मुख्य सामग्रीवर वगळा

4)रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4)

 रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4)

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4) चे मुखपृष्ठ – एअर रुथरी A-709 विमानाचे अपहरण, चार केबिन क्रूची गुप्त मोहीम, जनरल माँटेरोच्या जुळ्या मुलांना ओलीस ठेवण्याची कारवाई आणि बेलवारीसकडे वळलेले विमान दर्शवणारी थरारक प्रतिमा.


🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | ट्विन्स  (एपिसोड 3 )👉

  रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेटच्या तिसऱ्या भागात कथानक निर्णायक टप्प्यावर पोहोचते. जनरल माँटेरोच्या अभेद्य सुरक्षा कवचातील एकमेव कमकुवत दुवा शोधण्यात लेफ्टनंट जनरल महारथ यशस्वी होतात किंवा कसे ? या विषयी चाललेल्या घडामोडी करिता भाग 3 वाचला नसेल तर वरील लिंक वर क्लिक करा नंतर पुढचा भाव अवश्य वाचा..

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4)

अनेक महिन्यांपासून आखलेल्या 'ऑपरेशन ट्विन्स'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होते. रुथरी एअर लाइन्सचे A-709 हे विमान प्रशांत महासागरावर झेपावताच चार प्रशिक्षित केबिन क्रू सदस्य मानसिक युद्धाच्या जोरावर VIP केबिन, कॉकपिट आणि संपूर्ण विमानावर नियंत्रण मिळवतात. जनरल माँटेरोच्या जुळ्या मुलांना ओलीस ठेवून विमानाचा मार्ग बेलवारीस आयलंडकडे वळवला जातो. एकही गोळी न झाडता, एकही स्फोट न घडवता आणि केवळ धैर्य, बुद्धिमत्ता व मानसशास्त्रीय दबावाच्या बळावर इतिहासातील सर्वात धाडसी विमान अपहरणाची सुरुवात या भागात उलगडते. रहस्य, तणाव, राजकीय कटकारस्थान, लष्करी रणनीती आणि मानवी मनोविज्ञान यांचा उत्कृष्ट संगम असलेला हा भाग संपूर्ण मालिकेला निर्णायक वळण देतो.

अ) उड्डाण

पोर्ट एमेरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ.

सकाळची वेळ.

रनवेवर रुथरी एअरलाइन्सचे आधुनिक A-709 विमान उड्डाणाची वाट पाहत शांतपणे उभे होते. जमिनीवरील कर्मचारी शेवटची तपासणी करत होते. इंधन भरण्याचे काम पूर्ण झाले होते. सामान कार्गो होल्डमध्ये ठेवले जात होते. प्रवासी बोर्डिंग गेटसमोर रांगेत उभे होते.

विमानतळावर सर्व काही नेहमीसारखेच दिसत होते.

पण त्या गर्दीत काही चेहरे असे होते, ज्यांच्या मनात त्या दिवसाचा प्रत्येक क्षण आधीच लिहून ठेवला गेला होता.

दोन  एअर होस्टेस..

दोन फ्लाइट पर्सर..

चारही जण नेहमीप्रमाणे हसत प्रवाशांचे स्वागत करत होते.

त्यांच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता.

जणू हा दिवसही इतर शेकडो उड्डाणांसारखाच होता.

VIP टर्मिनलच्या प्रवेशद्वाराशी काळ्या रंगाच्या बुलेटप्रूफ गाड्यांचा ताफा येऊन थांबला.

दरवाजा उघडला.

सर्व प्रथम बाहेर उतरले काळ्या सूटमधील विशेष सुरक्षा अधिकारी.

त्यांनी काही क्षण परिसराची पाहणी केली.

त्यानंतर बाहेर आले..

लुईस आणि व्हिक्टर.

दोघांचे चेहरे शांत होते.

त्यांना अशा सुरक्षा व्यवस्थेची सवय झाली होती.

त्यांच्या मागे सहा सशस्त्र अंगरक्षक आणि दोन वरिष्ठ सुरक्षा अधिकारी चालत होते.

विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक कोपऱ्याची पुन्हा तपासणी करण्यात आली.

VIP केबिनची सुरक्षा खात्रीशीर असल्याचे कळताचच त्यांना आत जाऊ देण्यात आले.

कॉकपिटमध्ये कॅप्टन 'रॉजर पॉलिन' शेवटची यादी तपासत होते.

वीस वर्षांचा अनुभव.

हजारो तासांचे उड्डाण.

प्रशांत महासागराच्या हवामानाचा अचूक अंदाज.

त्यांच्या शेजारी सहपायलट 'जेम्स लेरॉय' उड्डाण प्रणाली तपासत होता.

"सर्व प्रणाली कार्यरत."

"इंधन?"

"पूर्ण"

"हवामान?"

"स्वच्छ"

रॉजर पॉलिनने हलकेच मान डोलावली.

"आजचा प्रवास शांत जाईल."

नियतीला मात्र काही वेगळेच मान्य होते.

प्रवासी एकामागून एक आपल्या जागांवर बसू लागले.

एका कोपऱ्यात ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी उत्साहाने गप्पा मारत होते.

एका रांगेत व्यावसायिक लॅपटॉप उघडून शेवटची ई-मेल पाठवत होते.

एक वृद्ध दांपत्य सुट्टीसाठी सिडनीला निघाले होते.

दोन लहान मुले खिडकीजवळची जागा मिळाल्यामुळे आनंदाने हसत होती.

कोणालाही कल्पना नव्हती..

की काही तासांनी ते सर्वजण जगभरातील वृत्तवाहिन्यांवर दिसणार होते.

दरम्यान..

एका एअर होस्टेसने अगदी नकळत आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिले.

वेळ नोंदवली.

तिने समोर उभ्या फ्लाइट पर्सरकडे क्षणभर नजर टाकली.

त्याने काहीही न बोलता हलकीशी मान डोलावली.

तोच त्यांचा पहिला सांकेतिक संदेश होता.

"सर्व काही नियोजनानुसार सुरू आहे."

बोर्डिंग पूर्ण झाले.

विमानाचे मुख्य दरवाजे बंद झाले.

रनवेवर परवानगी मिळताच फ्लाईट A-709 हळूहळू पुढे सरकू लागले.

इंजिनांचा आवाज वाढू लागला.

काही क्षणांतच विमान वेगाने धावू लागले.

आणि..

एका झटक्यात धावपट्टी मागे पडली.

रुथरीची भूमी खाली सरकू लागली.

प्रशांत महासागराचे अथांग निळे पाणी खिडक्यांमधून दिसू लागले.

रुथरी एअरलाइन्सचे फ्लाईट A-709 आता सिडनीच्या दिशेने झेपावले.

विमान स्थिर उंचीवर पोहोचताच सीटबेल्टचे चिन्ह बंद झाले.

प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कोणी पुस्तक उघडले.

कोणी झोपायला डोळे मिटले.

कोणी कॉफीची ऑर्डर दिली.

आणि..

नेमक्या याच क्षणाची अनेक महिन्यांपासून वाट पाहणारे ते पाच जण शांतपणे आपल्या जागांवरून उठले.

त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही हसू होते.

पण आता..

इतिहासाने आपले घड्याळ सुरू केले होते.

ब) पहिली चाल

विमानाने समुद्रसपाटीपासून जवळपास अकरा किलोमीटर उंची गाठली होती.

सीटबेल्टचे चिन्ह बंद होताच केबिनमध्ये नेहमीची हालचाल सुरू झाली.

काही प्रवासी मासिके चाळत होते.

काही जण कॉफीची ऑर्डर देत होते.

लहान मुले खिडकीबाहेर ढगांकडे पाहून आनंदाने हसत होती.

सगळे काही इतके नैसर्गिक वाटत होते की, पुढच्या काही मिनिटांत इतिहास घडणार आहे, याचा संशयही कोणालाच आला नसता.

मात्र..

