मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन विवाहाचे आणि मन कैदेतले | जबरदस्तीचा विवाह, संमती आणि भारतीय कायदा | विचारप्रवर्तक मराठी कथा

 अस्वीकरण -

           हि कथा काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, घटना किंवा प्रकरणाशी संबंध नाही. जर काही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.या लेखामध्ये दिलेली कायदेशीर माहिती सामान्य स्वरूपाची आहे. ती कोणत्याही विशिष्ट प्रकरणासाठी कायदेशीर सल्ला म्हणून वापरू नये. लेखात मांडलेले विचार, विश्लेषण आणि निष्कर्ष हे लेखकाचे वैयक्तिक मत असून  ते सर्व परिस्थितींना लागू होतीलच असे नाही. वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर या माहितीचा वापर करावा.या लेखाचा उद्देश कोणालाही दुखावणे, बदनाम करणे हा नाही.

          "बंधन विवाहाचे आणि मन कैदेतले"|जबरदस्तीचा विवाह, संमती आणि भारतीय कायदा | विचारप्रवर्तक मराठी कथा

बंधन विवाहाचे. मन कैदेतील सामाजिक कथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
बंधन लग्न गाठींचे होते,  मन मात्र आतून रडत होते,
चेहऱ्यावर हसू ठेवले , आयुष्य मात्र मोडून पडले |
जग म्हणते “विवाह”, संस्कारांचा सुंदर मेळ,
तिला मात्र जाणवत होता,स्वप्नांचा बिघडलेला खेळ |
       दिसते पाणी  पण नसते ते पाणी ! साई पदयात्रा, पीक विमा आणि दैनंदिन जीवनातील धक्कादायक अनुभव वेंधळेपणामुळे घडलेल्या तीन धक्कादायक घटनांमधून सतर्क राहण्याची शिकवण घ्या. साई पदयात्रा, चुकीची बाटली आणि कीटकनाशकामुळे जीवावर आलेले प्रसंग हे मागील लघु कथेत होते. आता पुढील लेखात आहे... 

         "बंधन विवाहाचे आणि मन कैदेतले"| जबरदस्तीचा विवाह, संमती आणि भारतीय कायदा | विचारप्रवर्तक मराठी कथा

