मुख्य सामग्रीवर वगळा

पक्का बदाम | गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणींची मराठी कथा

                                       

   पक्का बदाम | गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणींची मराठी कथा..

पक्का बदाम | गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान बालपणी कथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी च्या आठवणींची मराठीपक्का बदाम | गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणींची मराठी पक्का बदाम | गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणीं

🔗मालवणी भाषा - माझी मायबोली | कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास

         या मागील लेखात "मालवणी भाषेची गोडी, रत्नागिरीतील मुचकुंदी नदी, गावखडी आणि पूर्णगड गावातील बालपणीचे अनुभव यावर आधारित भावनिक आणि वास्तवकारी लेख जर वाचला  नसेल तर तो लेख वाचा..

पक्का बदाम | गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणींची मराठी कथा..

    गिरगावातील जपानी गार्डन, शेजारील कब्रस्तान आणि बदामाच्या झाडांभोवती विणलेल्या बालपणीच्या आठवणींचा हा हृदयस्पर्शी प्रवास आहे. 'पक्का बदाम' ही केवळ आठवणींची कथा नसून त्या काळातील निरागस बालपण, मैत्री, खोडकरपणा आणि परिसराशी असलेले भावनिक नाते यांचे जिवंत चित्रण आहे. जुन्या मुंबईचा सुगंध, बदलत्या काळाची जाणीव आणि बालपणातील अमूल्य क्षण पुन्हा अनुभवायला लावणारी ही मराठी कथा प्रत्येक वाचकाला आपल्या लहानपणात घेऊन जाईल.
      गिरगावातील जपानी गार्डन, शेजारचे कब्रस्तान आणि बदामाच्या झाडांभोवती फिरणाऱ्या बालपणीच्या आठवणींवर आधारित एक रंजक आणि वास्तव मराठी कथा. पुढे...
 रम्य त्या बालपणीच्या आठवणी,
फिरून कधी न येणार त्या परत जीवनी।
डोळ्यासमोर ते दिवस आजही तरळून जातात,
हळुवार प्रत्येक क्षणांची उजळणी करतात।
त्या बालपणाने शिकवले जीवनाचे गमक,
म्हणून उरी आली जगण्याची धमक।
    मी मुंबईतल्या गिरगावात भागात राहत होतो. गिरगाव म्हणजे मलबार हिलच्या खालील सपाट भाग, आणि त्या भागाला गिरगाव म्हटले जायचे. “गिर” म्हणजे डोंगर तो म्हणजे मलबार हिल आणि त्या खालील जो परिसर, तो गिरगाव. हा गिरगाव ग्रँट रोडपासून मरीन लाईन्सच्या भागात  पूर्व - पश्चिम पट्ट्यात पसरलेला आहे. मात्र जनवस्तीची घनता पूर्वे कडील पट्ट्यात अधिक आहे.
           गिरगावचे सहा - सात उपविभाग आहेत.  जसे की गिरगाव प्रार्थना समाज,ऑपेरा हाऊस,ठाकूरद्वार, खेतवाडी, माधव बाग, चिराबाजार, धोबीतलाव इत्यादी. त्या गिरगावच्या मध्यवर्ती भागात, चर्नी रोड रेल्वे स्टेशनजवळ आणि ठाकूरद्वार परिसरात मुंबई महानगरपालिकेची एक सुंदर बाग अजून सुद्धा आहे. तिला पूर्वी “जपानी गार्डन” म्हटले जायचे. नंतर तिचे अधिकृत नाव “स. का. पाटील उद्यान” असे ठेवण्यात आले. मुंबईचे तीन वेळा महापौर राहिलेले सदाशिव कान्होजी पाटील यांच्या नावावरून ही बाग ओळखली जाऊ लागली.
