मुख्य सामग्रीवर वगळा

" तो जळाला..पण अजूनही दार ठोकतोय " एक थरकाप उडवणारी भय कथा !

अस्वीकरण - हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. याचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी  संबंध असणे किंवा नाम साधर्म्य असणे हा निव्वळ योगायोग आहे.या कथेत वर्णन केलेल्या गोष्टी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून केवळ कथानकाचा भाग आहेत. ही कथा काल्पनिक भयप्रधान आहे. यास्तव कमकुवत मनाच्या वाचकांनी काळजी घ्यावी                   

" तो जळाला..पण अजूनही दार ठोकतोय " एक थरकाप उडवणारी भय कथा !
" तो जळाला..पण अजूनही दार ठोकतोय "  एक थरकाप उडवणारी भयकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
अपूर्ण प्रेम, अपूर्ण राहिला श्वास,
मृत्यू नंतरही पेटलेला त्याचा आक्रोश खास|
जिथे जळाला तो, तिथेच उभा आहे आज,
दरवाज्याच्या पलीकडे,वाट पाहतोय साज |
       

      🔗  “प्रेमाचा त्रिकोण |एकतर्फी प्रेम, अपूर्ण नाती आणि चुकीच्या निर्णयांची भावनिक मराठी कथा 

        प्रेमाचा त्रिकोण म्हणजे फक्त तीन व्यक्तींची गोष्ट नसते'ती असते तीन मनांची, तीन अपेक्षांची आणि अनेकदा तुटलेल्या आयुष्यांची कहाणी.
       

        " तो जळाला..पण अजूनही दार ठोकतोय "  एक थरकाप उडवणारी भय कथा !

    मुंबईतील अशा अनेक वाड्या आणि चाळीमध्ये आजही अशा घटना घडल्याच्या कथा सांगितल्या जातात,ही सत्य घटना आहे ,आजही लोक तिथे जायला घाबरतात...मूलचंद वाडीची ही कथा त्यापैकीच एक आहे जी आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करते. “ही सत्य घटना आहे ,आजही लोक तिथे जायला घाबरतात"
    मुंबईतील जुन्या वाड्या आणि चाळींशी संबंधित अनेक गूढ कथा आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मूलचंद वाडीची ही अंगावर काटा आणणारी मराठी भयकथा. एका भीषण आगीत जळालेल्या व्यक्तीची आठवण आजही त्या परिसरात भीतीचे सावट निर्माण करते, अशी स्थानिकांची समजूत आहे. रात्री ऐकू येणारे दार ठोठावण्याचे आवाज, अनाकलनीय घटना आणि रहस्यमय वातावरण यामुळे ही कथा शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते.
           माझे बालपण हे काही दिवस रत्नागिरीतील गावखडी या गावाकडे तर काही दिवस मुंबईत प्रभादेवी इथे गेलेले आहे,आम्ही राहत असलेली वस्ती ही 'सिद्धिविनायक मंदिर 'आणि 'नर्दुल्ला टँक' मैदान यांच्या जवळच होती.सुरुवातीला या ठिकाणी असलेल्या असंख्य चाळी ह्या कोकणातून आलेल्या 'कापड गिरणी'  मध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत कामगारांसाठी बांधल्या गेल्या होत्या. या चाळी ‘गिरगाव’ सारख्या 4 मजली इमारती सारख्या नाहीत , या चाळी बैठ्या असायच्या, समोर ऐसपैस जागा असलेल्या आणि नियोजितपणे बांधलेल्या चाळी प्रमाणे असायच्या. वापरण्यास घरा समोर मुबलक जागा आणि स्वच्छ परिसर असे तिचे स्वरूप असायचे. माझ्या आजोळ ची मंडळी आणि आजूबाजूचे वाडीतले रहिवाशी हे बहुतेक मिल कामगार होते.ते वेगळे वेगळे ‘जॉब वर्क’ करायचे. आजीवर माझी जबाबदारी येण्यापूर्वी ती  सुद्धा दादरच्या एका 'कॉटन मिल' मध्ये ‘थ्रेड विंडर’ म्हणून काम करत होती. आजोबा सुद्धा मिल मध्येच होते.ते लवकर निर्वतले.त्या वस्ती मधील बहुतांशी रहिवाशी हे जरी मिल कामगार असले तरी ते सर्वजण सुखी होते.