          विवाह, विवाहातील संमती, कौटुंबिक दबाव आणि भारतीय कायद्याच्या दृष्टिकोनातून समाजातील वास्तव उलगडणारी भावनिक आणि विचारप्रवर्तक लघु कथा पुढील प्रमाणे...विवाह हा केवळ दोन कुटुंबांचा नव्हे, तर दोन व्यक्तींच्या स्वेच्छेने आणि परस्पर संमतीने होणारा आयुष्यभराचा निर्णय असतो. जेव्हा विवाहावर कौटुंबिक दबाव, सामाजिक बंधने किंवा जबरदस्तीची छाया पडते, तेव्हा        त्याचे परिणाम अनेकांच्या आयुष्यावर खोल जखमा करून जातात. ही विचारप्रवर्तक मराठी कथा जबरदस्तीचा विवाह, विवाहातील संमती, मानसिक संघर्ष आणि भारतीय कायद्याच्या दृष्टिकोनातून उलगडणाऱ्या वास्तवाचा भावनिक वेध घेते.
       जबरदस्तीचा विवाह म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्पष्ट संमती न घेता, तिच्यावर दबाव, धमकी किंवा भावनिक प्रभाव टाकून लावलेले लग्न. भारतीय समाजात विवाहाला खूप महत्त्व दिले जाते, परंतु काही वेळा कुटुंबाच्या किंवा समाजाच्या दबावामुळे व्यक्तीला स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्न करावे लागते. ही गोष्ट केवळ नैतिकदृष्ट्या चुकीची नाही, तर कायदेशीरदृष्ट्याही गंभीर आहे.
        भारतात जबरदस्तीच्या विवाहासाठी वेगळा कायदा नसला तरी विविध कायद्यांद्वारे त्यावर नियंत्रण ठेवले जाते. हिंदू विवाह अधिनियमानुसार विवाहासाठी दोन्ही पक्षांची स्वेच्छेची संमती आवश्यक आहे. जर संमती दबावाखाली किंवा फसवणुकीने घेतली गेली असेल, तर असा विवाह न्यायालयाद्वारे रद्द होऊ शकतो.
             विवाह हा दोन व्यक्तींमधील आयुष्यभराचा संबंध आहे आणि त्याचा पाया म्हणजे “संमती”. दोन्ही विवाह योग्य व्यक्तींनी कोणत्याही दबावाशिवाय, स्वेच्छेने आणि पूर्ण समजुतीने विवाहासाठी होकार देणे म्हणजे संमती होय. भारतीय कायद्यात विवाहाला दोन्ही बाजूंची संमती असण्याला खूप महत्त्व दिले गेलेले आहे.न्यायालयांनी ही अनेक वेळा स्पष्ट केलेले आहे की, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार मूलभूत हक्कांमध्ये येतो. त्यामुळे जबरदस्तीने लावलेले लग्न हे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आघात मानले जाते.शेवटी, संमती ही केवळ कायदेशीर अट नाही, तर नैतिक गरज आहे. विवाह यशस्वी व्हायचा असेल तर तो दोघांच्या इच्छेने आणि समजुतीनेच व्हायला हवा.
         हिंदू विवाह अधिनियम १९५५ हा भारतातील हिंदू विवाहांसाठी महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यात विवाहासाठी आवश्यक अटी, पती-पत्नीचे हक्क आणि विवाह रद्द किंवा घटस्फोटासाठी संबंधीचे नियम दिले गेलेले आहेत. या कायद्यानुसार वैध विवाहासाठी काही अटी आहेत. दोन्ही पक्षांची मानसिक क्षमता योग्य असावी, त्यांचे वय कायदेशीर मर्यादेत असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची संमती असावी. या अटींपैकी कोणतीही अट पूर्ण झाली नाही, तर विवाह अवैध किंवा रद्द करता येण्याजोगा ठरू शकतो.
        या कायद्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे “पुराव्याची जबाबदारी”. ज्याने जबरदस्तीचा आरोप केला आहे, त्याने ते सिद्ध करणे आवश्यक असते. हे अनेक वेळा कठीण ठरते, कारण अशा प्रकरणांमध्ये ठोस पुरावे कमी असतात.अनेक केस स्टडीमधून असे दिसते की, कायदा व्यक्तीचे संरक्षण करतो, पण समाजातील दबाव आणि भीती यामुळे अनेकजण न्यायालयात जाण्याचे टाळतात. त्यामुळे कायद्याबरोबरच समाजातील जागरूकता वाढवणेही आवश्यक आहे.