       खरे तर, असे म्हणतात की ती जागा पूर्वी पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटिश सैनिकांची दफनभूमी होती. ती हटवून तिथे सार्वजनिक उद्यान उभारण्यासाठी इंग्लंड मध्ये जाऊन परवानगी घ्यावी लागली, आणि ती परवानगी स. का. पाटील यांनी मिळवली, अशी वंदता आहे. यात किती तथ्य, हे काही माहीत नाही. पण त्या बागेत फिरताना काही ठिकाणी जुन्या ग्रेवयार्डच्या खुणा दिसायच्या. भग्नावस्थेतील स्मृती शिळा, अर्धवट मोडलेले दगड, कधीही त्या बागेत जमीन खणली की उकरलेल्या मातीत दिसणारे हाडांचे आणि तुटलेल्या कवट्यांचे अवशेष, हे सगळं त्या ग्रेव यार्डच्या  इतिहासाची साक्ष देत असायचे.
      जपानी बाग मात्र अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध होती. सकाळ-संध्याकाळ इथे प्रचंड गर्दी असायची. सुट्टीच्या दिवशी तर जणू जत्राच भरलेली असायची. तरुण-तरुणींचे जथ्थे, कुटुंबे, वृद्ध लोक , लहान मुले या सगळ्यांसाठी ही बाग एक निवांत जागा होती. त्या काळात मनोरंजनाची साधने कमी असल्यामुळे बागा, समुद्रकिनारे हीच लोकांची आवडती ठिकाणे होती.
          या जपानी गार्डनला लागूनच मुस्लिम धर्मीयांचे मोठे कब्रस्तान आहे, ज्याला आजही “बडा कब्रस्तान” म्हणून ओळखले जाते. ते इतके विस्तीर्ण आहे की पूर्वे कडे चर्नी रोडपासून मरीन लाईन्सच्या चंदनवाडीतील विद्युतदाहिनी पर्यंत ते पसरलेले आहे. एका बाजूला बागेतली गजबज, तर दुसऱ्या बाजूला शांत, गंभीर कब्रस्तान  हा विरोधाभास आमच्यासाठी अगदी रोजचा होता.
      लहानपणापासून ही बाग आमचे हक्काचे खेळण्याचे ठिकाण होते. शाळा, वाचनालय आणि घर सोडले तर उर्वरित आमचा सगळा मुक्काम इथेच असायचा. बागेच्या एका कोपऱ्यात एक छोटेखानी अभ्यासिका होती. आमच्यासाठी ती खूप महत्वाची जागा. सकाळची शाळा असेल तर दुपारी, आणि दुपारची शाळा असेल तर सकाळी, आम्ही अभ्यासासाठी किंवा खेळण्यासाठी इथे यायचो. इथे गिरगावातील लहान मुलां पासून थेट मास्टर पदवीचा अभ्यास करणारे विद्यार्थी यायचे, आवाज करायला मात्र तिकडे बंदी होती. चिडीचूप,शांतपने अभ्यास करावा लागे,नाहीतर मोठी मुले दम मारायची.
      इथे गिरगावातील विविध शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी यायचे. त्यामुळे आमच्या ओळखी खूप वाढल्या होत्या. गिरगावातील कोणत्याही गल्लीत गेलो तरी तिथे कुणीतरी आम्हाला ओळखीचे भेटायचेच, ओळख न विसरण्या इतकी आपुलकी होती त्या काळात. त्या मित्रांच्या गल्लीत होणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही जर कधी गेलो तर ते मित्र आम्हाला आवर्जून पुढच्या रांगेत बसवायचे.
      बाग दुपारी १ ते ४ या वेळेत बंद असायची. त्या वेळी BMC चे वॉचमन सर्वांना बाहेर काढायचे. अभ्यास करणाऱ्या मुलांना मात्र अभ्यासिकेत बसण्याची पूर्ण मुभा असायची. एकदा का वॉचमन मंडळी चौकीत जाऊन वामकुशी घेत बसले, की ते बागेत फेरी मारायला कधीच जात नसत आणि इथूनच सुरू व्हायचे आमचे “प्रताप” 
      पावसाळ्याच्या सुरुवातीला बागेतल्या बदामाच्या झाडांना भरपूर फळे यायची. पिकलेले बदाम लालसर-जांभळे, टपोरे दिसायचे. ती तोडण्यासाठी आमच्यात स्पर्धा लागायची. बागेतील तीन चार बदामांच्या झाडाखाली नेहमी दगडांचा ढिग पडलेला असायचा,कारण आम्ही दगड मारून बदाम पाडायचो. पण हे सगळे प्रताप आम्ही फक्त दुपारी १ते ४ या वेळेतच करायचो. कारण बाग उघडी असताना दगड कुणाला लागला तर त्रास होईल, हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे आमच्या खोड्यांना सुद्धा काही प्रमाणात मर्यादा होत्या.
