मालवणी भाषा - माझी मायबोली | कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास
🔗 ‘चकवा मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? ’
"जसा मानवी मनाचा गोंधळ या मागील लेखातील अनुभवातून समजतो ते वाचलेच असेल..
मालवणी भाषा - माझी मायबोली | कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास
मालवणी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून कोकणातील संस्कृती, माणुसकी आणि जिव्हाळ्याची ओळख आहे. रत्नागिरीच्या मुचकुंदी नदीचा निसर्ग, गावखडीतील ग्रामीण जीवन, पूर्णगड गावातील अनुभव आणि मालवणी बोलीची गोडी या लेखातून जिवंतपणे अनुभवायला मिळते. भाषा बदलली की संस्कृतीची ओळखही बदलते, पण मायबोलीशी असलेले नाते कायम मनात जपलेले राहते. कोकण, मालवणी भाषा आणि ग्रामीण आठवणींवर आधारित हा भावनिक मराठी लेख प्रत्येक वाचकाला आपल्या मुळांकडे घेऊन जाईल.
भाषेचा सहज जाणवणारा बदलही मनाला नवा विचार देऊन जातो."मालवणी भाषेची गोडी, रत्नागिरीतील मुचकुंदी नदी, गावखडी आणि पूर्णगड गावातील अनुभव यावर आधारित एक भावनिक आणि वास्तव लेख...
सर्वच भाषा या महत्वाच्या
ज्यांच्या त्यांच्या आपुलकीच्या I
आठवणी गावाकडच्या ,बालपणाच्या
गोड ,मधुर मालवणी भाषेच्या I
गरजेचा आहे,भाषा अभिमान
नसावा फुकटचा दुराभिमान I
ज्यांच्या त्यांच्या आपुलकीच्या I
आठवणी गावाकडच्या ,बालपणाच्या
गोड ,मधुर मालवणी भाषेच्या I
गरजेचा आहे,भाषा अभिमान
नसावा फुकटचा दुराभिमान I
मी स्वतः मालवण तालुक्यातील नसल्याने मी स्वतःला मालवणी म्हणू शकत नाही, परंतु दुसरे एक कारण असे आहे की मी स्वतःला मालवणी भाषिक मात्र, नक्की म्हणवून घेऊ शकतो. ही ओळख माझ्यासाठी केवळ भाषिक नाही, तर भावनिक आणि सांस्कृतिक नात्याने जोडलेली आहे.
माझे आजोळ रत्नागिरीतील गावखडी हे गाव आणि पलीकडे आमचे पूर्णगड गाव. या दोन्ही निसर्गसुंदर गावांमधून मुचकुंदी नावाची नदी वाहते. ही नदी फक्त दोन गावांना वेगळी करत नाही, तर ती दोन जीवनशैली आणि दोन भाषिक गावांमधील भेद सुद्धा ठळकपणे दाखवते. आमच्या लहानपणी अल्याड-पल्याड जायचे म्हटले की तरीने, म्हणजे लहान होडीने जावे लागायचे, अन्य दुसरा मार्गच नव्हता. त्या होडीचा प्रवास म्हणजे एक वेगळीच मजा होती,पाण्याची लाट, वाऱ्याची झुळूक आणि नदीच्या कुशीतून जाण्याचा आनंद.दुसऱ्या बाजूने होडीचा वल्हा वल्हवनारे हे गावकरी प्रवासी असायचे. तर दुसऱ्या बाजूने तरीवाला त्याच्या लांब काठीने होडीला मार्गस्थ करायचे काम करायचा.पावसाळ्यातील प्रवास जिकारीचा असायचा, मला तर पावसाळ्यात प्रत्येक वेळी होडी बुडणार असेच वाटायचे परंतु त्या मार्गावर तसे कधीच झाले नाही.
आता कोस्टल रोडचा भाग असलेला मुचकुंदी नदीवरील ब्रीज हा सन १९८० मध्ये बांधला गेला आणि तरीने प्रवास करण्याची मजाच गेली. दोन्ही गावातील ग्रामस्थांची सोय झाली, वेळ वाचला, पण त्या जुन्या आठवणी मात्र तशाच कायम राहिल्या. काही गोष्टी सोयीसाठी बदलतात, पण त्यांच्या आठवणी मात्र कायम मनात जपल्या जातात.
मुचकुंदी नदी पूर्णगड येथे खाडीद्वारे समुद्राला मिळते. कुणाला वाटेल की नदी म्हटले की गोड पाण्याची नदी असावी; तर ते तसे नाही. तिचा गोडवा ती खूप अगोदर मागे सोडून खारी होऊन आलेली आहे. नदीचा हा स्वभाव मला नेहमी जीवना सारखाच वाटतो,जशी परिस्थिती बदलते, तसे आपणही बदलत जातो.