केबिनच्या मागील भागात उभ्या असलेल्या एका फ्लाइट पर्सरने अगदी सहजपणे आपल्या टायची गाठ नीट केली.

तो एक साधा हावभाव नव्हता.

तो होता..

ऑपरेशन ट्विन्स सुरू झाल्याचा सांकेतिक संकेत..

क्षणात बाकीच्या तिघांनी ही जणांनी आपल्या-आपल्या जागा घेतल्या.

दोन फ्लाइट पर्सर आणि दोन एअर होस्टेस अगदी नेहमीच्या कामासाठी चालल्यासारखे शांतपणे VIP केबिनकडे निघाले.

त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच व्यावसायिक स्मित होते.

VIP केबिनचे दार उघडले.

आत लुईस आणि व्हिक्टर आरामात बसले होते.

त्यांच्या भोवती सहा सशस्त्र सुरक्षा रक्षक सावध उभे होते.

दार अलगद बंद झाले.

त्या क्षणापासून..

VIP केबिन बाहेरील जगापासून पूर्णपणे वेगळी झाली.

पहिली एअर होस्टेस दोन पावले पुढे आली.

तिने अतिशय शांत, पण निर्विकार आवाजात म्हटले

"कोणीही शस्त्राकडे हात नेऊ नका."

सुरक्षा रक्षक क्षणभर चकित झाले.

दुसऱ्याच क्षणी चार ही जणांनी आपल्या गणवेशाखालून कमरेला आणि छातीला बांधलेली स्फोटकांसारखी दिसणारी उपकरणे बाहेर काढली.

त्यावरील लाल, हिरवे आणि पिवळे दिवे नियमित लुकलुकत होते.

दृश्य इतके वास्तववादी होते की काही क्षणांसाठी प्रशिक्षित कमांडोदेखील स्तब्ध झाले.

दुसरी एअर होस्टेस म्हणाली

"आम्ही चार ही जण आत्मघाती मोहिमेवर आहोत."

"आमच्यापैकी एक जरी मेला तरी हे विमान जिवंत राहणार नाही."

VIP केबिनमध्ये मृत्यूसारखी शांतता पसरली.

मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याने हळूच आपल्या पिस्तुलाकडे हात नेण्याचा प्रयत्न केला.

त्याच क्षणी फ्लाइट पर्सरने त्याच्यावर पिस्तूल रोखले.

त्याचा आवाज अत्यंत शांत होता.

"तुमच्या प्रशिक्षणात एक गोष्ट शिकवली असेल.."

"धोका ओळखा."

"आता मी सांगतो.."

"जर तुम्ही गोळी झाडली तर आम्ही विचारही करणार नाही."

त्याने आपल्या छातीवरील उपकरणाकडे बोट दाखवले.

"आमच्यासाठी मिशन आधी आहे.."

" जीव नंतर."

मुख्य सुरक्षा अधिकारी जागच्या जागी थांबला.

त्याच्या कपाळावर घाम जमा झाला.

त्याच्यासमोर उभे असलेले लोक खरोखर आत्मघाती होते की ब्लफ करत होते..

हे तपासण्याइतका वेळ त्याच्याकडे नव्हता,विषाची परीक्षा घेणार कोण ? विषाची परीक्षा खरी ठरली तर ?

एक चुकीचा निर्णय..

आणि जनरल माँटेरोचे दोन्ही मुलगे आणि आपला विनाश होऊ शकतो.हे त्यांच्या लक्षात आले.

याच क्षणाची वाट पाहत दुसरा फ्लाइट पर्सर पुढे सरसावला.

त्याने एकामागून एक सर्व सुरक्षा रक्षकांकडील पिस्तुले, अतिरिक्त मॅगझिन आणि संपर्क साधने गोळा करायला सुरुवात केली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे..

एकाही रक्षकाने प्रतिकार केला नाही.

त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता,

"जर ही स्फोटके खरी असतील तर?"

काही सेकंदांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली.

