भीतीने, लोकांच्या प्रश्नांनी आणि उमाचे आयुष्य पुन्हा उभे करण्याच्या चुकीच्या समजुतीने त्याने एक कठोर निर्णय घेतला.
पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. शहरावर धुक्याची पातळ चादर पसरली होती. रमादेवी आणि तिची बहीण दोघींनीही बाळांना उबदार चादरीत काळजीपूर्वक गुंडाळले. उमा अर्ध शुद्धीत झोपली होती.घराबाहेर पडताना त्यांच्या पावलांत बळ नव्हते,प्रत्येक पाऊल जड झाले होते.त्या दोघी घराबाहेर निघाल्या आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी निर्णयाकडे त्या चालू लागल्या.
त्या क्षणी त्यांना कोणताही निर्णय योग्य वाटत नव्हता. फक्त प्रत्येक मार्ग दुःखाकडेच जात असल्याची जाणीव त्यांना होत होती.पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्यांच्या हातातल्या दोन छोट्याशा जीवांचे भविष्य नियतीच्या स्वाधीन झाले होते
मोहनलालला वाटले, पहाटेच्या वेळी कचऱ्याच्या पेटीजवळ एखाद्याला बाळांचा रडण्याचा आवाज ऐकू येईल आणि कोणीतरी त्यांना ताबडतोब उचलून सुरक्षित ठिकाणी नेईल. त्या चुकीच्या समजुतीतूनच तो निर्णय घेतला गेला.
दुधवाले सायकलींवर दुधाचे कॅन लटकवून घाईघाईने आपापल्या मार्गाने निघाले होते. रस्त्याच्या एका कोपऱ्यावर पेपरवाला फतकल मारून बसला होता. त्याच्यासमोर वर्तमानपत्रांचे गठ्ठे पडले होते. तो एकेक गठ्ठा सोडून पेपर वाटणाऱ्या मुलांच्या हातात वर्तमानपत्रांचे लहान गठ्ठे सोपवत होता.

दुसरीकडे चहाचे ठेले नुकतेच सुरू झाले होते. उकळत्या चहाचा वाफाळता सुगंध हवेत पसरला होता आणि त्या भोवती नेहमीचे चहाप्रेमी गप्पांचा फड रंगवत उभे होते.

शहराचा दिवस सुरू होत होता..

पण त्या दोन स्त्रियांच्या मनात मात्र काळोख दाटला होता.

रमादेवी आणि तिची बहीण हळूहळू घराबाहेर पडल्या. त्यांच्या हातात उबदार चादरीत गुंडाळलेले दोन छोटेसे जीव होते. त्या बाळांना चादर उघडून पाहण्याचीही त्यांची हिंमत होत नव्हती. प्रत्येक पावलागणिक त्यांच्या मनावर अपराधीपणाचं ओझं अधिकच वाढत होतं.

रस्त्यावर आल्यावर दोघींनी एकमेकींकडे पाहिलं.

डोळ्यांत शब्द नव्हते.. फक्त अश्रू होते.

क्षणभर दोघी जागच्या जागी थांबल्या. पण नियतीच्या नावाखाली घेतलेल्या त्या कठोर निर्णयाने त्यांना पुढे ढकललं.

थोड्याच वेळात दोघींनी वेगवेगळ्या दिशेची वाट धरली.

एकीच्या कुशीत एक बाळ..

दुसरीच्या कुशीत दुसरं..

शहराच्या दोन वेगवेगळ्या दिशांना त्या चालत राहिल्या.

आजूबाजूला मुंबई जागी होत होती; पण त्यांच्या मनात मात्र प्रत्येक पावलागणिक एकच प्रश्न घुमत होता,

“या दोन निष्पाप जीवांचं पुढे काय होणार?”

काही वेळाने शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या पेटीजवळ त्या थांबल्या.

थरथरत्या हातांनी त्यांनी चादरीत गुंडाळलेल्या त्या बाळांना अलगद खाली ठेवलं.

एक क्षण...

दोघींनी मागे वळून पाहिलं.

नजरेसमोर निष्पाप चेहरा दिसताच त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

पण त्या थांबल्या नाहीत.

जड अंतःकरणाने, डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत त्या हळूहळू तिथून निघून गेल्या.

आणि मागे राहिले...

दोन निष्पाप जीव...
दोन कचऱ्याच्या पेट्या...

काही वेळाने एका ठिकाणी मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तर दुसऱ्या ठिकाणी कचरा गोळा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला दुसरे बाळ दिसले. दोघांनीही तातडीने पोलिसांना कळवले.दोन्ही नवजात बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर बालकल्याण यंत्रणेमार्फत त्यांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात पालकांचा शोध सुरू केला.