या नदीला मुचकुंद नावाच्या त्रेतायुगातील राजा पासून नाव मिळालेले आहे. विशाळगडा जवळील माताळ या गावातून तिचा उगम होऊन ती पूर्णगड येथे अरबी समुद्रास मिळते.एका गडाजवळ उगम पावून ती दुसऱ्या गडाजवळ समुद्रास मिळणारी ही एकमेव नदी असावी. लहानपणा पासून त्या नदीशी एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला होता. खूप वर्षांपूर्वी या मुचकुंद खाडीतील पूर्णगड बंदरात मुंबईतून येणाऱ्या-जाणाऱ्या बोटीचा थांबा होता. त्या काळात हे ठिकाण प्रवासासाठी महत्त्वाचे होते. नंतरच्या काळात त्या बंदरात हळूहळू गाळ भरल्याने त्या बोटी मुसा काझी बंदरात थांबा घेऊ लागल्या आणि हळूहळू त्या गजबजाटाची जागा शांततेने घेतली.पूर्णगडचा किल्ला हा तर मराठा आरमाराची शान असलेला समुद्री टेहळणी किल्ला आहे.
या मुचकुंदी नदीचे वैशिष्ट्य असे की या नदीच्या अल्याड, म्हणजे गावखडी गावात मालवणी भाषा बोलली जायची, तर पल्याड पूर्णगड गावात शुद्ध मराठी बोलली जायची. हा भेद लहानपणापासून अजूनही आमच्या लक्षात येतो. दोन-तीन किलोमीटर अंतरावर इतका मोठा भाषिक बदल होणे ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे.
२०० किमी वर भाषा वैभव बदलते हे ठीक आहे, परंतु ते वैभव २ ते ३ किमी इतक्या कमी अंतरावर सरकन कूस बदलावी तसेच बदलते, ही बाब फक्त याच ठिकाणी प्रकर्षाने जाणवत असावी. इतर भाषांच्या बाबतीत ती काही अंतरावर विरळ होत होत बदलली जाते, पण येथे हा बदल एकदम ठळकपणे जाणवतो.
गावखडी गाव हे समुद्रसपाटी वरील, समुद्रकिनाऱ्याच्या कुशीत वसलेले गाव, तर पूर्णगड हे डोंगरी आणि किल्ला असलेले गाव. गावखडीचे पाणी मचूळ, तर पूर्णगडचे पाणी गोड. या दोन गावांतील पाण्याच्या चवीत जसा वेगळेपणा ठळकपणे जाणवतो, तसाच फरक दोन भाषांच्या बोलीत सुद्धा जाणवतो.
हाच फरक त्या गावातील लोकांच्या वागण्यात सुद्धा मला जाणवून यायचा. गावखडीतील मोकळेपणा, स्वच्छंदीपणा, समुद्रकिनाऱ्याची सवय आणि मालवणी भाषेतील खास ढंग; तर पूर्णगड मधील डोंगराळ भागातील शांत,शिस्तबद्ध जीवन ,शुद्ध मराठी बोली,या दोन वेगळेपणाचा मला लहानपणी खरे तर फार त्रास व्हायचा.
बालपणी आणि शाळेच्या सुट्टीत आमचा मुक्काम जास्त करून आजोळीच असायचा, यावरून दोन्ही परिस्थितीचा सहज अंदाज येऊ शकतो. आजोळ म्हणजे फक्त एक ठिकाण नव्हते, तर ती मायेचे,प्रेमाचे, लाडाचे ठिकाण होते.
हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच की, माझी आई निर्वतल्यावर माझी आजी तिच्या सात-आठ महिन्यांच्या नातवाला घेऊन गावखडी येथे आली. त्या सहा - सात वर्षांत आजोळच्या मातीतले सर्व गुण माझ्यात उतरले होते, मुख्य म्हणजे त्या गावात बोलली जाणारी मालवणी भाषा. ती भाषा माझ्या बोलण्यात इतकी रुळली होती की तीच माझी तेव्हा ओळख बनली होती.
गावी शाळेत टाकले तर शाळेत जायचो नाही, म्हणून आजीला काळजी की हा मुलगा शिकला नाही तर याचे पुढे कसे होईल? तिने मला मुंबईला वडिलांकडे पाठवायचा निर्णय घेतला.मुलगा मुंबईत शिकेल तरी. हा निर्णय तिच्यासाठी कठीण होता, पण माझ्या भविष्यासाठी आवश्यक होता.
या सर्व परिस्थितीत माझी शाळेची सुरुवातीची दोन वर्षे वाया गेली. त्या फुकट गेलेल्या दोन वर्षांचा पश्चाताप आणि महत्व मला मोठा झाल्यावर कळले. वर्गातील सर्व मुले माझ्यापेक्षा एक-दोन वर्षांनी लहान होती, आणि त्या गोष्टीची जाणीव नेहमी व्हायची.
मुंबईत आल्यावर ऍडमिशन साठी सुरुवातीला खासगी शाळेत टाकायचे प्रयत्न झालेत, परंतु त्या त्या शाळेतील बालवाडीच्या मुलांना पहिलीत पहिले प्राधान्य असल्यामुळे मला कुठेच प्रवेश मिळत नव्हता. कारण गावावरून आलेला ‘गावठी’ मुलगा आणि बोलतो भाषा काय तर मालवणी.
