अस्वीकरण -
हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. याचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे.या कथेत वर्णन केलेल्या गोष्टी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून केवळ कथानकाचा भाग आहेत. ही कथा भयप्रधान आहे. यास्तव कमकुवत मनाच्या वाचकांनी काळजी घ्यावी.
‘हळद रुसली’ - गिरगावातील ती रात्र - खरी भयानक घटना
हळद कुटली, हळद भिजली,
वाग्दत्त वधूच्या कांतीवर चढली।
साज चढला हळदीचा,
जीव हरपला नवरीचा।
अशांत, अतृप्त जीव भरकटला,
दुसऱ्या जीवात समाधान शोधू लागला।
जे साध्य झाले नाही सदेह,
त्या पूर्तीसाठी तडफडे तो निर्देह।
वाग्दत्त वधूच्या कांतीवर चढली।
साज चढला हळदीचा,
जीव हरपला नवरीचा।
अशांत, अतृप्त जीव भरकटला,
दुसऱ्या जीवात समाधान शोधू लागला।
जे साध्य झाले नाही सदेह,
त्या पूर्तीसाठी तडफडे तो निर्देह।
🔗 'सिंगापूर स्टोरी |सिंगापूरमध्ये भारतीय जोडप्याला मुलगा दत्तक मागणाऱ्या जोडप्याची हृदयस्पर्शी कथा..
मागील लघुकथा ही सिंगापूर मध्ये फिरायला गेलेल्या भारतीय जोडप्या कडे त्यांचा मुलगा दत्तक मागणाऱ्या इंडो- चायना जोडप्याची लघु कथा. संतती प्रेमा पोटी अभागी, वंचित असलेल्या माऊलीची कथा तुम्ही वाचली असेल..
“हळद रुसली”
पुढील लघु कथा ही एक भयकथा आहे, ही गिरगावातील एका जुन्या इमारतीत घडलेली अंगावर काटा आणणारी मराठी भयकथा आहे. एका अविवाहित तरुणाला पिशाच्च शक्तींच्या जाळ्यात अडकवून त्याचे भुताशी लग्न लावण्याचा प्रयत्न आणि ‘सदगुरू दत्त’ नामामुळे झालेली त्याची थरारक सुटका! ही कथा वाचताना प्रत्येक क्षणी भीतीची जाणीव होईल.
“हळद रुसली” | गिरगावातील जुन्या इमारतीतील पिशाच्चाची थरारक मराठी भयकथा
ही एक भयकथा गिरगावातील चिराबाजार मधल्या एका इमारतीमध्ये घडलेली आहे..
गिरगावातील जुन्या इमारतींशी संबंधित अनेक गूढ कथा आजही लोकांच्या स्मरणात जिवंत आहेत. त्यापैकीच ही अंगावर काटा आणणारी मराठी भयकथा एका अविवाहित तरुणाच्या आयुष्यात घडलेल्या अनाकलनीय घटनांवर आधारित आहे. पिशाच्च शक्तीच्या जाळ्यात अडकून त्याचे भुताशी लग्न लावण्याचा भयावह प्रयत्न आणि शेवटच्या क्षणी 'सद्गुरू दत्त' नामाच्या स्मरणाने झालेली थरारक सुटका या कथेला वेगळीच गूढता प्राप्त करून देते. भीती, श्रद्धा आणि अदृश्य शक्ती यांचा हा रोमांचक संगम वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