     त्या वाडीतले बहुतांशी लोक हे रत्नागिरी जिल्ह्यातील  आणि एकमेकांच्या नाते गोत्यातले होते.जवळचे,दूरचे नातेवाईक तसेच गाववाले,समाज बांधव असे ते होते.या मुळे प्रत्येक घरातील लोकांचे एकमेकांशी सौहार्दाचे संबंध असायचे.सगळ्याचे दुःख एकच आणि आनंद सुद्धा एकच असायचा.पाणी भरण्यासाठी दोन पाण्याचे ‘नळ’ होते परंतु कुणाचे त्या वरून कधीच भांडणे झालेली नाहीत. माझे मित्र, सवंगडी हे माझ्या नात्यातील मुलेच होती. त्या मुळे भांडण, रुसवा, मारामारी असे  प्रकार होत नव्हते. दिवसभर आम्ही वाडी समोरील मैदानात खेळायचो,बाजूची घरे सुद्धा नातेवाईक आणि समोरची घरे सुद्धा नातेवाईक ,जिथे जाऊन डोकावयाचे तिथे नातेवाईक असा तो गोतावळा असायचा.
        सन 1972 चे युद्ध मी तिथेच अनुभवले आहे. ब्लॅकआऊट मुळे रात्री पूर्ण अंधार व्हायचा. डोळ्यात बोट घालता येणार नाही.असा काळाकुट्ट अंधार.आकाशात विमानाची घरघर ऐकायला यायची.वाडीच्या बाजूला तयार झालेल्या नवीन हमरस्त्यावरून तेव्हाच्या  तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय ‘इंदिरा गांधी’जेव्हा गेल्या,तेव्हा त्यांना पाहायला अलोट गर्दी जमली होती. डोळ्यावर ‘काळा गॉगल’ घालून गाडीतून हात दाखवत गेलेल्या ‘इंदिरा गांधी’ अजूनही मला आठवतात.      
        ‘कबड्डी’ हा प्रभादेवी भागाचा आवडता खेळ असावा, कारण सर्वत्र तोच खेळ खेळला जायचा. तरुण मंडळी रात्रीची बेचक्या आणि पॉवरफुल बॅटरी घेऊन कोणत्या शिकारीवर जायचे ते काही माहित नाही.पारध मारून त्याची सागुती पाण्याचे नळ असलेल्या पाणवठ्यावर बनायची. ती बनताना सागुतीचा पूर्ण वाडीभर घमघमाट सुटायचा. त्यावेळी आजी मला बाहेर डोकावायला सुद्धा द्यायची नाही. त्याच नळाच्या जागेवर पहाटे ‘दारूची भट्टी’ राजरोस लावली जायची.  तरुण मुले भरपूर होती, कुणाची कसलीच भांडणे नाहीत, छुपी प्रेमप्रकरणे भरपूर होती. काही यशस्वी, काही अपयशी,काही तर पूर्णत्वाकडे गेलीच नाहीत. तर काही प्रेम  प्रकरणांनी स्वतःचा आत्मघात मात्र करून घेतला.
      ही कथा अशाच  असफल प्रेमवीराची आणि त्यातून आत्मघात केल्यानंतर निर्माण झालेल्या भय कथेची आहे.
       या कथेतील युवक “शिवदास’हा 30 वर्षाचा युवक असावा. घरी मोठा- भाऊ वहिनी. ‘हरफन मौला’ असल्या सारखे त्याचे जीवन होते. अविवाहित, आईं नाही, बाप नाही. मोठ्या भावाशी- वहिनीशी भांडण. पहाटे दारूची भट्टी लावायाचा, गाळलेली दारू राजरोस विकायची आणि त्यातून आलेल्या पैशातून स्वतः विदेशी दारू प्यायची आणि जुगार खेळायचा. अय्याश जीवन जगायचा.
