मुख्य सामग्रीवर वगळा

3)रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | ट्विन्स (एपिसोड 3 )

 रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | ट्विन्स  (एपिसोड 3 )

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | रेडी टू गो (Episode 3) चे मुखपृष्ठ – जनरल महारथ यांची गुप्त 'ऑपरेशन ट्विन्स' मोहीम, एअर रुथरी A-709 विमान, चार केबिन क्रू आणि इतिहास बदलणाऱ्या विमान अपहरणाच्या तयारीचे प्रभावी चित्रण.

🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हुकूमशहाचा उदय ( Episode 2)👉

रिपब्लिक ऑफ रुथरी |ऑपरेशन सायलेंट चेकमेट – Episode 2 मध्ये रुथरीच्या लोकशाहीचा ऱ्हास, जनरल माँटेरोच्या हुकूमशाहीचा उदय आणि भारतीय वंशाचे लेफ्टनंट जनरल महारथ यांच्या शांत पण निर्णायक संघर्षाची सुरुवात मागील भागात वाचून अनुभवली नसेल वरील लिंक वर क्लिक करून वाचून घ्यावी नंतर पुढील भाग अवश्य वाचावा..

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | ट्विन्स  (एपिसोड 3 )

  रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेटच्या तिसऱ्या भागात कथानक निर्णायक टप्प्यावर पोहोचते. जनरल माँटेरोच्या अभेद्य सुरक्षा कवचातील एकमेव कमकुवत दुवा शोधण्यात लेफ्टनंट जनरल महारथ यशस्वी होतात. 'ऑपरेशन ट्विन्स' अंतर्गत निवडलेले चार केबिन क्रू सदस्य एका तटस्थ देशात विशेष प्रशिक्षण घेतात आणि मानसशास्त्रीय युद्धासाठी तयार होतात. त्याच वेळी रुथरी एअर लाईन्सच्या A-709 या विमानाचे सिडनीकडे होणारे उड्डाण, लुईस आणि व्हिक्टरचा प्रवास, गुप्तचरांचे जाळे आणि इतिहास बदलणाऱ्या एका अभूतपूर्व कारवाईची उलटगणना सुरू होते. रहस्य, लष्करी रणनीती, गुप्तचर कारवाया आणि मानसिक संघर्ष यांनी भरलेला हा भाग संपूर्ण मालिकेतील सर्वात महत्त्वाच्या वळणांपैकी एक आहे.

मागील भाग 3 वरून पुढे..

अ) अभेद्य किल्ला

रुथरीमध्ये एक वाक्य नेहमी ऐकायला मिळत असे

"जनरल माँटेरोला हरवणे कदाचित शक्य असेल पण त्याच्या जुळ्या मुलांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे."

ही केवळ अफवा नव्हती.

ती वस्तुस्थिती होती.

माँटेरोचे जुळे मुलगे लुईस आणि व्हिक्टर हे त्याच्या आयुष्यात त्याच्या जिवा पेक्षा सर्वात मौल्यवान होते.

देश..

सत्ता..

संपत्ती..

लष्कर..

आंतरराष्ट्रीय करार..

या सर्वांपेक्षा त्याच्यासाठी त्याच्या जुळ्या मुलांचे जीव अधिक मोलाचे होते.

त्यांना तो फक्त मुलं म्हणून पाहत नव्हता.

तो त्यांच्याकडे रुथरीच्या भविष्यातील वारसदार म्हणून पाहत होता.

त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी उभारलेली व्यवस्था अत्यंत अभेद्य मानली जात होती.

त्यांच्या प्रत्येक हालचालीची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जात असे.

ते कुठे जाणार..

कोणाला भेटणार..

कोणत्या विमानाने प्रवास करणार..

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही माहिती अत्यंत मर्यादित अधिकाऱ्यांनाच माहीत असे.

त्यांच्या सुरक्षेसाठी निवडलेले अधिकारी आणि सैनिक अनेक वर्षांच्या पडताळणी नंतरच नियुक्त केले जात असत.

ते जवळजवळ सर्वच फ्रेंच वंशाचे असायचे.