गिरगावात आम्ही एकत्रित कुटुंब पद्धतीत राहत होतो. तेव्हा आमचा कुटुंब कबीला मोठा होता. खूप मजेचे ते दिवस होते. गणपतीचे दिवस,होळी,दसरा अशा सणाच्या दिवसाच्या आदल्या रात्री एकतर आमचा पत्त्यामधील ‘मेंढी कोटचे’ डाव रंगायचे किंवा आमची ‘ रात्र गजाली’ मध्ये तरी रंगलेली असायची. ‘गजाली ‘ म्हणजे गावाकडे संध्याकाळी कट्ट्यावर, अंगणात किंवा झाडाखाली बसून मारलेल्या गप्पा यात विनोद, टोमणे, जुन्या आठवणी,भुतांच्यागोष्टी,मजेदारकिस्से,स्वानुभव,गावकथा सगळ काही त्यात असायचे.गावी तर आम्ही सर्व लाईट्स बंद करून अशा गजाली करायचो. त्यामुळे भुतांच्या गोष्टी ऐकताना भीतीचे वातावरण निर्माण होत असे. गप्पा इतक्या रंगायच्या की वेळ कसा निघून जायचा तेच मुळी कळायचे नाही, रात्र सुद्धा कमी पडायची. या ‘गजाली ‘ मध्ये विविध विषयांना स्पर्श असलेले विषय असायचेत. जास्त करून गावाकडच्या नव्या,जुन्या गोष्टी त्यात असायच्या. त्या गजालीत भूताखेतांच्या गोष्टींचे विषय कसे यायचे ते आम्हाला कळायचे सुद्धा नाही. गिरा, हडळ, खवीस, मुंजा,चेटकीण, ब्रह्मराक्षस हि सर्वं निर्देह मंडळीची नावे मी गजालीच्या वेगवेगळ्या किस्सामध्येच ऐकलेली आहेत. आमच्या या ‘गजाल्या’ या मध्यरात्रीपर्यंत सुरू असायच्या. विशेष म्हणजे या ‘गजाल्या ‘फक्त आम्हाला एकत्रित कुटुंब पद्धती मध्येच ऐकायला मिळाल्यात. ‘गजाल्या’ ऐकताना भूतप्रेताच्या गोष्टी आल्यावरच फक्त भीती वाटायची,सकाळी उठल्यावर मात्र काहीच वाटायचे नाही. आम्ही त्यादिवशी अंमळ उशीरा झोपत असलो.तरी सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे नित्यक्रम आमचे वेळेवर पार पडायचे.
या ‘गजाली’ मधील अशाच एका भयकथेवर आपण आता वळूयात ही भयकथा आमच्या भाऊंच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या बालपणीची नाही तर तरुण वयातील आहे. भाऊ तेव्हा 21 वर्षाचे होते. नुकतेच ते नोकरीला लागले होते. आमचे भाऊंनी जी गोष्ट सांगितली आहे. ती गिरगावातील चिराबाजारच्या एका इमारतीमध्ये त्यांना आलेला अनुभव आहे. ज्या खोलीमध्ये ही घटना घडली, ती खोली आम्ही राहत असलेल्या घरातून सहज दिसायची. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे त्या खोलीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कायमचा बदलला. नंतर कधीही त्या खोलीकडे आम्ही पाहिले की भाऊंचा तो अनुभव आमच्या डोळ्यापुढे यायचा. भाऊंनी हा अनुभव सांगितला तेव्हा तिकडे मारवाडी कुटुंब राहत होते. माझ्या बालपणापासून मी त्या घरात त्यांनाच राहताना पाहत आलेलो आहे. त्यांच्याकडे पाहून तरी त्या खोलीत असे काही घडले असेल असे वाटत नव्हते. तो मारवाडी सोन्याच्या व्यापारी होता.