          मानवी जीवनात काही घटना अशा घडतात ज्या केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक आणि कायदेशीर चौकटी मध्येही मोठे प्रश्न निर्माण करतात. जान्हवीचे प्रकरण हे अशाच प्रकारचे आहे.जे पारंपरिक रितीरिवाज, कौटुंबिक दबाव, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कायदेशीर अधिकार यांच्या संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. एका बाजूला एका स्त्रीची वेदना आहे, तर दुसऱ्या बाजूला कायद्याची कठोर चौकट आहे. या दोन्हींच्या मध्ये अडकलेले हे प्रकरण केवळ न्यायालयीन बाब नसून, समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे.
         वरील तिन्ही कायद्यांना स्पर्श करणारी लघु कथा पुढील प्रमाणे -
         अमरावती शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील जुन्या इमारती मध्ये एक कार्यालय होते. बाहेर साधा फलक होता.‘अधिवक्ता एस.जयराम’  (एल.एल.बी.) 
        दररोज अनेक लोक आपापल्या समस्या घेऊन त्या कार्यालयात येत असत. कुणाचे जमिनीचे वाद, कुणाचे कौटुंबिक प्रश्न, तर कुणाचे फौजदारी प्रकरण. जयराम यांनी आयुष्यात शेकडो कोर्ट-कज्जे लढवले होते. अनुभवाच्या जोरावर त्यांना प्रकरणाचे गांभीर्य पहिल्या भेटीतच कळून यायचे. त्या दिवशी दुपारची वेळ होती. उन्हाळ्यातील कडकडीत ऊन, बाहेर तापलेली रुक्ष हवा आणि अंगाला बसणारा गरम चटका आणि आत मध्ये असलेले शांत वातावरण. सीलिंग फॅनचा भुर्रभुर्र.. आणि कुलरचा घूंSS घूंSS…आणि फाईल्सची पाने चाळण्याच्या आवाजा व्यतिरीक्त तिथे कोणताही आवाज येत नव्हता.इतकी शांतता होती.
        जयराम फाईल चाळत बसले होते. इतक्यात कोणी तरी दरवाजा हलकेच उघडला.सवयी प्रमाणे त्यांनी नजर वर न करताच म्हटले “या ”नंतर मान वर करून पाहिले तर दाराशी एक स्त्री उभी होती. साधी साडी, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत अस्वस्थता. मनात निराशा, वय अंदाजे ३२-३३ असावे. ती हळूच आत आली.
“बसा , काय काम आहे?” जयराम यांनी विचारले
ती काही क्षण काही बोलली नाही. जणू शब्द सापडत नव्हते. मग हळू आवाजात म्हणाली
“मला फिर्याद दाखल करायची आहे, माझ्या नवऱ्याविरुद्ध.”
जयराम थोडे सरळ बसले. “तुमचे नाव काय ?”
“जान्हवी ”
“आणि नवऱ्याचे ?”
ती थोडी थांबली. “रघुनाथ”
“काय समस्या आहे?”
ती अचानक भावूक झाली. “तो दुसरे लग्न करतोय,मला सोडून ”
      जयराम यांनी पेन खाली ठेवला. त्यांनी तिच्याकडे नीट पाहिले. काहीतरी वेगळे होते आहे ,या प्रकरणात.
“ मला सर्व सुरुवातीपासून सांगा,मध्येच निष्कर्ष सांगू नका.”
ती खोल श्वास घेते आणि तिची कहाणी सुरू करते,
      “माझी आत्या रुखमाई,ती खूप प्रेमळ आहे. मी लहान होते तेव्हा ती पहिलटकरीण म्हणून बाळंतपणासाठी आमच्या घरी आली होती. मोठा भाऊ म्हणून बाबांनी तिची खूप काळजी घेतली. मी सतत तिच्या जवळच असायची, ती मला खूप लाड करायची..”
जान्हवीच्या डोळ्यांत त्या आठवणींची चमक होती.
“एक दिवस ती बाबांना म्हणजे तिच्या मोठ्या भावाला म्हणाली,
‘मला मुलगा झाला तर जान्हवीचे लग्न मी माझ्या मुलाशी लावणार.”
बाबा म्हणाले “अगं, त्यांचे वय काय असणार आहे, माहित आहे कां ? ती आठ वर्षांनी त्याच्या पेक्षा मोठी असणार आहे ” त्यावर आत्या म्हणाली “माझा नवरा माझ्या पेक्षा ६ वर्षांनी लहान आहे. माझे सासर तालेवार कुटुंब आणि मी त्या मुलाला आणि त्यांच्या घरच्यांना आवडत होती म्हणून त्या मागणीला बापाने आणि तू मोठा भाऊ म्हणून संमती दिली होतीस ना ? तेव्हा तुम्ही कुठे वय पाहत बसले होते” त्यावर बाबा हसून म्हणाले “ठीक आहे, तुझी तयारी आहे ना,मग पुढे पाहुयात”