        बागेतले बदाम खाल्ल्यावरही आमची हाव काही थांबायची नाही, मग आमचा मोर्चा वळायचा कब्रस्तानाकडे,त्या मधील झाडांचे पडलेले बदाम वेचायला.
        गार्डनच्या भिंती लगतच कब्रस्तानामध्ये काही बदामांची झाडे होती. ती सगळ्यांनाच माहिती नव्हती.फक्त आमच्यासारख्या काही “चिकित्सक” मुलांनाच त्यांची माहिती होती. पावसाळ्यात त्या झाडांवरचे बदाम अजूनच गोड आणि मोठे व्हायचे. जोराचा वारा किंवा पावसाची सर आली की बदाम खाली पडलेले असायचे. 
     पलीकडे जाण्या अगोदर आम्ही नीट वाकून पाहायचो की खादीम किंवा गोरकुन म्हणजे  कब्रस्तानातील सेवक आजुबाजूला नाहीत ना? आणि मग हळूच भिंत ओलांडून आत शिरायचो. आत गेल्यावर पटापट पडलेली बदाम गोळा करून खिसे भरायचे , आमच्या हाफ पॅन्ट आणि शर्टचे खिसे अक्षरशः फुगून जायचे.खाल्ल्यावर उरलेले बदाम आम्ही मित्रांना वाटायचो, त्यातच खरी मजा होती.
पण एक दिवस आमचा हा खेळ उलटाच पडला...
      नेहमीप्रमाणे आम्ही ४ ते ५ जण आत शिरलो. पण यावेळी कब्रस्तानातील सेवकांना आधीच आमची चाहूल लागली होती. त्यांनी आम्हाला पकडलं. आमच्यातला एक जण कुंपणावर बसलेला असल्याने तो पळून गेला आणि त्याने अभ्यासिके मधील बाकीच्या मित्रांना बोलावले. ते येईपर्यंत आम्हाला त्यांनी पकडून ठेवले होते. आम्हाला वाटलं आता काही आमचे खरे नाही, बहुतेक बेदम चोप खावा लागणार असे दिसते. पण तसं काहीही झाले नाही.
     त्यांनी आम्हाला १०० उठाबशा काढायला लावल्या आणि मग शांतपणे बसवून समज दिली की “बाबांनो, कब्रस्तानात येऊ नका. ही जागा तुमच्यासाठी सुरक्षित नाही. बदाम हवे असतील तर आम्हाला सांगा, ते आम्ही देऊ. पण असं लपून छपून येऊ नका.त्यांचा आवाज कठोर नव्हता ,उलट काळजीचा होता.
    आम्ही बाहेर आलो, तेव्हा आमचे मित्र आम्हाला सोडवायला आले होते. आम्ही त्यांना बदाम वाटले आणि सगळी घटना त्यांना इत्यंभूत सांगितली.ते म्हणाले  “ही जागा तुमच्यासाठी मेहफूज नाही.”का नाही? याचं उत्तर मात्र त्यांनी आम्हाला दिले नाही.
    पण आम्हाला त्याची फारशी भीती वाटली नाही. कारण आम्ही सोनापूर गल्ली मधली मुले ,त्या गल्लीच्या शेवटी टोकावर हिंदूची स्मशान भूमी आणि मुस्लिम कब्रस्तानाचा प्रवेश होता. जिथून दिवस-रात्र हिंदू मुस्लिम धर्मियांच्या अंत्ययात्रा जात असत. मृत्यू, स्मशान, कब्रस्तान  हे सगळं आमच्यासाठी काही नवीन नव्हते.त्या मुळे याबाबतीत आम्ही निडर होतो.
       त्या दिवसानंतर बदामांसाठी आम्ही कब्रस्तानात जाणं कायमच  बंद केलं.त्यांनी त्या वेळी सांगितले होते की “ जर तुम्हाला बदाम हवे असतील तर ते भिंतीच्या पलीकडून आमच्या कडून मागून घ्या, आम्ही तुम्हाला ते देऊ.” 
    कुणाकडे काहीही मागून, खाण्याचा आमचा मुळ स्वभाव नसल्याने, आम्ही कधीच त्यांच्या कडे ते मागितले नाही. त्या घटने नंतर आम्हाला गार्डनच्या भिंती आडून पलीकडे  कब्रस्तानात  बदामांचा सडा पडलेला  दिसायचा, परंतु त्या कडे कधीच आम्ही लक्ष दिले नाही. नाही म्हणजे नाही,कदापी नाही.कदाचित असे वागण्या मागे आमचा  “स्वाभिमान” दडलेला असावा.
       हा लेख माझ्या बालपणीच्या खऱ्या अनुभवांवर आधारित असून, गिरगावातील जीवन आणि आठवणीची उजळणी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

