'चकवा '- मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?
तुम्ही कधी विचार केला आहे का,
एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…
खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल
तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?
ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो.
चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.
चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?
चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती,
कधी तरी येते माणसांच्या मार्ग भ्रमंती।
अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे,
जीवनात सामान्य असते चकवा लागणे।
म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥
चकवा म्हणजे काय?
'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, तर मन, विचार आणि निर्णय यांच्यात निर्माण होणारा गोंधळही होय. आयुष्यात अनेकदा आपण चुकीच्या मार्गावर चालत असल्याचा भास होतो, तर कधी योग्य दिशा समोर असूनही निर्णय घेण्याचे धैर्य होत नाही. या विचारप्रवर्तक मराठी लेखात 'चकवा' या संकल्पनेचा जीवनाशी असलेला संबंध, मनातील भ्रम, चुकीच्या निर्णयांचे परिणाम आणि योग्य दिशा निवडण्याचे महत्त्व वास्तव अनुभवांच्या माध्यमातून उलगडले आहे.
' चकवा' म्हणजे भ्रम निर्माण होणे, मुद्दाम किंवा नकळत गोंधळात टाकले जाणे, रस्ता चुकल्यावर होणारा भास, थोडक्यात मन आणि दिशांचा गोंधळ होय।
ग्रामीण भागात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना “चकवा ” लागल्याचे अनेक अनुभव ऐकायला मिळतात. किर्र जंगलात, एकसारख्या वाटा आणि दिशेचा अभाव,माणूस फिरून फिरून त्याच ठिकाणी येतो.
अनुभवी लोक मात्र निसर्गातील खाणाखुणा ओळखून त्या मधून मार्ग शोधतात, पण नवखे वाटसरू मात्र भरकटतात.पूर्वीचा काळ आणि आजचा बदल हा की पूर्वी वाटसरूंना विचारून मार्ग शोधला जायचा.आज तंत्रज्ञानामुळे मार्ग सोपा झाला आहे पण “चकवा” मात्र अजूनही संपलेला नाही ,फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.
एक अनुभव - वडाळा,अँटॉप हिल येथे बसलेला चकवा
एकदा मी आणि माझी पत्नी पनवेल जवळील शेडूंग येथे एका डेस्टिनेशन मॅरेज साठी गेलो होतो. जातानाचा वाशी मार्ग परिचित असल्याने त्या वेळी काही अडचण आली नाही.परतीच्या वेळी आमच्या घराचे ठिकाण टाकून गाडी सुरू केली, मनात विचार होता.ज्या मार्गे आलो, त्याच मार्गे परत जाऊ.पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.
गाडी चालवत असताना लक्षातच आले नाही की आपण वेगळ्याच मार्गावर आलो आहोत. पुढे जाऊन समजले की आता परत फिरणे हे काही सोपे नाही. कारण तो पर्यंत आम्ही नवीन अटल बिहारी वाजपेयी म्हणजेच अटल सेतू वर येऊन पोहचलो होतो, म्हटले ठीक आहे.जरी मार्ग चुकला तरी या नवीन पुलावरून मला कधी तरी एकदा जायचेच होते, अनायासे ती संधी आता मिळाली,म्हटलं चला जाऊया.
ब्रीज संपता संपता पुढे मंत्रालय,वडाळा,घाटकोपर असे तीन मार्ग असल्याचा दिशा दर्शक फलक दिसला, म्हटले घाटकोपर वरून JVLR मार्गे पुढे जाऊयात. एकदा मार्ग चूकलोय, परत तो चुकू नये म्हणून की काय मी गाडी थांबवून तिथल्या एका पादचारी व्यक्तीला घाटकोपरचा मार्ग विचारला असता त्याने वडाळा सबवे मार्गे जायला सांगितले. वडाळा सबवेला गेल्यावर गुगल मॅप ने आमचा रस्ता Redirected केला.घाटकोपर राहिले बाजूला ,आता आम्ही वडाळा येथे ट्रक टर्मिनल आणि RTO ऑफीस येथून पुढे सरळ जायचे सोडून डावीकडे वळून आचार्य अत्रे मोनो रेल स्टेशन परिसरात पोहचलो होतो,म्हणजे इथे सुद्धा आमचा मार्ग चुकलाच होता. हा गोंधळ संपविण्यासाठी एका हॉटेल मध्ये चहा घेऊन त्या हॉटेल वाल्या कडून व्यवस्थित पुढचा रस्ता माहित करून घेतला आणि गुरु तेग बहादूर नगर येथून BKC मार्गे आमच्या घरी पोहचलो.
मी मुळ मुंबईकर परंतु मुंबईच्या हार्बर भागात कधीच जास्त न फिरल्यामुळे तेथील रस्ते माझ्या विशेष परिचयाचे नाहीत. दुसरे म्हणजे मी ड्रायव्हर नक्की आहे,परंतु पेशावर ड्रायव्हर नाही.त्या मुळे सर्वच रस्ते मला माहित असण्याची आवश्यकता नाही. गुगल मॅप मध्ये अचूक ठिकाण भरणे गरजेचे असते. नाही तर आजच्या तांत्रिक युगात सुद्धा आमच्या सारखे असे चकवे कुणालाही बसू शकतात.