त्याच खोलीच्या बरोबर खालच्या घरात राहत असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकामध्ये हेड क्लर्क असलेल्या एका परिचीत व्यक्तीकडे एका कामानिमित्त मी त्यांच्या घरी गेलो होतो. ती व्यक्ती सुद्धा भाऊच्याच वयाच्या जवळपासची असावी. त्या इमारतीमध्ये शिरत असताना भाऊंचा तो अनुभव समोर आला. त्यांच्या दारात उभा राहुन मी बेल वाजवत होतो, तेव्हा त्या घराचे दार मला स्पष्ट दिसत होते. ते भाऊंचे मित्र असल्याने माझ्याशी मोकळेपणाने बोलत असत. माझ्या कामाचे सांगून झाल्यावर मी त्यांना सहजच भाऊंचा तो अनुभव सांगितल्यावर मी त्या काकांना तो प्रसंग खरा आहे असे विचारले असता ते म्हणाले “हो,हो ! ते सर्व खरे आहे, माझ्या लहानपणापासून वरच्या घरातून वेगवेगळे आवाज यायचे” “मारवाडी कुटुंब वरती राहायला आल्यावर त्यांना सुद्धा सुरुवातीला त्याच्या सोन्याच्या व्यवसायात नुकसान झाले.” “त्यांच्या लग्नाच्या दोन तरुण मुलींनी या बिल्डिंग खालच्या विहीरी मध्ये जीव दिलेला होता,आता ती विहीर बुजवली गेली आहे. त्या मारवाड्याने नंतर काय जादू मंतर केले हे देव जाणो ! आता तो शांतपणे तिकडे राहत आहे.”
‘तात्या ‘ म्हणजे भाऊच्या चुलत्यांना एकच मुलगी होती. भाऊ तिला ‘देऊ ताई ‘ म्हणायचे. ती सख्या बहिणी सारखीच भाऊंवर मोठ्या बहिणीची माया करत होती. तिचे लग्न झाल्यावर नुकतेच ते दांपत्य त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायला आले होते. तिचे पती हे एका शाळेवर ‘मुख्याध्यापक ‘ होते. त्यादिवशी रात्री ते शैक्षणिक व्याख्यानाला गेले होते, व्याख्यान रात्री ९ नंतर सुरू होणार असल्याने त्यांना रात्री येण्यास उशीर होईल म्हणून भाऊंची बहीण म्हणाली "भाऊ ! तू आमच्या घरी जा, ते आज उशिरा घरी येणार आहेत." दोन्ही घरे हाकेच्या अंतरावर होती. ती माहेरवाशीण म्हणून घरी आली होती. मुलीचे घर जवळ असल्यामुळे भाऊंचे चुलते ‘तात्या ‘आणि ‘काकू ‘ आणि भाऊंची ‘ देवू ताई’ एकदम खुश होती. परंतु राहते घर त्यांना फलदायी नव्हते म्हणून ती दु:खी सुद्धा होती. भाऊंच्या ताईला त्या घरात काही चित्रविचित्र भास होत होते. याबाबत भाऊंना काहीच माहीत नसल्यामुळे आणि भाऊ बिनधास्त असल्यामुळे तिने भावोजीच्या सोबतीला रात्री पाठवले. भाऊला सुद्धा तिकडे माझ्यासारखे काही भास होतात का? हे समजेल या कारणाने कदाचित तिने पाठवले असावे.
भाऊ रात्री 9 वाजता घरून जेवून निघाले. त्यापूर्वी त्यांच्या शिफ्टिंगसाठी किंवा इतर कारणास्तव भाऊ त्या घरात अनेक वेळा गेले होते. खरेतर भाऊंना प्रत्येक वेळी ते घर भारावलेले वाटायचे परंतु भाऊ बिनधास्त असल्याने अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नसत. त्या घरची लाईट लावल्यावर भाऊंनी घरातून बहिणीला हात दाखवून मी इकडे आलो हे कळवले. भाऊ,थोड्या वेळाने लाईट आणि फॅन लावून झोपून गेले, झोपताच क्षणी, खरा खेळ सुरू झाला.