माँटेरो प्रती पूर्ण निष्ठावान असलेले.

त्यांच्या सुरक्षा वर्तुळात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती.

रुथरीच्या गुप्तचर संस्थेतील एका अधिकाऱ्याने एकदा विनोदाने म्हटले होते.

"राष्ट्रपती भवनात शिरणे सोपे आहे पण लुईस आणि व्हिक्टरच्या सुरक्षा वर्तुळात नाही."

तो विनोद नव्हता.

ती वास्तवाची कबुली होती.

एक संध्याकाळ..

लेफ्टनंट जनरल महारथ आपल्या कार्यालयात एकटे बसले होते.

टेबलावर रुथरीचा मोठा नकाशा पसरलेला होता.

त्याच्या शेजारी माँटेरोच्या कुटुंबाचा सुरक्षा आराखडा.

अनेक महिन्यांपासून जमा केलेले अहवाल.

प्रवासाची वेळापत्रके.

सुरक्षा पथकांची रचना.

आणि शेकडो टिपण्या.

ते शांतपणे सर्व कागद पुन्हा एकदा पाहत होते.

दारावर हलकी टकटक झाली.

"ये.."

एक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी आत आला.

त्याने एक जाडजुड फाईल टेबलावर ठेवली.

"सर..गेल्या सात महिन्यांचा संपूर्ण अहवाल."

महारथने फाईल उघडली.

पहिले पान.

दुसरे पान.

तिसरे..

शेकडो निरीक्षणे.

हजारो तासांचे गुप्त पाळत ठेवण्याचे काम.

पण निष्कर्ष मात्र एकच.

सुरक्षेत कोणतीही त्रुटी नाही.

महारथने फाईल अलगद बंद केली.

काही क्षण खोलीत शांतता पसरली.

मग ते मंद आवाजात म्हणाले

"प्रत्येक किल्ल्याला दरवाजा असतो.."

"फक्त तो योग्य बाजूने शोधावा लागतो."

गुप्तचर अधिकारी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला.

त्याला समजले..

महारथ अजून हार मानायला तयार नव्हते.

पुढील काही महिन्यांत एक नवीन मोहीम सुरू झाली.

या वेळी लक्ष्य होते,

माँटेरोची सुरक्षा नव्हे..
तर त्याच्या सुरक्षेवर विश्वास ठेवणारे लोक.

महारथच्या विश्वासू गुप्तचरांनी प्रत्येक सुरक्षा अधिकाऱ्याचा भूतकाळ तपासला.

आर्थिक व्यवहार.

परदेशातील प्रवास.

कौटुंबिक संबंध.

मित्रपरिवार.

निवृत्त अधिकारी.

माजी कर्मचारी.

माँटेरो पासून दुखावलेले गौर वर्णीय अधिकारी.

एअरलाइनचे कर्मचारी.

कोणालाही त्यातून वगळले गेले नाही.

महिने उलटले..

तरीही यश मिळत नव्हते.

एके रात्री..

महारथसमोर आणखी एक अहवाल ठेवण्यात आला.

त्यात फक्त एकच ओळ अधोरेखित केली होती

"मुलांच्या प्रवासावेळी विमाना मधील कर्मचारी प्रत्येक वेळी बदलतात."

महारथने ती ओळ पुन्हा वाचली.

आणखी एकदा.

आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले.

त्यांनी फाईल बंद केली.

खिडकीबाहेर पसरलेल्या अंधाराकडे पाहिले.

आणि अनेक महिन्यांनंतर प्रथमच ठाम आवाजात म्हणाले

"किल्ल्याचा दरवाजा सापडला.."
"आता ऑपरेशन सुरू करू."

ब) अदृश्य योद्धे

महारथ यांनी दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री एक अत्यंत गोपनीय बैठक बोलावली.

ही बैठक संरक्षण मंत्रालयात नव्हती..

ना लष्करी मुख्यालयात..

तर राजधानी पोर्ट एमेरादोपासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या नौदल प्रशिक्षण केंद्रात गुप्तपणे आयोजित करण्यात आली होती.

अधिकृत नोंदींमध्ये त्या बैठकीचा कोणताही उल्लेख नव्हता.