वैद्यकीय तपासणीत दोन्ही बाळांचा जन्म जवळपास एकाच वेळी झाल्याचे आणि ती जुळी असण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील विविध दवाखाने, प्रसूतीगृहे आणि रुग्णालयांमध्ये चौकशी केली. मात्र त्या दिवशी जन्मलेल्या जुळ्या बाळांच्या सर्व नोंदी त्यांच्या पालकांसह व्यवस्थित होत्या.
सन १९९० च्या दशकाची सुरुवात असल्याने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. ठोस पुरावे नसल्यामुळे तपास पुढे सरकत नव्हता. दोन निष्पाप जीव कोणाच्या पोटी जन्माला आले? हा प्रश्न पोलिसांसमोर अनुत्तरितच राहिला.
दोन्ही नवजात बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्या. वायरलेस संदेशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना त्या दोन्ही बालकांची माहिती पाठवण्यात आली. जवळच्या रुग्णालयांमध्ये, प्रसूतीगृहांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये चौकशी झाली पण कोणताही ठोस धागा मिळत नव्हता. काही दिवसांनी ही केस इतर प्रकरणांप्रमाणेच फाईलमध्ये दडून गेली.
मात्र तपास अधिकृतपणे बंद झाला नव्हता.
सुमारे महिनाभरानंतर एका पोलीस निरीक्षकाला त्याच्या जुन्या खबऱ्याने सहज एक माहिती दिली.
"साहेब, आमच्या भागात उत्तर प्रदेशातून एक कुटुंब राहायला आलं आहे. चार माणसं दोन रिक्षांत आली होती. त्यांच्यासोबत एक तरुण महिला होती. ती तेव्हा पूर्ण गरोदर दिसत होती. पण आता तिचं पुढे आलेले पोट सुद्धा दिसत नाही आणि तिच्यासोबत नवजात मूलही कधी दिसत नाही. ती कायम घुंगट घेऊनच बाहेर पडते."
हे ऐकताच निरीक्षकाच्या डोळ्यांसमोर जुळ्या बालकांची केस उभी राहिली.
त्याने लगेच कोणतीही घाई केली नाही. दोन दिवस तो साध्या वेशात त्या चाळीत जाऊन येऊ लागला. शेजाऱ्यांशी सहज गप्पा मारत माहिती गोळा करू लागला.
चौकशीत एकच गोष्ट वारंवार समोर येत होती.
"हे कुटुंब महिनाभरापूर्वीच इथे राहायला आलं."
"तो माणूस फळ विकतो."
" तरुण बाई आली तेव्हा ती गरोदर होती."
"पण बाळ कधीच दिसलं नाही."
आता संशय अधिकच बळावला.
निरीक्षकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह त्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात बोलावले.
सुरुवातीला चौघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. पण चौकशी जसजशी पुढे सरकत गेली तसतसे त्यांच्या बोलण्यात विसंगती दिसू लागली.महिला पोलिसांनी स्वतंत्रपणे रमादेवी, तिची बहीण आणि उमाशी संवाद साधला.काही तासांच्या चौकशीनंतर रमादेवीचा धीर सुटला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
ती रडत रडत म्हणाली,
"साहेब.. चूक झाली आमच्याकडून पण आम्ही त्या बाळांना मारलं नाही. कोणीतरी त्यांना वाचवेल म्हणूनच ठेवून आलो होतो.."
त्यानंतर संपूर्ण घटनाक्रम हळूहळू समोर आला.
पोलीसांनी उमाची वैद्यकीय तपासणी करून ती नुकतीच प्रसूत झाल्याची वैद्यकीय नोंद घेतली. घरातून बाळंतपणात वापरलेले काही कपडे, कापडं आणि इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या. शेजाऱ्यांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि चौकशीत दिलेली कबुली यांवरून दोन्ही नवजात बालकांचा संबंध याच कुटुंबाशी असल्याचे स्पष्ट झाले.
महिनाभरापासून अंधारात चाचपडणाऱ्या तपासाला अखेर दिशा मिळाली होती.
त्या काळात डीएनए तपासणी सर्वसामान्य पोलिस तपासाचा भाग नव्हती. त्यामुळे त्या मुलांचा जैविक पिता कोण, हे निश्चितपणे सिद्ध करणे शक्य झाले नाही. पोलिसांच्या तपासात एवढेच स्पष्ट झाले की, ती दोन्ही जुळी मुले उमाचीच आहेत. मात्र त्यांच्या पित्याविषयी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता.
चौकशीदरम्यान मोहनलालने आपली चूक कबूल केली. समाजाच्या भीतीपोटी आणि मुलीचे आयुष्य वाचवण्याच्या चुकीच्या समजुतीतून आपण तो निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. रमादेवी आणि तिच्या बहिणीनेही घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर स्पष्ट केला.या प्रकरणात नवजात बालकांचे प्राण वाचले होते, कुटुंबानेही तपासात सहकार्य केले होते आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर ती दोन्ही मुले पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आली.
मोहनलालने त्या दिवसापासून एक निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत उमाला पुन्हा सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी द्यायची.
क्रमश:.🖋️📚📖

“सौंदर्य : शाप की वरदान” ही सामाजिक वास्तव, मानवी भावना, नात्यांमधील विश्वासघात आणि नियतीचे अनपेक्षित खेळ यांना केंद्रस्थानी ठेवणारी मराठी कथा मालिका आहे. एपिसोड ५ - कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व मध्ये समाजाच्या दबावामुळे घेतलेला एक कठोर निर्णय दोन निष्पाप जीवांच्या आयुष्याला कोणत्या वळणावर नेतो, हे पाहायला मिळते. या मराठी सामाजिक थरारक कथेतील सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ६ : सव्वीस वर्षांनंतरचं सत्य या पुढील भागात उमाच्या आयुष्यात कोणते नवे प्रश्न उभे राहतात आणि त्या जुळ्या मुलांचे भविष्य काय होते, हे जाणून घेण्यासाठी “शब्दांची मुशाफिरी | Sjomkar Blog” वरील पुढील भाग नक्की वाचा.
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

  👨🏻‍💼  Connect With Us

📧 Gmail: sjomkar21@gmail.com

🌐 Follow & Connect

🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या. 

ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून  "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.


💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो

📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...