ज्यांच्या हातात काही क्षणांपूर्वी शस्त्रे होती,

ते आता निःशस्त्र उभे होते.

आणि ज्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही खरी स्फोटके नव्हती.

त्यांनी केवळ मानसिक दबावाच्या जोरावर संपूर्ण VIP केबिनवर ताबा मिळवला होता.

लुईसने प्रथमच शांतता तोडली.

"तुम्ही नेमके कोण आहात?"

फ्लाइट पर्सर त्याच्याकडे पाहत म्हणाला

"आम्ही कोण आहोत हे महत्त्वाचं नाही.."

"आजपासून तुमच्या वडिलांना कोणता निर्णय घ्यावा लागणार आहे, हे महत्त्वाचं आहे."

VIP केबिनवरचा ताबा मिळाला होता.

आता उरली होती..

संपूर्ण विमानाची पहिली आणि सर्वात धोकादायक चाल.

क)आकाशातील ताबा..

VIP केबिनवरील नियंत्रण मिळताच फ्लाइट पर्सरने आपल्या मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली.

उड्डाणाला अवघी वीस मिनिटे झाली होती.

योजनेनुसार..

हीच योग्य वेळ होती.

त्याने हलकेच मान डोलावली.

तो सांकेतिक इशारा मिळताच दुसरा फ्लाइट पर्सर शांतपणे VIP केबिनमधून बाहेर पडला आणि कॉकपिटच्या दिशेने चालू लागला.

त्याच्या चालण्यात घाई नव्हती..

मनात कोणतीच घबराहट नव्हती..

जणू तो नेहमीप्रमाणे पायलटला कॉफी देण्यासाठी जात होता.

कॉकपिटचे दार उघडले.

कॅप्टन पॉलिन आणि सहपायलट जेम्स यांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले.

"काही समस्या आहे का?" कॅप्टनने सहज विचारले.

उत्तरादाखल फ्लाइट पर्सरने आपल्या जॅकेटमधून पिस्तूल बाहेर काढले.

दुसऱ्या हाताने त्याने कमरेला बांधलेले स्फोटकासारखे दिसणारे उपकरण दाखवले.

त्यावरील दिवे नियमित लुकलुकत होते.

त्याचा आवाज विलक्षण शांत होता.

"कॅप्टन.. कृपया घाबरू नका."

"आम्ही चारही केबिन क्रू सदस्य या मोहिमेत सहभागी आहोत."

"आमच्यापैकी प्रत्येकाने आत्मघाती स्फोटके परिधान केले आहे."

कॉकपिटमध्ये क्षणात तणाव पसरला.

पॉलिनने सहजपणे आपत्कालीन बटणाकडे नजर टाकली.

फ्लाइट पर्सरने ती नजर ओळखली.

"तुम्ही अनुभवी वैमानिक आहात."

"म्हणूनच मला खात्री आहे की तुम्ही शेकडो निरपराध प्रवाशांच्या जीवाशी जुगार खेळणार नाही."

काही क्षण शांतता पसरली.

मग तो पुढे म्हणाला,

"आता  या विमानाचा मार्ग बदलला जाईल."

"आपण सिडनीला जाणार नाही."

"तर आपण बेलवारीस आयलंडवरील 'पोर्ट सॅन्टन' या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहोत."

कॅप्टन पॉलिनने त्याच्याकडे रोखून पाहिले.

"आणि जर मी नकार दिला तर?"

फ्लाइट पर्सरचा आवाज किंचितही बदलला नाही.

"मग या विमानातील प्रत्येक प्रवासी तुमच्या निर्णयाची किंमत मोजेल, जनरल माँटेरोच्या ट्विन्स सह"

तो काही क्षण थांबला.

मग आणखी एक वाक्य उच्चारले,

"आणि एक गोष्ट अजून.."

"तुमच्या दोघांच्या कुटुंबांवर आमच्या लोकांची नजर आहे."

"म्हणून कोणताही गुप्त संदेश पाठवण्याचा किंवा शहाणपणा करण्याचा प्रयत्न करू नका."