     माझी आजी त्याला खूप  समजवायची.तिची समजूत घालण्यापुरता ‘हो, हो,आये” म्हणायचा आणि येरे माझ्या मागल्या अशी त्याची गत होती. बाजूच्या वाडीत  असलेल्या एका मद्रासी मुलीवर त्याचे प्रेम होते तिचे नाव  ‘मीनाक्षी’. तिचे सुद्धा याच्यावर प्रेम होते परंतु भाऊ आणि वहिनीचा पूर्ण विरोध होता. ते म्हणायचे आम्ही तिला घरात घेणार नाही,याचे कारण घर तर एकच होते.घरात भाऊ घेणार नाही आणि घरचा हक्क सुद्धा देणार नाही म्हणून मोठ्या भावाशी भांडायचा.तो खुप दारू प्यायचा.’शिवदास’च्या  घरचे लग्नाला तयार नाहीत म्हणून त्या मद्रासी मुलीने ‘शिवदास’ला नकार दिला आणि  त्याला ती भेटायची बंद झाली.त्या मुळे शिवदास मनातून पूर्णपणे खचला होता. 
        सोबत दारूची लत आणि जुगारातील अपयश. परंतु सर्वात मोठे कारण होते प्रेमभंग.या वरून एकदा ‘शिवदास’ची मोठा भावाबरोबर खडाजंगी झाली आणि त्या रागात  जे करायला नको ते त्याने केले. दुपारची 3 वाजायची वेळ होती. आजी वामकुशी घ्यायला जाणार, इतक्यात ‘शिवदास’ रॉकेलचा कॅन घेऊन आला. माझ्या आजी कडे “गे आये,मला काडेपेटी दे” आजीला वाटले सिगारेट प्यायची असेल कारण त्याने रॉकेलचा भरलेला कॅन दारामागे ठेवला होता. तो मी पाहिला होता परंतु आजीने पाहिला नव्हता. तिने आत मध्ये जाऊन त्या ,शिवदास’ला माचिस पेटी आणून दिली, काडे पेटी दिल्या बरोबर ‘शिवदास’ रॉकेलचा कॅन घेऊन मैदानाकडे ओरडत सुसाट धावत गेला.त्यावर आजी म्हणाली " ह्या शिवदासाक जाम खूळ लागलंय, खुळ्या सारको करता " असे बोलून दोन  मिनिटे झाली असतील. 
       मोठ- मोठ्याने त्याचा ओरडण्याचा आणि त्याला जळताना पाहून बायकांच्या किंचाळण्याचा आवाज येत होता आजी धावत आली काय झाले म्हणून बघायला. तो पर्यंत त्याने पूर्ण पेट घेतला होता .ती आग विझवे पर्यंत तो पूर्ण जळालेला होता, ते पाच लिटरचे कॅन होते.त्याने त्याची पूर्ण आंघोळ केली होती.तेव्हा ‘रॉकेल’ हे सहज  मिळायचे. मी खिडकीतून पाहत होतो.त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. हे सुद्धा मी पाहिले होते.परंतु माझ्या बालमनाला तो काय करतोय हे चटकन लक्षात आले नाही,आजीने मला लगेच खिडकीतून ओढून पदरा आड लपवले कारण बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून. तो पर्यंत जे पहायला नको होते ते सर्व  मला पहायला मिळाले. 