भाऊ म्हणाले “मी डाराडूर झोपलो असे मला वाटत होते. पण प्रत्यक्षात मी झोपलोच नव्हतो. मला अनोळखी तीन चार बायकांनी उठवले,त्या घरात खूप पाहुणे आले होते. त्या तीन बायकांनी मला एका चौरंगावर बसवले. त्यापूर्वी एका कोपऱ्यात एक तरुण मुलगी होती. तिच्या अंगाला अगोदरच हळद लावलेली होती. नंतर त्यांनी माझ्या सुद्धा अंगाला हळद लावली. माझ्या अंगाला हळद लावणाऱ्या त्या बायकांमधील 2 बायका या वयाने माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या आणि एक साठ वर्षाची असावी. त्या बायकांचे चेहरे माझ्या डोळ्या समोर अजून आहेत. त्यांनी चोपडून चोपडून माझ्या अंगाला हळद लावली.लग्नाच्या वेळेत जशी हळद लावतात तशीच .माझे आता लग्न होणार की काय म्हणून मी सुद्धा झोपेत खुश होतो. लग्नाच्या वयात आलेल्या मुलांना लग्नाबद्दल आकर्षण आणि उत्सुकता असतेच. तशी ती माझ्यात सुद्धा होती.
त्यांनी फक्त माझे डोळे ठेवून माझ्या पूर्ण अंगाला हळद थोपटून ठेवली होती. माझ्या भोवती त्या तीन बायकांनी गाणी म्हणत फेर धरला होता, बाकीचे वऱ्हाडी सुद्धा तिथे होते. कोणत्या तरी भाषेत ती मंडळी गाणी म्हणत होती ते मात्र कळत नव्हते. बराच वेळ त्यांचा तो कार्यक्रम सुरू होता,वेगळया प्रकारचे संगीत त्यावेळी वाजत होते नंतर त्यांनी मला अंघोळीला नेले. मी स्वतःच सैचैल अंघोळ केली,हळद उतरली. मला लग्नात नवरदेव घालतात तसे चांगले कपडे घालायला दिले. मग त्यांचा वेताळ होता की कोण जाणे,काय माहित नाही ? तो आला आणि त्याच्या पुढ्यात आम्हाला दोघांना बसवले गेले.मुलींचा चेहरा पदराने झाकलेला होता. मला नवऱ्या मुलीचा चेहरा दिसून येत नव्हता. मी त्यांना म्हणालो लग्न माझे सुद्धा आहे. माझी माणसे कुठे आहेत?” तात्या,काकू व माझी इतर माणसे कुठेच दिसत नव्हते. मी एका बाईला विचारले की “माझी माणसे कुठे आहेत ?” त्यावर ती बाई म्हणाली की “ते यायलाच निघाले आहेत. त्यांनी सांगितले आहे की तुम्ही भाऊंचे लग्न आटोपून घ्या”. “मला त्या सर्व बायका आणि त्यांचे सर्व उपस्थित वऱ्हाडी दिसत होते.लग्नाचे विधी आटोपले आणि सप्तपदीला सुरूवात झाली परंतु ते विधी अग्नी भोवती नाही तर माणसाच्या मुंडक्या भोवती सुरू होते. घुंघट घेतलेल्या नवऱ्या मुलीने माझा हात पकडून मुंडक्या भोवती फेऱ्या मारायला सुरुवात केली.
जसजशी सप्तपदी पुढे जात होती, तसतशी ती मुलगी माझा हात जोरात पकडून ठेवत होती. तिचा हात कोमल,मऊ नव्हता.ती सर्व वऱ्हाडी मंडळी खुशीत होती,ती मुलगी घुंघट मधून माझ्याकडे बघून विचित्र हसत होती. ते बघून मला जरा वेगळेच वाटले. शेवटची सप्तपदी सुरू झाली आणि तिचा घुंघट थोडा वर गेला आणि मला तिचा संपूर्ण चेहराच दिसला तर तो चेहरा ‘भूताचा ‘ होता. तिला ओली हळद थोपटल्यामुळे अगोदर तिचा चेहरा मला दिसला नव्हता आणि आतातर घुंघट असल्यामुळे तो अजिबातच दिसत नव्हता. अचानक तिचे खरे रूप पाहताच माझी पाचावर धारण बसली. मी तिचा हात सोडायचा खूप प्रयत्न करत होतो. ती माझा हात जोरात पकडून मला तिच्या मागोमाग ओढत पुढे नेत होती. खरेतर शास्त्रानुसार सप्तपदी मध्ये नवरा पुढे असतो.परंतु इथे मात्र मी मागे आणि ती पुढे होती. ती मला जोरात पुढे खेचत होती ,तर तिला मी मागे खेचत होतो. त्यामुळे ती शेवटची सप्तपदी पूर्ण व्हायलाच मागत नव्हती. मी ‘सदगुरू दत्ताचे’ नाव घेऊन तिचा हात जोरात झिडकारला,जो हात सोडायचा मी एकसारखा प्रयत्न करत होतो आणि जो हात सुटायलाच मागत नव्हता. तोच हात ‘सदगुरु दत्ताचे‘ नाव घेताच,हात झिडकारल्या बरोबर अलगदपणे सुटला.माझा हात सुटल्याबरोबर मी सप्तपदीच्या वेदीवरून लगेच बाहेर पडलो.