   🔗  "सोनापूर - अंत्य नव्हे अंतिम यात्रा |जीवन, मृत्यू आणि वास्तवाचा विचारप्रवर्तक मराठी लेख " 

     पुढच्या लेखात सोनापूर गल्ली आणि तिथली भावनिक आणि  भारावलेली परिस्थिती, या वर प्रकाश झोत टाकणारा पुढील लेख..👉 

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा

पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.

तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा


SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved


🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

(ओमकार शिवलकर )


SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी- अधिकृत लोगो



📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

  1. गिरगाव डोळ्यासमोर उभे राहिले. बालपण सुंदर रेखाटले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार ओमकार दादा! शब्दांची मुशाफिरी फारच छान आहे. छानच लिहिता. वेगवेगळ्या विषयांवरील लेखन 👌👌
    पक्का बदाम वाचताना माझ्या बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही मालाड ला राहात होतो . फणसवाडीत आजी आजोबा काका वगैरे राहात होते. मे महिन्यात तसेच दिवाळीच्या सुट्टीत आणि सणवार फणसवाडीत साजरे होत असत. माझी आत्या देना वाडीत राहात होती. म्हणून स. का. पाटील
    उद्यानात खेळायला जात होते. पण बदाम गोळा केलेले आठवत नाही. 😃 एवढेच मला शेअर करावेसे वाटले. 🙏
    आपण खूप छान लिहिता. तुमच्या लघुकथा वाचायला आवडतील. तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  3. या कमेंट उत्साहवर्धक आहेत !

    उत्तर द्याहटवा
  4. खरोखर प्रत्यक्ष परिस्थिती तुमच्या लेखामुळे समोर आली वास्तवकारी लेखन..छान

    उत्तर द्याहटवा
  5. खुप छान लेखन.प्रत्यक्ष प्रसंग समोर घडतोय असे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  6. खुप छान लेखन.प्रत्यक्ष प्रसंग समोर घडतोय असे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद वगळ ताई ! तुमचे अभिप्राय कायम प्रार्थनीय आहेत, त्या उत्साहवर्धक असून त्या मुळे मला अजून लिखाण करण्याची प्रेरणा मला मिळत आहे. स्वामी हो!

    उत्तर द्याहटवा
  8. धन्यवाद!सुन्दर अभिप्राय,मनाला हुरूप देणाऱ्या !!

    उत्तर द्याहटवा
  9. खूपच सुंदर आणि जिवंत चित्र उभं करणारं लेखन 👏✨
    बालपणीच्या निरागस खोड्या, गिरगावचं वातावरण आणि त्या आठवणींची उब अगदी डोळ्यासमोर उभी राहते.
    “पक्का बदाम” मधून मिळालेला स्वाभिमान आणि शिकवण खूप छान मांडली आहे 🙏

    उत्तर द्याहटवा
  10. बालपणीच्या आठवणींचं इतकं जिवंत चित्रण अप्रतिम 👍
    त्या निरागस खोड्या आणि त्यातून मिळालेली शिकवण मनात घर करून राहते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...