अधिवक्ता,जयराम शांतपणे तिचे म्हणणे ऐकत होते.

      “सगळ्यांनी तेव्हा ते  हसण्यावारी नेले पण तिने  मात्र ते मनावर घेतले होते  आणि मी सुद्धा कदाचित नकळत ते मनावर घेत आले.”खेळण्यातून निर्माण झालेले नाते.
      “मग तिला मुलगाच झाला,माझे ‘जान्हवी’ म्हणून आत्याने त्याचे नाव  ‘रघुनाथ’ ठेवले. तो माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान पण आत्या मला त्याची मनोमन त्याची ‘बायको’ समजायची. सुरुवातीला मजा वाटायची पण हळूहळू ते खरे वाटायला लागले.”
“तुम्हाला तेव्हा काही समजत होते कां?” जयराम यांनी विचारले.
“नाही, मी लहान होते पण ते ऐकून ऐकून शेवटी तेच माझे वास्तव बनले होते.”
“ वयाच्या १२ वर्षांनी ‘आत्या’ मला तिच्या घरी घेऊन गेली. तेव्हा पासून तिनेच माझा सांभाळ केला.तिथे सगळे मला त्याची बायको म्हणूनच पाहायचे. रघुनाथ तेव्हा लहान होता. तो लहानपणा पासून माझ्या जवळच झोपायचा परंतु कधीच स्पर्श झाला नाही ”
जयराम यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“हे सगळे योग्य नव्हते” ते पुटपुटले.
“पण आम्हाला तेच योग्य वाटत होते” जान्हवी म्हणाली.
वय वाढते तसे  नाते बदलते.
“विजय मोठा होत गेला. आणि आमच्यातले नातेही बदलत गेले. मला वाटायचे,मी त्याची पत्नी आहे. पण तो कधीच तसे वागला नाही.”
“कां ?” जयराम यांनी विचारले 
“तो कधी माझ्या जवळ आला नाही. कधीच त्याने मला स्पर्शही केला नाही. तेव्हा मला समजले नाही पण आता कळतेय की तो कधीच मला मनापासून त्याची पत्नी मानत नव्हता.” 
    “जेव्हा तो २१ वर्षांचा झाला तेव्हा मी २९ वर्षाची होते आत्याने आमचे लग्न लावून दिले. मोठा सोहळा नव्हता,घरगुती कार्यक्रमा सारखाच तो विधी होता”
“त्याची संमती होती का ? विवाह नोंदणी केली होती कां ? “जयराम यांनी थेट विचारले.
जान्हवी शांत झाली.ती पुढे काहीच बोलली नाही 
“याचा अर्थ रघुनाथची संमती नव्हती,” जवळच्या नात्यात लग्न आहे म्हणून विवाह नोंदणी केली नसावी “ जयराम म्हणाले.
जान्हवी म्हणाली “हो! तसेच काहीसे झाले” 
“लग्नानंतर तो मुंबईला शिकायला गेला. तिथे त्याचे आयुष्य बदलले”
“कसे ?” 
“तिथे त्याला दुसरी मुलगी आवडायला लागली..”
जान्हवीचा आवाज थरथरला,डोळे पाणावले.
आता तो म्हणतो,
“हे लग्न मी मानत नाही,माझे जबरदस्तीने लग्न लावले गेले आहे.’”
जयराम काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले
“बाई, हे प्रकरण खूप कठीण आहे. तुमचे दु:ख मला समजते पण कायद्याच्या दृष्टीने” जयराम क्षणभर थांबले. 
त्यावर “माझी बाजू कमकुवत आहे कां ?” जान्हवीने थेट उताविळपणे विचारले.
“हो ! तुमच्याकडे विवाह झाल्याचा कोणताही  ठोस पुरावा नाही आणि त्याची संमती नव्हती,त्याने तुम्हाला कधी स्पर्श सुद्धा केलेला नाही” हे मोठे मुद्दे आहे.”
“पण मी त्याची बायको आहे!” जान्हवीचा आवाज उंचावला.
“तुमच्या भावना योग्यच आहेत. पण कायदा भावनांवर चालत नाही,” जयराम शांतपणे म्हणाले.
  “वयातील फरक ही काही मोठी समस्या नाही. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन त्यांच्या पत्नीपेक्षा २० वर्षांनी लहान आहेत. सचिन तेंडुलकर त्यांच्या पत्नीपेक्षा लहान आहेत. तुझी आत्या ही सुद्धा तिच्या नवऱ्या पेक्षा लहान आहे ”
जर दोघेही प्रौढ स्त्री- पुरुष  स्वेच्छेने विवाह करत असतील, तर वयाचा फरक हा महत्त्वाचा राहत नाही.
पण जर एकाला लहानपणापासून मानसिकदृष्ट्या त्या नात्यात ढकलले गेले असेल, तर तो मानसिक दबाव ठरू शकतो.
     भारतीय कायद्यात विवाहासाठी दोन्ही पक्षांची स्पष्ट आणि स्वेच्छेची संमती आवश्यक आहे. जर कोणत्याही व्यक्तीवर दबाव टाकून, फसवून किंवा जबरदस्तीने विवाह लावला गेला असेल, तर तो विवाह कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरू शकतो.विजयच्या मानसिकतेमध्ये ते स्पष्ट दिसून येते.
       “माझी सहमती नव्हती. माझे लग्न जबरदस्तीने लावले गेले.” हाच त्याचा युक्तिवादाचा आधार असणार आहे.
      “ही गोष्ट न्यायालयात अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण विवाह हा केवळ सामाजिक विधी नसून एक कायदेशीर करार आहे. कोणताही करार संमतीशिवाय वैध ठरत नाही.”