बहुतेक शाळांकडून नकार आल्यावर पालकांना BMC च्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. BMC च्या शाळांकडे बहुतेक जण तुच्छतेने पाहत असतील, परंतु मी माझ्या अनुभवावरून सांगतो की मला BMC शाळेत जे प्राथमिक शिक्षण मिळाले ते खासगी माध्यमिक शाळेतील मुलांच्या तोडीचे होते. शिक्षकांची मेहनत, साधेपणा आणि शिकवण्याची पद्धत यामुळे माझा पाया मजबूत झाला.
प्राथमिक शाळा संपल्यावर पुढे BMC शाळेतील टक्केवारीवर मला गिरगाव मधील नामांकित ‘चिकित्सक समूह’ या शाळेत प्रवेश मिळाला. या शाळेत सहजा सहजी कुणाला प्रवेश मिळत नव्हता.दक्षिण मुंबईतील ती ख्यातनाम शाळा होती.शाळेतील मुले दरवर्षी मेरिट लिस्ट मध्ये असायची,शाळेचा निकाल सुद्धा 100 % असायचा. अशा नामांकित शाळेत गेल्यावर मी BMC शाळेतून आलो म्हणून मला कधीच कमीपणा वाटला नाही. उलट आत्मविश्वास वाढला. ज्या ज्या शाळांनी मला प्रवेश नाकारला होता, त्याच शाळा नंतर मला प्रवेश द्यायला तयार होत्या,यालाच म्हणतात “कालाय तस्मै नमः”!
सुरुवातीला मालवणेतर भाषिक मंडळी मालवणीकडे जरा हेटाळणीच्या नजरेने पाहत असत,पण आता काळ बदलला. आता त्या भाषेची गोडी मालवणेतर सुद्धा घ्यायला लागले आहेत. जर कधीही विषय मालवणी भाषेला आला तर मालवणी भाषा सम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतोच. त्यांनी मालवणी भाषेला एक वेगळी ओळख दिली,उंची दिली, तिला रंगमंचावर नेले आणि जगभर ती पोहोचवली.
मुंबईतील रहाटगाडग्यात नंतर माझ्या जीभेवर रुळलेली मालवणी कधी विरळ होऊन शुद्ध मराठी झाली ते मला सुद्धा कळलेच नाही. शहराच्या जीवनात मिसळताना भाषा बदलत गेली, पण तिची गोडी मात्र मनात कायम राहिली.
आता मालवणी बोलायची म्हटली तरी ती आठवून-आठवून बोलावी लागते. पण आजही आजोळी जर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिलो, तर ती पुन्हा जिभेवर सहज रुळायला लागते. जणू काही ती भाषा आपली वाट पाहत असते.
अशा गोड, मधुर भाषेची गोडी आता बोलून नाही तर विविध TV सीरिअल्स, नाटकं आणि आठवणीं मधून जपली जाते,हे काय कमी आहे का ? नाहीच. कारण भाषा फक्त बोलण्या पुरती नसते, ती जगण्याचा एक भाग असते.
कवियत्री बहिणाबाई चौधरी म्हणायच्या "माझी माय सरस्वती " तसेच मी सुद्धा असे म्हणेन माझी "माय मालवणी" माझ्यासाठी मालवणी ही केवळ मराठीची उपभाषा नाही, तर ती माझी मायबोली आहे,माझ्या बालपणाची, माझ्या मातीची आणि माझ्या ओळखीची जपणूक करणारी.जेव्हा कधी ती कानावर पडते तेव्हा मनाला सुखवणारी असते.
टिप - "माझी मायबोली - मालवणी" हा लेख माझ्या वैयक्तिक अनुभवांवर पूर्णपणे आधारित असून, कोकणातील संस्कृती आणि मालवणी भाषेची गोडी काय असते हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे."

🔗 "पक्का बदाम|गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणींची मराठी कथा..
गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बदामाच्या झाडांभोवती फिरणाऱ्या बालपणीच्या आठवणींवर आधारित रंजक आणि वास्तव मराठी लघु कथा आहे.पुढील भागात..👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )

मालवणी भाषा किती गोड असू शकते हे यावरून कळून येते
उत्तर द्याहटवाअतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर लेखन 🙏✨
उत्तर द्याहटवामालवणी भाषेची गोडी, आठवणींची उब आणि संस्कृतीशी असलेलं नातं खूपच सुंदरपणे उलगडलं आहे.
भाषा ही फक्त बोलण्यापुरती नसून ती आपल्या ओळखीचा एक भाग असते, हे तुमच्या अनुभवातून जाणवतं.
खूप छान मांडणी 👌 पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे 👍
मालवणी भाषा एक गोड भाषा, खूप छान शब्दांकन.
उत्तर द्याहटवाखूप हृदयस्पर्शी आणि आपुलकीने भरलेला लेख 🙏
उत्तर द्याहटवामालवणी भाषेची गोडी आणि आठवणींची उब इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केली आहे की मन भारावून जाते.