त्यामुळे सर्व वऱ्हाडी मला पकडायला पुढे आले. त्या सर्वांनी मला गच्च पकडून ठेवले आणि परत सप्तपदीच्या वेदीवर घेऊन जायला लागले. मला सदगुरू नावाचा महिमा आणि त्यातील दैवी शक्तीचा अनुभव आला होता. त्यामुळे मी परत “सदगुरू दत्ता, मला वाचव “ असे जोरात म्हटल्या बरोबर ती वऱ्हाडी मंडळी माझ्यापासून दूर फेकली गेलीत. ती नवरी मुलगी तिचे ते भुताटकीचे थोबाड घेऊन माझ्या अंगावर धावून आल्याबरोबर परत मी ‘ सदगुरू दत्ताच्या ‘ नावाचा जोरजोरात धावा सुरू केल्या नंतर माझा दरवाजापर्यंतचा मार्ग मोकळा झाला.
धडपडत,कसाबसा मी बाहेर पडलो. दारापुढे छोटा जिना असल्याने त्या धडपडीत त्या जिन्यावरून घसरत थेट दोन जिन्यांच्या पॅसेज मध्ये येऊन पडलो आणि दुसरा जिना सुद्धा कसा तरी उतरत खाली आलो. बाहेर आलो,रस्ता सुनसान होता,रस्त्यावर बृहन्मुंबई महानगर पालिकाचे चे दिवे थंड आणि मंदपणे आपला प्रकाश पसरवत होते.हवेत थंडपणा होता. मी उघडा असल्यामुळे की भीतीने ? मला अचानक हुडहुडी भरली. आता सारखे बृहन्मुंबई महानगर पालिकाचे दिवे तेव्हा भगभगणारे नव्हते. रोडच्या अलीकडे पलीकडे काही लोक पथाऱ्या टाकून चिरनिद्रेत होते. जिन्यावरून पडल्याने की काय मला काही ठिकाणी मुका मार लागला होता. माझे अंग दुखत होते.
मी त्या बिल्डींगच्या गेट पासून जरा लांबच गेलो कारण परत ती भुताटकी माझ्या मागोमाग आली तर कमीत कमी तिथून मला पळता तरी येईल. इतक्यात भावोजी त्यांच्या ‘ वेस्पा ‘ नावाच्या स्कूटरवरून आले. “मला विचारले काय झाले भाऊ ? “मी म्हटले की “भावोजी झोप येत नाही.मी घरी जातो.” ते आधुनिक विचाराचे असल्याने त्यांचा या गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता. पण पुढे पुढे त्यांना सुद्धा त्या घरात असे काही प्रसंग आणि धक्के जाणवले की मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे त्यांनी ते घर अल्पावधीत सोडले.