त्या शब्दांनी कॉकपिटमध्ये पूर्ण शांतता पसरली.

कॅप्टन पॉलिनच्या कपाळावर घामाच्या धारा उमटल्या.

वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक आपत्कालीन प्रसंग पाहिले होते.

इंजिन बिघाड..

वादळ..

विद्युत प्रणालीतील बिघाड..

पण अशा परिस्थितीचा त्यांनी कधीच सामना केला नव्हता.

त्यांनी हळूहळू ऑटोपायलट वरील मार्ग बदलला.

डिजिटल स्क्रीनवरची निळी रेषा सिडनीवरून वळली..

आणि प्रशांत महासागराच्या मध्यभागी असलेल्या बेलवारीस आयलंड कडे झुकू लागली.

त्या क्षणी..

फ्लाईट A-709 अधिकृतपणे आपल्या नियोजित मार्गापासून दूर गेले.

दरम्यान, मुख्य केबिनमध्ये दोन एअर होस्टेस वेगवेगळ्या दिशांनी पुढे सरकत होत्या.

एका एअर होस्टेसने इंटरकॉम हातात घेतला.

तिचा आवाज अत्यंत स्थिर होता.

"सर्व प्रवाशांनी कृपया शांत राहावे."

"हे विमान आता आमच्या ताब्यात आहे."

क्षणात संपूर्ण केबिनमध्ये कुजबुज सुरू झाली.

तिने पुढे सांगितले

"आमचे लक्ष्य या विमानातील कोणत्याही प्रवाशाला इजा पोहोचवणे नाही."

"आमची लढाई एका राजकीय व्यवस्थेविरुद्ध आहे."

"आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर बेलवारीस आयलंडवर सर्व प्रवाशांना सुरक्षित सोडण्यात येईल."

"कृपया आपल्या जागेवर बसून आम्हाला सहकार्य करा."

एका मध्यमवयीन प्रवाशाने धैर्य एकवटून विचारले

"तुमच्या मागण्या तरी काय आहेत?"

केबिनमधील शेकडो नजरा त्या एअर होस्टेसकडे वळल्या.

ती क्षणभर शांत राहिली.

मग प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारत म्हणाली

"रुथरीचे जनरल माँटेरो यांनी तात्काळ सत्तेचा राजीनामा द्यावा."

क्षणभर संपूर्ण विमानात शांतता पसरली.

आणि पुढच्याच क्षणी..

त्या शांततेने इतिहासाला दिशा बदलायला सुरुवात केली.

ड) अनपेक्षित साथ..

"रुथरीचे जनरल माँटेरो यांनी तात्काळ सत्तेचा राजीनामा द्यावा."

हे शब्द संपूर्ण केबिनमध्ये घुमले आणि काही क्षणांसाठी काळच जणू थांबला.

कोणीही बोलत नव्हते.

प्रत्येक प्रवासी समोर उभ्या असलेल्या त्या दोन एअर होस्टेसकडे पाहत होता.

भीती..

आश्चर्य..

अविश्वास..

सर्व भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.

मागच्या रांगेत बसलेल्या एका वृद्धाने शांतपणे हात वर केला.

"एक प्रश्न विचारू का?"

एअर होस्टेसने मान हलवली.

"तुम्ही दहशतवादी आहात का?"

तिने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले.

"नाही."

"आम्ही कोणत्याही निरपराध माणसाचा जीव घेण्यासाठी ही मोहीम आखलेली नाही."

"आमची लढाई एका हुकूमशाहीविरुद्ध आहे."

त्या उत्तराने अनेक प्रवासी एकमेकांकडे पाहू लागले.

त्यांच्यापैकी बरेच जण माँटेरोच्या राजवटीचा त्रास भोगलेले होते.

एका तरुणाने हळूहळू उभे राहत म्हटले,

"जर तुमचे लक्ष्य लोकांना मारणे नसून हुकूमशाही संपवणे असेल.."

"तर मी तुमच्या आड येणार नाही."

त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेनेही शांतपणे मान डोलावली.