नवीन रस्ता, नवीन पूल, त्या पुलावरील वेग आणि दिशादर्शक फलक , या मुळे मनात थोडा गोंधळ सुरू झाला. “ठीक आहे, नवीन मार्ग पाहूया” असे म्हणून पुढे जात राहिलो. घाटकोपर मार्गे जाण्याचा मार्ग निवडला. तो निर्णय खरे तर बरोबर होता. त्याच मार्गानी आम्ही पुढे जायला हवे होते. एकदा झालेली चूक परत होऊ नये म्हणून थांबून परत मार्ग विचारणे ही आमची चूक होती.
खरा चकवा आम्हाला तिथेच बसला. तिथे मार्ग विचारल्यावर एका पादचाऱ्याने नीट माहिती न दिल्यामुळे आम्ही चुकीच्या दिशेने म्हणजे वडाळ्याच्या दिशेने गेलो. घाटकोपर मार्गे जाण्याचा सुद्धा पर्याय होता. त्यांनी तो न सांगता वडाळ्याचा पर्याय सांगितला.तेच एक वळण चुकले आणि मग सुरू झाला खरा गोंधळ.त्याचा तरी दोष काय, त्याला जे माहित होते ते त्याने सांगितले. त्याला सुद्धा दोष देण्यात काहीच उपयोग नाही.
काही वेळासाठी असे वाटत होते की आपण गोल गोल फिरतोय की काय ? शेवटी थांबून, मार्ग विचारून, योग्य दिशेने गेलो.पनवेलहून निघाल्यानंतर जे अंतर दोन तासांत पार झाले असते, तेच अंतर पूर्ण करायला आम्हाला चार तास लागले.वेळ गेला तो गेला, पण त्याहून जास्त मनस्ताप झाला. वेळ आणि इंधन खर्ची पडले ते निराळे.
या अनुभवातून काय समजते ?
हा अनुभव म्हणजेच एक “चकवाच” आहे असे म्हणायला हरकत नाही.
तंत्रज्ञान चुकले नाही, त्यात माहिती भरणारे आम्ही आणिआम्हाला मार्गदर्शन करणारे लोक चुकले.चुक झाली ती आमच्या आकलनात,जेव्हा माहिती अपुरी असते, तेव्हा छोटा निर्णयही मोठा परिणाम करतो.
चकवा का लागतो?
अपुरी माहिती,
घाई किंवा अति आत्मविश्वास,
चुकीचा अंदाज,
आणि मनातील गोंधळ
तात्पर्य-
शांतपणे विचार करा,आणि मगच पुढचा मार्ग ठरवा,चकवा हा रस्त्यांमध्ये कमी, आणि मनात जास्त असतो.कधी कधी चकवा हा त्या भागाची त्या मार्गाची समोरच्याला बहुतेक ओळख सुद्धा करून देत असावा.हाच तो मार्ग नीट लक्षात ठेव.परत चुकू नकोस ! आता तोच चुकलेला वडाळ्याचा रस्ता मी भविष्यात कधी विसरेन असे वाटत नाही.आता तो कायम लक्षात राहील !
🔗 "माझी मायबोली - मालवणी| कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास"
भाषेचा सहज जाणवणारा बदलही मनाला नवा विचार देऊन जातो."मालवणी भाषेची गोडी, रत्नागिरीतील मुचकुंदी नदी, गावखडी आणि पूर्णगड गावातील अनुभव यावर आधारित एक भावनिक आणि वास्तवता पुढील लेखात...👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )
वास्तविक अनुभवाचे सुरेख शब्दांकन केले
उत्तर द्याहटवाआपल्या सूचना कायम प्रार्थनीय आहेत !
उत्तर द्याहटवाचकवा किती मनस्ताप देतो यावरुन खरे लक्षात आले
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवाचकवा वास्तव की मनाचा भ्रम,, विचार करण्याजोगा विषय आहे. अप्रतिम अनुभव कथा.
उत्तर द्याहटवाविचार करायला लावणारा लेख !
उत्तर द्याहटवा“चकवा” हा फक्त रस्त्यांमध्ये नसून आपल्या मनातही असतो, ही मांडणी खूप सुंदर केली आहे.
अनुभवातून दिलेला संदेश अगदी वास्तव आणि उपयोगी आहे.
पुढील लेखाची उत्सुकता नक्कीच वाढली आहे 👍
मनापासून दिलेले अभिप्राय !
हटवाnice comments
हटवाThank u !
हटवाखूपच वास्तववादी आणि विचार करायला लावणारा लेख 👏
उत्तर द्याहटवा“चकवा” हा मनात जास्त असतो, ही मांडणी अत्यंत प्रभावी आणि आयुष्याला लागू पडणारी आहे.
Thank u !
हटवाNice comments !
हटवालेखाची खुपच छान मांडणी केली आहे. वाचण्यासारखे आहे.
हटवाखूप खूप आभार !!
हटवाखूपच सुंदर लेखन, मांडणी अप्रतिम
उत्तर द्याहटवाअसेच अभिप्राय मिळावेत !
हटवाChan story.manashi keleli Tulana vastav vadi story
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद !!
उत्तर द्याहटवा