उघड्या अवस्थेतील भाऊ परत काही त्यांच्या घरी शर्ट आणायला गेले नाहीत. सकाळी तात्यांनी विचारले "भाऊ तुझ्या अंगाला मार कसला लागला आहे?" त्यावर भाऊंनी त्यांना काल रात्री सर्व घडलेला प्रसंग सांगितला.ते सुद्धा अचंबित झाले, भाऊ कधी खोटे बोलणार नाही हे त्यांना माहीत होते. मग भाऊंना अधून मधून विचित्र स्वप्न पडायला लागलीत. त्यातील एक हळद लावलेली बाई स्वप्नात येऊन भाऊंना म्हणायची " माझा हात सोडून,तू मला धक्का मारून निघून गेलास.मी तुझ्यावर रागावली आहे, रुसली आहे. मी तुला सोडणार नाही, तू परत ये,मी तुला इथून रोज बघत असते !" ही गोष्ट सुद्धा भाऊंनी तात्यांना सांगितली. तात्या सुद्धा चिंतेत पडले.
आमचे भाऊ, घाबरट बिलकुल नव्हते परंतु ही अशी विचित्र स्वप्ने त्यांच्या झोपेची वाट लावत होती. ऑफिसमध्ये याच्या कामात खंड पडू लागला,खाडे व्हायला लागले. तो प्रसंग आणि ती स्वप्नं आठवून भाऊंचे मन कामात लागेनासे झाले. एकदा तर ऑफिसमधून उशीरा घरी येताना भाऊची सायकल घसरली आणि भाऊंना खूप मार बसला. तात्यांना हे समजल्यावर ते भाऊंना घेऊन ‘गाणगापूर’ येथे जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा प्रवासाची साधने जास्त नसल्यामुळे प्रवासाला जायचे म्हणजे खूप त्रासदायक होते म्हणून त्यांनी नंतर विचार केला की महिना भरात येणाऱ्या ‘मार्गशीर्ष ‘महिन्यात भाऊंकडून ‘ श्री गुरुचरित्राचे’ पारायण करून घेऊयात. तात्या हे ‘दत्त संप्रदायीक’ असल्याने त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात भाऊंकडून विधिवत ‘श्री गुरूचरित्राचे ‘साप्ताहिक पारायण करुन घेतले आणि त्यानंतर रुसलेल्या हळदीने भाऊंचा नाद सोडला. भाऊंच्या ताईला त्या घराने भरपूर मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.भाऊंचा अनुभव लक्षात घेऊन ‘ देवू ताईने’ ते घर सोडण्याचा निर्णय घेतला.
गिरगाव भागातील बहुतांशी चाळी हया ‘पागडी ‘ पद्धतीच्या होत्या म्हणजे भाडेकरूंकडे घराची मालकी असते परंतु मूळ घर मालक हा दुसराच असतो. त्या घराचे भाडे दरमहा घर मालकाला द्यावे लागे.ज्या घरात हा प्रकार घडला त्या घराचा पागडी मालक सुद्धा आमच्याच बिल्डिंगचा घर मालक होता. त्याला त्या इमारती मध्ये शिरताना मी पाहिले होते. त्यानंतर काही वेळाने तो भाडे घेण्यासाठी आमच्या बिल्डिंग आला तेव्हा मी त्याला बाजूला घेऊन विचारले की “अमुक एका बिल्डिंग मधील मारवाडी रहात असणाऱ्या घरात आमचे नातेवाईक राहत होते.” तो म्हणाला, “हो मला माहीत आहे.त्यांना त्रास होत असल्यामुळे ते घर त्यांनी सोडले”. त्याक्षणी मी कुतुहलाने त्यांना विचारले “त्या झपाटलेल्या घरात ते मारवाडी कुटुंब कसे काय बरे स्थिरसावर झालेत ? “ त्यावर तो घरमालक म्हणाला “ तू लहान आहेस पण हुशार आहेस ! तुला ती गोष्ट मला आता सांगायलाच हवी” आणि त्याने सांगितले की “ते घर त्यांना असेच लखलाभ झालेले नाही. त्यांच्या घरातील दोन तरुण लग्नाच्या मुलींनी बिल्डिंग खाली असलेल्या विहिरीत जीव दिला आहे. दोघींनी एका पाठोपाठ जीव दिल्याने मारवाडी मनातून घाबरला होता. त्या घरात आल्यामुळे त्याचे सोन्याच्या व्यापारात नुकसान झाले होते.