       मांस जळण्याचा वास सर्वत्र येत होता. ‘ शिवदास’ चा मोठा भाऊ आणि वहिनी सुद्धा लगबगीने बाहेर आलेत.त्याला लगेच ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. खूप जळालेला असल्याने रात्रीच त्याने दम सोडला. मैदानात दोन दिवस त्याच्या शर्टाची जळालेली कॉलर तिथेच पडून होती.रात्री सर्व पोलिस फलटण ‘शिवदास’चा मोठा भाऊ,वहिनी आणि माझ्या आजीच्या चौकशीला आले.आजी म्हातारी असल्याने त्यांनी तिला जास्त प्रश्न विचारले नाही “माचिस देताना तुमच्या लक्षात आले नाही का ?” आजी म्हणाली “माका कसा कळणार ता ? तो जर तसो माका बोललो असतो, तर मी त्याका तस करूक दिलय नसतं. माका वाटल त्याका सिगारेट पियची तल्लफ आली हा, म्हणन मी त्याका माचिस दिली, ह्या माझी काय चूक असा ?” हे आजीचे उत्तर त्यांना लगेच पटले.त्यांनी रिपोर्ट मध्ये आजीच्या स्टेटमेंट समोर आजीचे नाव लिहून ते निघून गेले,माझ्या आजीचे मराठी फार चांगले होते. तरी सुद्धा ती समोरचा कोणीही असो त्यांच्याशी मालवणीतच बोलायची,  मायबोलीचा अभिमान. 
      रात्रीच मृत ‘शिवदासची’ बॉडी ताब्यात आल्यावर, लगेच पहाटे पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. वाडीवर दुःखाचे सावट होते, हसणारी, मुक्तपणे वावरणारी ती ‘मुलचंद’ वाडी, त्या काळात घाबरल्यासारखी झाली होती. मनमोकळा वावरणारा ‘शिवदास’ गेल्याने समस्त ‘मुलचंद’ वाडीतले रहिवाशी दुःखी झाले होते.
       दुसरा दिवस सुद्धा दुःखातच गेला. रात्री पर्यंत जागत 'गजाली' मारणारी ‘मूलचंद वाडी’तली मंडळी लवकर अकरा वाजायच्या आत गुडूप झोपून गेली होती. कोणत्याही चाळीत असे काही 'आक्रित' घडले की त्या चाळीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहक बदनाम व्हायची.लोक रात्री टॉयलेट जायला घाबरायचेत आणि ‘शिवदास’ने जिकडे आत्मघात केला ती जागा ही  टॉयलेट ला जाणाऱ्या रस्त्यावरच होती म्हणून अजून घबराहट.  पूर्वीच्या काळात जिवाला कंटाळले आत्मघाती लोक  हमखास  चाळी मधले  टॉयलेटच निवडायचेत. तेव्हा भीतीमुळे त्या चाळीतील मंडळींवर काय आपबिती होत असेल याचा इतरांना अंदाजच बांधणे कठीण आहे.
        अशाच भितीच्या दबावात संपूर्ण ‘मूलचंद वाडी’ असताना. एके दिवशी मध्यरात्री  ‘शिवदास’च्या मोठ्या नावाच्या म्हणजे  ‘रामकृष्ण नागवेकराच्या ’ घराच्या दारावर जोरजोरात कोणी तरी धक्के मारत असल्याचे आवाज यायला लागले.त्याचा मोठा भाऊ घाबरट नव्हता,तो मोठा बांबू घेऊन बाहेर आला आणि कोणी आहे का ? म्हणून थोडा वेळ उभा राहीला आणि झोपायला गेला परत थोड्या वेळाने तसाच आवाज, परत तेच.शेवटी ‘रामकृष्णाने’ जाळीदार खिडकीतून हळूच पाहिले बाहेर कोणी  आहे का ?.त्यानेच कशाला आजुबाजूच्या सर्व शेजाऱ्यांनी  खिडकीतू हळूच तपासणी केली की कोण बरे जोरजोरात धक्के मारतोय ? परंतु त्या सर्वांना  बाहेर पिठूर चांदण्यात कोणीही दिसत नव्हते किंवा कोणतीच सावली सुद्धा दिसत नव्हती. फक्त धूर किंवा धुके ‘रामकृष्ण’ च्या लोखंडी दरवाजावर दिसायचे. लोखंडी दरवाजाचा रंग काळा असल्याने तो धूर दरवाज्यावर स्पष्ट दिसायचा.ते दृश्य पाहणाऱ्या सर्वांची नंतर गाळण उडाली.त्या दिवसापासून  बिनधास्त,डेअरिंगबाज ‘रामकृष्ण’आणि त्याची बायको  सुद्धा टरकली होती.   टवाळखोर, मस्तीखोर किंवा मनात अढी ठेवून त्यांना त्रास देणारे कोणी नसणार याचे  कारण आजुबाजूला असणारे ‘गणगोत’ संबंध. बाहेरच्या वाडीतील कोणी येऊन असे करेल  याची सुद्धा शक्यता नव्हती.प्रभादेवी भागातील बहुतेक लोक एकमेकांना उत्तम परिचित  होते.’शिवदास’च्या भावाचे स्वतःचे असे, त्या भागात वलय होते. त्या मुळे कोणी तशी हिंमत करेल असे वाटत नाही.