मोबाईल फोन, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक उपकरणे मीटिंग रूम बाहेर जमा करण्यात आली होती. सर्वांनी त्यांचे पर्सनल मोबाईल्स,घड्याळे घरी ठेवण्याची दक्षता घेतली होती. संपर्कासाठी सोबत जे मोबाईल घेतले गेले ते जवळच्या विश्वासू नौदल अधिकाऱ्यांचे.

खोलीत फक्त सात जण उपस्थित होते.

महारथ..

आणि त्यांचे सहा सर्वाधिक विश्वासू अधिकारी.

भिंतीवर रुथरीचा मोठा नकाशा झळकत होता.

त्याच्या बाजूलाच लुईस आणि व्हिक्टर यांच्या गेल्या दोन वर्षांतील प्रवासाची संपूर्ण माहिती लावलेली होती.

महारथ काही क्षण सर्वांकडे पाहत राहिले.

मग त्यांनी शांतपणे विचारले,

"आपल्या सर्वात मोठ्या अडथळ्याचं नाव काय?"

एका अधिकाऱ्याने उत्तर दिलं

"त्यांची सुरक्षा."

महारथ यांनी मान हलवली.

"नाही."

दुसरा अधिकारी म्हणाला,

"त्यांचे निष्ठावान सैनिक."

"नाही."

तिसरा अधिकारी सावधपणे म्हणाला

"माँटेरो."

महारथ हलकेसे हसले.

"आपला सर्वात मोठा अडथळा आहे.."

"त्यांच्या सुरक्षेबद्दलचा त्यांचा अंध आत्मविश्वास."

खोलीत शांतता पसरली.

महारथ पुढे म्हणाले,

"ज्या दिवशी शत्रूला वाटतं की तो पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याच दिवशी तो सर्वात जास्त असुरक्षित असतो."

त्या बैठकीनंतर गुप्तचर विभागाने नव्या दिशेने काम सुरू केले.

यावेळी लक्ष्य होते,

रुथरी एअरलाइन्स.

गेल्या अनेक वर्षांतील VIP उड्डाणांची नोंद तपासण्यात आली.

कोणत्या विमानात कोणता केबिन क्रू होता..

कोण किती वर्षे सेवेत आहे..

कोणाची प्रतिमा निर्दोष आहे..

कोणावर कोणाचाही संशय येणार नाही..

प्रत्येक तपशिलवार अभ्यास सुरू झाला.

काही आठवड्यांनंतर..

पहिले नाव समोर आले.

एक अनुभवी एअर होस्टेस.

तिची सेवा निर्दोष होती.

प्रवाशांशी संयमी वागणूक आणि संकटसमयी शांत राहण्याबद्दल ती ओळखली जात होती.

दुसरे नावही फार लवकर निश्चित झाले.

तीदेखील वरिष्ठ एअर होस्टेस होती.

तिच्या सेवापुस्तकात एकही शिस्तभंगाची नोंद नव्हती.

तिसरे  नाव शोधण्यासाठी मात्र आणखी काही दिवस लागले.

अखेर निवड झाली.

एका अनुभवी फ्लाइट पर्सरची.

त्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये VIP सुरक्षा प्रोटोकॉल हाताळले होते.

त्याच्याकडे नेतृत्व दिले गेले..

संयम होता..

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे..

तो दडपणाखाली निर्णय घेऊ शकत होता.

चौथे नाव होते ज्युनिअर फ्लाइट पर्सर

नवीन असला तरी डेअरिंगबाज आणि डॅशिंग होता.

फक्त ही निवड पुरेशी नव्हती.

महारथ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले

ती सर्वांची  वैयक्तिक पार्श्वभूमी.

आर्थिक व्यवहार.

कौटुंबिक परिस्थिती.

मानसिक स्थैर्य.

देशाविषयीची निष्ठा.

आणि सर्व काही तपासण्यात आले.

मुख्य म्हणजे ते सर्व जण गौरवर्णीय होते.कधीतरी ते आणि त्यांचा परिवार माँटेरोच्या जुलुमी सत्तेकडून दुखावला गेला होता.त्याचा राग त्यांच्या मनात धगधगत होता.