गिरगावातील इतर घरांच्या तुलनेत ते घर खूप मोठे होते, त्याचे जवळपास दुकान असल्यामुळे त्याला घरी येण्या जाण्याच्या आणि सोयीच्या दृष्टीने ते घर फार उपयोगी होते. यावर उपाय म्हणून त्याने त्याच्या गावावरून मांत्रिक आणले. एक आठवडा त्या घरात राहून त्यांनी जारण मारण करुन त्या भूतांचा बंदोबस्त केला आणि त्या घराची शुद्धी केली.” मग मी म्हटले “त्या घरात ती भुते आली कशी ?”त्यावर तो घर मालक म्हणाला “मला सुद्धा कुणाला सांगू नको या अटीवर वडिलांनी हे सांगितले आहे. वडिलांनी मला जेव्हा ही तंबी दिली याच घटनेला आता पन्नास वर्ष होऊन गेली आहेत म्हणून तुला आता ती सांगायला काही हरकत नाही म्हणून मी हे तुला सांगतोय, गिरगावातील बिल्डिंग ह्या खूप जुन्या आहेत. मुंबईत कारखानदारी आणि कापड उद्योगामुळे कोकणातून खूप माणसे नोकरीसाठी मुंबईत आलीत. त्यांच्यासाठी गिरगावमध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बिल्डिंगी बांधल्या गेल्यात. तुमची बिल्डिंग ही सन 1910 ची आहे तर ती बिल्डिंग ही सन 1915 ची आहे. या भागात आमच्या 9 बिल्डिंगी आहेत. त्या सर्व माझ्या आजोबांनी बांधलेल्या आहेत.
त्या नवीन बिल्डिंग मधील ती खोली एका मराठी कुटुंबाने विकत घेतली होती. त्या घरात पाच माणसे राहत होती. नवरा, बायको आणि तीन मुली. त्या तीन मुली पैकी लहान मुलीचे याच भागातील एका मुलावर खूप प्रेम होते, तो कोण होता ? हे काही माहीत नाही. त्या मुलीच्या आईचा आणि दोन बहिणींचा त्या मुलीच्या प्रेमाला पाठिंबा होता. .बापाने हट्टाने तिचे लग्न दुसरीकडे लावून देण्याचे ठरवले होते. परंतु घरातून प्रखर विरोध झाल्यामुळे बापाचा नाईलाज झाला आणि शेवटी त्या मुलीचे तिच्या प्रियकरा बरोबर लग्न लावून द्यायचे ठरले आणि लग्नाची तयारी सुद्धा झाली. लग्नाच्या दोन दिवसापूर्वी हळद लागली आणि ज्या दिवशी तिला हळद लागली त्याचवेळी तिचा प्रियकर अचानक मृत्यू पावला. त्याचे कारण काही कळले नाही. सन 1920 च्या दरम्यान मुंबईत प्लेग आणि स्पॅनिश फ्लूमुळे खूप माणसे पटापट दगावलीत होती, त्यामध्ये तो सुद्धा मेला असावा. हे दुःख सहन न झाल्याने त्या हळदवाल्या नवरी मुलीने त्याच रात्री बिल्डिंग खाली असलेल्या विहिरीत जीव दिला. तिचे दुःख सहन न झाल्यामुळे तिच्या आईला आणि दोन मोठ्या बहिणींना नैराश्य आले आणि त्यामध्ये त्या हाय खाऊन त्या सुद्धा मेल्यात.