        दुसऱ्या दिवशी सकाळीच यावर चर्चा करण्यासाठी सर्व रहिवाशी जमले.परंतु हा विषय लगेच ‘भूत प्रेत’ यावर नेऊ नका. असे काही लोकांचे मत पडले.वाडी मध्ये रात्री तरुण मुलांनी गस्त घालायचे ठरवले.प्रत्येक दिवशी तीन - चार मुले जागरण करून वाडीत गस्त देतील.त्या प्रमाणे मुले गस्तीवर होती.पहिल्याच दिवशी खूप रात्र झाली आणि त्या मुलांवर  झोपेचा अंमल चढत गेला. त्यापैकी एक जण ‘अतिशहाणा’ म्हणाला ‘शिवदास’ गेला आणि आम्हाला कामाला लावून गेला आणि शिवदासचा रागात तो उद्धार करू लागला. त्या बरोबर तो मुलगा अंगात भूत संचारल्या सारखा करायला लागला, उड्या मारायला लागला. ज्याच्यावर काहीवेळा पूर्वी झोपेचा अंमल चढायला आला होता. तो आता चित्रविचित्र चाळे करायला लागला.मोठमोठ्याने ओरडून लोकांची झोप उडवली.सर्व वाडी जागी झाली,सर्व जण त्याला पकडून घरी घेऊन गेले आणि एका खोलीत  त्याला  बंद करण्यात आले. 
        सकाळपर्यंत त्या खोलीतून ओरडण्याचे आवाज येतच होते.तो बाधित मुलगा  ‘मीनाक्षी’ या  मद्रासी मुलीचे नाव घेत होता ‘रामकृष्ण’ आणि त्याच्या बायकोचा ‘शालिनीचा’ उद्धार करत होता.आता मात्र सर्वाची खात्री पटली होती.जे कोणी म्हणत होते सध्या ‘भूत प्रेताचा’ विचार करू नका.  त्यांना सुद्धा पूर्ण खात्री पटली.दुपारी एक वाजेपर्यंत ओळखीच्या एका ‘मांत्रिका’ला बोलावले गेले. त्याने त्या मुलाची सर्व अवस्था पाहून ही काही सामान्य गोष्ट नाही. या साठी सिद्धी असलेला मांत्रिक ठाण्यातून बोलवावा लागेल.त्यातील काही जण  म्हणाले ठीक आहे,आपण टॅक्सी घेवून जावूया.त्यातील एकाची टॅक्सी होती. त्या प्रमाणे संध्याकाळी त्या सिद्ध पुरुष मांत्रिकाला ठाण्यातून आणण्यात आले. 
         त्याने त्या मुलाची सर्व स्थिती पाहिली आणि म्हणाला “या मुला मध्ये दुसऱ्या आत्म्याने परकाया प्रवेश केलेला असून तो या देहाचा ‘झाड’ म्हणजे  मध्यम म्हणून वापर करत आहे. जर वेळीच यावर मार्ग निघाला नाहीतर याचे काही खरे नाही. तो मृतात्मा ज्या तीन लोकांचे नाव घेत आहेत त्यांचा सुद्धा जीव धोक्यात आहे”.या वर सर्व उपस्थित म्हणाले “गुरुजी,मग यावर उपाय काय ?”