शेवटी..

ते चार जण महारथसमोर उभे होते.

महारथ यांनी त्यांच्याकडे पाहिले.

"ही मोहीम यशस्वी झाली.."

"तर इतिहासात तुमची नावे दर्ज होतील."

क्षणभर शांतता पसरली.

ते पुढे म्हणाले,

"आणि अपयशी ठरलात तर.."

" जग तुम्हाला दहशतवादी म्हणेल."

तरीही..

त्या चार जणांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती.

फक्त निर्धार होता.

त्यांपैकी एका एअर होस्टेसने पुढे येत शांत आवाजात उत्तर दिलं

"सर..

जर आमच्या एका प्रयत्नामुळे देशातील हजारो निरपराध नागरिकांचे जीव वाचणार असतील आणि देशातील जनतेवर होणारा अत्याचार संपणार असेल तर आमचे प्राण गेले तरी बेहत्तर..सर्वात देश महत्त्वाचा..

तर इतिहासाने आमच्याबद्दल काय लिहिलं, याची आम्हाला चिंता नाही."

महारथ काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले.

मग त्यांनी पहिल्यांदाच त्या मोहिमेचं नाव उच्चारलं,

"ऑपरेशन ट्विन्स."

त्या दोन शब्दांसोबत..

रुथरीच्या इतिहासातील सर्वात धाडसी, सर्वात गुप्त आणि सर्वात विलक्षण मोहिमेला अधिकृत सुरुवात झाली.

क) वेळ आली आहे.

ऑपरेशन ट्विन्सला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात त्या चार केबिन क्रू ना वेगवेगळ्या कारणांनी सुट्टीवर पाठवण्यात आले.

अधिकृत कागदपत्रांनुसार..

एक जण कौटुंबिक कारणासाठी रजेवर होता.

दुसरा वैद्यकीय प्रशिक्षणासाठी परदेशात गेला होता.

तर तिसरा आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा कार्यशाळेला उपस्थित राहणार होता.

तर चौथा पर्यटनासाठी परदेशात गेला होता.

प्रत्यक्षात मात्र..

चौघेही वेगवेगळ्या मार्गाने एका तटस्थ देशात पोहोचले होते.

त्या देशाचे नाव फार थोडक्या लोकांना माहीत होते.

तेथे त्यांची वाट पाहत होते काही निवृत्त लष्करी प्रशिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि महारथ यांच्या विश्वासातील एका आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी.

पहिल्याच दिवशी त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगण्यात आली.

"ही मोहीम शस्त्रांनी जिंकायची नाही.."

" तर मनांवर ताबा मिळवून जिंकायची आहे."

पुढील काही आठवडे त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रशिक्षणाचे ठरले.

त्यांना शिकवले गेले,

दडपणाखाली चेहऱ्यावरचे भाव कसे नियंत्रणात ठेवायचे.

शेकडो प्रवाशांसमोर पूर्ण शांत कसे राहायचे.

खोटे बोलताना डोळ्यांत भीती दिसू न देण्याचे मानसशास्त्र.

गुप्त सांकेतिक संदेश ओळखणे आणि पाठवणे.

निरीक्षणकला.

आणि..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे,

बंदूक न वापरता परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे.

एका प्रशिक्षकाने फळ्यावर मोठ्या अक्षरांत लिहिले.

"भीती ही गोळीपेक्षा वेगाने प्रवास करते."

त्याखाली त्याने दुसरे वाक्य लिहिले.

"लोकांना जे दिसते त्यावर ते विश्वास ठेवतात."

त्या दिवसापासून प्रशिक्षणाचा प्रत्येक क्षण याच दोन वाक्यांभोवती फिरू लागला.

सदर मोहिमेचे गुप्त प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते चौघे पुन्हा रुथरीत परतले.गौर वर्णीय असल्याने त्यांच्या प्रवासावर कोणीच संशय दाखवला नाही.

ते पुन्हा नेहमीप्रमाणे हसत प्रवाशांचे स्वागत करू लागले.