मग मी त्याला परत खोदून विचारले की त्यावर मारवाड्याने असे काय केले की आता सगळे सुरळीत सुरू आहे ? त्या मारवाड्याच्या गावचे मांत्रिक त्या खोलीवर आले होते. त्यांना त्यांच्या जारणशक्ती द्वारे त्या भूतांबाबतची सर्व माहिती लक्षात आली. त्या हळद लावलेल्या मुलीला पिशाच्च योनीतून मुक्त होण्यासाठी एका अविवाहित, कुंवाऱ्या मुलाची गरज होती. त्या अशा मुलाचाच शोध घेत होत्या. जर तसा नवरा तिला मिळाला असता तर त्या रुसलेल्या हळदीवाल्या मुलीला पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली असती आणि तिच्या पाठोपाठ इतर तिघींना सुद्धा मुक्ती मिळणार होती. मांत्रिकानी गावाकडे तार पाठवून जो कोणी अविवाहित तरुण माणूस मरायला टेकला आहे, ज्याच्यावर उपचार सुद्धा होऊ शकत नाही. असा तरुण त्या भागातून शोधून मुंबईला आणा. चार पाच दिवसात असा मरणासन्न, गरीब, अशिक्षित युवक ते गावातून घेऊन आले. त्या पिशाच्च बायका या लग्न झालेले पुरुष आणि बाया यांना तसा विशेष त्रास देत नव्हत्या, त्यांना फक्त विचित्र भास व्हायचे, त्या तरुण मुलींना खूप त्रास देत असत, कारण त्यांना भीती होती की त्यांच्या वाट्याचा तरुण या मुलींना मिळेल. आणि अविवाहित पुरुष त्यांना यासाठी हवा होता की त्या रुसलेल्या हळद लावलेल्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिल्यास त्यांना मुक्ती मिळणार होती, म्हणूनच हे सर्व सुरू होते.
मारवाड्याच्या गावावरून मरणासन्न युवक त्या घरात आल्या बरोबर त्याच रात्री त्यांचा विवाह विधी त्या रुसलेल्या हळद नवरीने आणि भूत कंपनीने पार पाडला आणि त्या सर्वांना मुक्ती मिळाली. काही दिवसांनी त्या पिसाटलेल्या मरणासन्न युवकाचा सुद्धा त्याच्या गावी गेल्यावर अंत झाला. त्या घरमालकाचे हे सर्व बोलणे ऐकल्यावर माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. जर आमचे भाऊ ‘सदगुरू दत्ताचे ‘नाव घेऊन बाहेर पडले नसते तर आमच्या भाऊंचा सुद्धा असाच शेवट झाला असता. तात्यांची ‘ दत्त सेवा ‘आणि भाऊंनी घेतलेल्या ‘ दत्त ‘ नावामुळे आमचे भाऊ वाचले.’ दत्त नाम ‘ किती तारक आहे. हे मला तेव्हाच कळले आणि सहजच माझ्या तोंडून ‘जय श्री सदगुरु दत्त “हे नाम बाहेर पडले.

समाप्त🖋️📖📚
🔗 अल्लड प्रेम | बालपणीच्या निरागस प्रेमाची हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा
ही बालपणाच्या अल्लड आणि बालिश वयात घडलेली आहे ती लघु कथा पुढील लेखात..👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

सर जी, खूप भारी 💐💐💐आप लिखते रहो, हम पढते रहेंगे 🙏🌹🙏
उत्तर द्याहटवासोनवणे सरजी! खूप खूप आभार !!
उत्तर द्याहटवाकाय जबरदस्त थरार! शेवटपर्यंत श्वास रोखून धरला.कहाणी वाचताना अंगावर काटा आला. अप्रतिम लेखन आहे आपले.
उत्तर द्याहटवाकाय जबरदस्त थरार! शेवटपर्यंत श्वास रोखून धरला.कहाणी वाचताना अंगावर काटा आला!
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद ! अशाच कॉमेंट्स मिळाव्यात !!
उत्तर द्याहटवाकहाणी वाचताना खरंच भुतं असतात अशी शंका निर्माण होते. तुम्ही ज्या पद्धतीने गोष्ट मांडली आहे ती वाचताना श्वास रोखुनी वाचली व पुढे काय होईल ही उत्सुकता...
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद !!
उत्तर द्याहटवा