       “नक्कीच आहे ,या वर सुद्धा उपाय आहे, परंतु तो उपाय  त्या मुलीच्या जीवाला धोका देणारा सुद्धा  असू शकेल,आणि  जर त्या मुलीची ग्रहदशा मजबूत असेल तर तिला बिलकुल त्रास सुद्धा होणार  नाही. त्या वेळी तो या मुलाला सोडेल आणि  बाहेर पडेल. मात्र त्याची अपूर्ण वासना तृप्ती पूर्ण करण्या करिता तो त्या मुलीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल.” यावर इतर उपस्थित म्हणाले “जर त्या मीनाक्षीचे   ग्रहमान उत्तम असेल तर मग काय करायचे ?” या वर गुरुजी म्हणाले “तर त्याचे बंधुराज किंवा वहिनी या दोघांपैकी ज्यांचे ग्रहमान दुर्बळ आहेत. त्याच्या मध्ये शिरून तो त्याचा प्रतिशोध पूर्ण करेल.अतृप्त वासना किंवा प्रतिशोध हे त्याचे उदिष्ट आहे तो काही तरी एक उदिष्ट पूर्ण करणारच.” परत सर्व म्हणाले “गुरुजी,यावर उपाय काय आहे ?” त्यावर गुरुजी म्हणाले “यावर सुद्धा उपाय आहे.लगेच बाधित व्यक्तीला “श्री दत्त क्षेत्र गाणगापूर” ला न्यायची तयारी करा, तिथे पोहचायला उशीर होऊ देऊ नका, हाच एक उपाय आहे,अन्य कुणाला ते उतरवणे शक्य नाही. मला सुद्धा शक्य नाही” “आता खूप उशीर झालेला आहे.माझी आज इथेच राहायची तयारी करा.उद्या सकाळी ती मुलगी इथे यायला हवी”
         ‘मीनाक्षी’ हि “मूलचंद वाडी” मधील काही मुलींची मैत्रीण होती,त्या सर्व जणी लगेच तिच्या घरी गेल्या आणि तिला म्हणाल्या "आमच्या वाडीत आम्ही सर्व मुली एकत्रित येऊन ‘रसरंग’ हा कार्यक्रम करणार आहोत.तू सुद्धा ये पण एकटीच ये  कारण हा सर्व तरुण मुलींचा कार्यक्रम आहे” असे तिला सांगितल्यावर ती लगेच तयार झाली परंतु ‘शिवदास’च्या प्रकरणा मुळे ती यायला सुद्धा धजावत नव्हती पण कार्यक्रम सकाळचा आहे म्हटल्यावर ती यायला तयार झाली. 
       सकाळीच ‘रसरंग’ ची तयारी पूर्ण झाली ‘रसरंग’ चे वातावरण तयार झाले होते.मीनाक्षी सर्व मैत्रिणी मध्ये येऊन बसली सर्व गप्पा टप्पा, खाणेपिणे सुरू होते.मीनाक्षीला समोर खुर्चीवर बसवण्यात आले त्या  पछाडलेल्या मुलाला घेऊन येण्या अगोदर सर्व मुलींनी तिथून बाजूला व्हायचे.  मीनाक्षीच्या ओळखीचा एक पुरुष मीनाक्षीला बोलण्यात गर्क ठेवेल.आणि त्या मुलाला मीनाक्षी समोर आणल्यावर तो पुरुष बाजूला होईल,असा प्लॅन ठरला होता. त्या प्लॅन प्रमाणे सर्व काही योग्यरीतीने पार पडले. 