     "विवाहासाठी संमतीचा अभाव, विजयचा स्पष्ट विरोध हे मुद्दे पाहता,कायद्याच्या दृष्टीने जबरदस्तीचा विवाह अवैध ठरू शकतो. तुमचे अपील हे प्राथमिक सुनावणीत,सुरुवातीच्या टप्प्यावरच फेटाळले जाईल आणि निकाल रघुनाथच्या बाजूने जाऊ शकेल” जयराम यांनी शेवटी ही बाब ठामपणे सांगितली.
       ते पुढे शांत पण स्पष्ट शब्दांत म्हणाले, “माझा वैयक्तिक सल्ला असा आहे की आत्या, तिचे संपूर्ण कुटुंब आणि इतर नातेवाईक तुमच्या बाजूने ठामपणे उभे आहेत, ही तुमच्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे सबुरीने, प्रथम कौटुंबिक सहमतीचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करा. जर ते शक्य झाले नाही, तर परिस्थितीनुसार तुम्हा सर्वांना कठोर निर्णय घ्यावा लागेल.
     ‘रघुनाथचे’ मन कोणत्याही योग्य मार्गाने वळवण्याचा प्रयत्न करा. संवाद, समजूत ,कठोर भूमिका आणि कुटुंबाचा  आधार यामुळे अनेक कठीण प्रश्न सुटू शकतात. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि तुमचे आयुष्य पुन्हा सुखी व स्थिर होईल,” असे म्हणत त्यांनी संवाद संपवला.
     ‘रघुनाथ’च्या कुटुंबात ‘जान्हवी’च्या लग्नाच्या विषयावर मोठा कलह सुरू होता. पंचक्रोशीत प्रतिष्ठित आणि तालेवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या परिवाराची मानमरातबाची परंपरा होती. परिस्थिती इतकी टोकाला गेली की रघुनाथच्या आईने त्याला घरातून त्याला निष्कासित केले.ही बातमी समजताच, रघुनाथच्या प्रेमात असल्याचे सांगणाऱ्या त्या मुलीनेही त्याच्याशी असलेला सर्व संपर्क तोडला. त्याच क्षणी रघुनाथच्या डोळ्यांवरील भ्रमाचा पडदा दूर झाला. त्याला उमगले की ती मुलगी त्याच्यावर नव्हे, तर त्याच्या श्रीमंतीवर, ऐश्वर्यावर आणि  ऐशोआरामी जीवनावर  प्रेम करत होती.
       आता रघुनाथ पूर्णपणे एकटा पडला होता. त्या एकटेपणात त्याला आपल्या चुका स्पष्टपणे दिसू लागल्या. त्याच्या मनात सतत एकच विचार घोळत होता  “माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारी, बालमैत्रीण जान्हवीच माझे खरे प्रेम आहे. मी तिच्यावर अन्याय केला, तिला खूप मानसिक त्रास दिला.”
      शेवटी पश्चात्तापाने व्याकुळ होऊन तो अमरावतीला आला. सर्वांसमोर त्याने आपल्या चुका मान्य केल्या आणि मनापासून माफी मागितली. जान्हवीचाच स्वीकार करण्याचा निर्णय त्याने स्पष्टपणे जाहीर केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत त्यांनी कायदेशीर विवाह केला.
      काळ पुढे सरकला. दोन वर्षांनी रघुनाथ आणि जान्हवी आपल्या नवजात मुलाला घेऊन जयराम यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या आशीर्वादासाठी ते नम्रपणे उभे राहिले.तेव्हा जान्हवी हसत म्हणाली,
    “वकील साहेब, तुमचा ‘सबुरी’ आणि ‘कठोर भूमिका’ घेण्याचा सल्ला मी घरी जाऊन माझ्या आत्याला सांगितला. त्यानंतर आत्याने जी ठाम भूमिका घेतली, त्यामुळेच हे सर्व शक्य झाले. आज मी आणि रघुनाथ खरोखर सुखी आहोत.”
त्यावर जयराम प्रेमाने त्या नवजात बालकाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,
“शुभम् भवतु!”

"बंधन विवाहाचे आणि मन कैदेतले"

      जबरदस्तीचा विवाह, विवाहातील संमती, कौटुंबिक दबाव, मुलींचे हक्क, भारतीय विवाह कायदा आणि सामाजिक वास्तव या विषयांवर आधारित हा लेख समाजातील एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. विवाह हा फक्त परंपरा नसून दोन मनांची स्वेच्छेने झालेली साथ असावी, हा संदेश या लघु कथेतून मांडण्यात आलेला आहे.
                                                                                समाप्त🖋️📖📚

🔗शब्दांच्या पलीकडची साधना” - समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकार आणि 3 लघु कथा..

      समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकारांचे जीवन, त्यांची साधना, सद्गुरूभक्ती, दासबोध निरुपण आणि श्रद्धेच्या प्रेरणादायी सत्यकथा वाचा. “सद्गुरू… सदा सहाय्यते”, “जेव्हा श्रद्धेला मिळाले यशाचे फळ” आणि “मरणा अंती परमेश्वर” 3  भावस्पर्शी पुढील कथा... 👉


✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...