विमानात चहा-कॉफी देऊ लागले.

सुरक्षा सूचना सांगू लागले.

बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकाला ते इतर शेकडो विमान कर्मचाऱ्यांप्रमाणेच साधे वाटत होते.

पण..

त्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एका गुप्त प्रश्नाने होत होती

"आज तो दिवस असेल का?"

दरम्यान..

महारथ यांचे गुप्तचर जाळे एका नव्या माहितीच्या प्रतीक्षेत होते.

लुईस आणि व्हिक्टर यांच्या पुढील परदेश दौऱ्याची माहिती मिळणे अत्यावश्यक होते.

अनेक आठवडे काहीच हालचाल झाली नाही.

आणि मग..

एका पहाटे.

गुप्तचर विभागाच्या सुरक्षित प्रणालीवर एक सांकेतिक संदेश आला.

"प्राथमिक प्रवास मंजूर."

काही मिनिटांत दुसरा संदेश आला.

"गंतव्य - सिडनी."

तिसरा संदेश..

"उड्डाण रुथरी एअरलाइन्स A-709."

खोलीत उपस्थित सर्व अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले.

पण अजून एक प्रश्न अनुत्तरित होता.

त्या फ्लाईट मध्ये ऑपरेशन ट्विन्स मध्ये नेमलेल्या त्या चार केबिन क्रूची ड्युटी असेल का?

दोन दिवसांनी..

तो प्रश्नही मिटला.

महारथ यांच्या विश्वासातील गौर वर्णीय अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ड्युटी रोस्टरमध्ये आवश्यक बदल केले.

कोणालाही संशय न येऊ देता..

त्या उड्डाणासाठी नेमके तेच चौघे निवडले गेले.

त्याच संध्याकाळी..

रुथरीच्या संरक्षण मुख्यालयातील आपल्या कार्यालयात महारथ शांतपणे बसले होते.

त्यांच्यासमोर रुथरीचा नकाशा नव्हता..

तर पोर्ट एमेरादोपासून सिडनीपर्यंतचा हवाई मार्ग दाखवणारा डिजिटल नकाशा उघडा होता.

लाल रंगाची एक रेषा अथांग प्रशांत महासागर ओलांडत ऑस्ट्रेलियाकडे जात होती.

त्यांनी काही क्षण ती रेषा न्याहाळली.

मग हळूहळू उभे राहिले.

खिडकीतून बाहेर पसरलेल्या रात्रीकडे पाहिले.

आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले,

"वेळ आली आहे.."

काही क्षण ते तसेच उभे राहिले.

मग त्यांनी टेबलावरील फाईल बंद केली.

दिवा बंद केला.

आणि दाराकडे वळत शेवटचे शब्द उच्चारले.

"आता खेळ सुरू होईल."

दुसऱ्या दिवशी सकाळी..

रुथरी एअर लाइन्स चे A-709 विमान नियोजित वेळेनुसार पोर्ट एमेरादो विमानतळाच्या धावपट्टीवर उभे होते.

त्यातील कोणत्याही प्रवाशाला कल्पना नव्हती..

की पुढील चार तासांत ते सर्वजण इतिहासाचा भाग बनणार होते.

क्रमशः...🖋️📖📚

वरील एपिसोड 3 आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील एपिसोड 4 साठी 'Sjomkar Blog | शब्दांची मुशाफिरी'ला अवश्य भेट द्या..
आम्हाला फॉलो करण्यासाठी 🔍☰ मधील Follow वर कृपया क्लिक करा.

🔗पुढील भाग: रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4) 👉

  ऑपरेशन ट्विन्स आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे. एअर रुथरी A-709 आकाशात झेपावण्यास सज्ज आहे आणि चार अदृश्य योद्धे इतिहासातील सर्वात धाडसी मानसशास्त्रीय मोहिमेसाठी तयार आहेत. पुढील भागात सुरू होईल विमानातील थरार, जगाला हादरवणारे अपहरण आणि रुथरीच्या भवितव्याला कायमचे बदलून टाकणारा खेळ..

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍 ☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो


𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

📌 Pinterest वर फॉलो करा

📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...