थोड्याच वेळात आणखी काही प्रवासी उठले.

कोणी घोषणा दिली नाही.

कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत.

पण त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशेची एक हलकीशी झलक दिसत होती.

त्यांपैकी एका उद्योगपतीने पुढे येत विचारले,

"आम्ही काही मदत करू शकतो का?"

फ्लाइट पर्सरने प्रथमच हलकेसे स्मित केले.

"हो."

"शांत राहा."

"भीती पसरू देऊ नका."

"आणि कोणालाही उतावळेपणा करू देऊ नका."

तिने पुढे म्हटले,

"आज या विमानात प्रत्येकाचा संयमच सर्वात मोठे शस्त्र आहे."

त्या क्षणापासून वातावरण बदलू लागले.

काही प्रवाशांनी लहान मुलांना शांत करण्याची जबाबदारी घेतली.

डॉक्टर असलेल्या एका प्रवाशाने स्वतःहून सांगितले,

"जर कुणाची तब्येत बिघडली तर मी मदत करीन."

दोन परिचारिकांनीही त्याला साथ दिली.

काही मिनिटांतच..

भीतीची जागा शिस्तबद्ध शांततेने घेतली.

दरम्यान VIP केबिनमध्ये लुईस आणि व्हिक्टर निःशब्द बसले होते.

त्यांनी प्रथमच VIP केबिनच्या मोकळ्या दरवाजातून जनरल केबिन मधील हालचाल पाहिली.

व्हिक्टरने हळू आवाजात विचारले,

"लोक..तुमच्याविरुद्ध का उभे राहत नाहीत?"

फ्लाइट पर्सर शांतपणे म्हणाला,

"कारण भीतीवर उभी राहिलेली सत्ता बाहेरून मजबूत दिसते.."

"पण लोकांच्या मनात ती आधीच हरलेली असते."

त्याच वेळी कॉकपिटमधून संदेश आला.

"मार्ग बदल पूर्ण."

"पोर्ट सॅन्टन  दोन तास पंचेचाळीस मिनिटे."

फ्लाइट पर्सरने घड्याळाकडे पाहिले.

योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला होता.

विमान आता अधिकृतपणे सिडनीच्या मार्गावर नव्हते.

ते अथांग प्रशांत महासागर ओलांडत बेलवारीस आयलंडच्या दिशेने वेगाने झेपावत होते.

खिडकीबाहेर..

निळाशार महासागर शांत दिसत होता.

पण त्या विमानाच्या आत..

एका राष्ट्राच्या भविष्याला बदलून टाकणारे वादळ वेगाने आकार घेत होते.

रुथरी एअर लाइन्सचे फ्लाईट A-709 आता अधिकृतपणे बेलवारीस आयलंडच्या दिशेने वळले आहे. जनरल माँटेरो समोर आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय उभा राहणार आहे, तर लेफ्टनंट जनरल महारथ यांनी आखलेल्या 'ऑपरेशन सायलेंट चेकमेट'चा पुढील टप्पा सुरू होणार आहे. पुढील भागात जगभरातील सरकारे, लष्करी मुख्यालये आणि वृत्तवाहिन्या एका विमानाकडे डोळे लावून बसलेली असतील. आता हा संघर्ष केवळ एका विमानाचा राहिलेला नाही.तो संपूर्ण रिपब्लिक ऑफ रुथरीच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे.

                                                                              क्रमशः...🖋️📚📖

🔗पुढील भाग: रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5) 👉

जिथे बारा तासांची उलटगणना सुरू होईल आणि एका हुकूमशहाचे भविष्य ठरणार आहे.पुढे वाचा..

वरील एपिसोड 4 आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील एपिसोड 3 साठी 'Sjomkar Blog | शब्दांची मुशाफिरी'ला अवश्य भेट द्या..
आम्हाला फॉलो करण्यासाठी 🔍☰ मधील Follow वर कृपया क्लिक करा.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍 ☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो


𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

📌 Pinterest वर फॉलो करा

📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...