        त्या पछाडलेल्या मुलाला ‘मीनाक्षी’ समोर आणल्या बरोबर ‘शिवदास’च्या आत्म्याने ‘मीनाक्षी’ मध्ये निमिषार्धात परकाया प्रवेश केला. त्या पछाडलेल्या मुलाला सोडून दिले.तो मुलगा गर्भगळीत होऊन ,ग्लानी मुळे खाली कोसळल्या बरोबर त्याला उचलून बाजूला काढले गेले. काही अंतरावर असलेल्या ‘शंकरा’च्या मंदिरा जवळ नेवून ठेवण्यात आले.यदाकदाचित परत त्याने त्याच्यात शिरकाव करू नये म्हणून. ‘शिवदास’ने ‘मीनाक्षी’ मध्ये परकाया प्रवेश करताच. मीनाक्षी खूप मोठ्याने किंचाळली आणि थयथय नाचू लागली. नटून थटून आलेल्या मुलीची गत, पिसाटल्या सारखी झाली, केस सुटले होते आणि मोठमोठ्याने ती ओरडू लागली.ती फक्त ओरडत,किंचाळत उड्या मारत होती. तिच्या आई बाबांना बोलाविण्यात आले. तिची ती पिसाटलेली,पछाडलेली स्थिती पाहून ते दोघे आणि भाऊ सुद्धा घाबरला. गुरुजी पुढे आले आणि त्यांना म्हणाले की “जर तुम्ही वेळ न दवडता  48 तासाच्या आत हिला ‘श्री दत्त क्षेत्र गाणगापूर’ येथे नेले तरच ती बरी होईल” ते ऐकताच मीनाक्षीचे आई-वडील इतर सर्व उपस्थितांना म्हणाले “कृपया आम्हाला मदत करा, तिकडे जायला”.’रामकृष्ण नागवेकर’ पुढे येऊन म्हणाला “काळजी करू नका,थोड्या वेळात तयारी होईल, तुम्ही निघा तिथे जायला” खरे तर ती तयारी पूर्वीच झालेली होती,असे वाटू नये की हे सर्व पूर्व नियोजित आहे म्हणून. 
       मीनाक्षीला गुंगीच्या गोळ्या देऊन त्या प्रमाणे 15 तासांचा प्रवास करून ‘ॲम्ब्युलन्स’ ‘श्री दत्त क्षेत्र गाणगापूर’ येथे पोहचली. आणि दिवसभर ‘श्रीनृसिंहसरस्वती’ या श्रीदत्तगुरूच्या तिसऱ्या अवताराच्या भक्तिमय आणि पवित्र सानिध्यात राहिल्या मुळे ‘शिवदास’च्या आत्म्याची नाकेबंदी आणि घुसमट झाली.श्री दत्ताच्या अद्वैत शक्ती पुढे पिशाच्च योनीतील ‘शिवदास’ला शरण यावे लागले आणि नाईलाजाने उद्दिष्टपूर्ती न करताच त्याला त्याच्या इहलोकीच्या प्रवासाला  जावे लागले.
       मीनाक्षी शांत पडली होती. तिचा श्वास स्थिर झाला होता.गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.“आता धोका टळला आहे” त्यांनी हळू आवाजात सांगितले.सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.दोन दिवसांनी,मूलचंद वाडीत पुन्हा एकदा गोंधळ उडाला.त्या मुलाने स्वतःचा जीव घेतला होता.पण खरी भीती त्यानंतर सुरू झाली कारण त्या रात्रीपासून,ज्या ठिकाणी शिवदास जळाला होता,तिथेच त्या मनो दुर्बल झालेल्या मुलाने आत्मघात केला,तिथे दर मध्यरात्री,जळत्या मांसाचा वास येऊ लागला आणि काही जणांनी तर स्पष्ट पाहिली धुरातून उभी राहणारी एक काळी आकृती...सफेद आकृतीवाला शिवदास इहलोकीला गेला. मात्र तो मुलगा अजून भटकत आहे. वाडीमध्ये कोणीही रात्री त्या रस्त्याने जात नाही. 
      याचे कारण, सर्व काही नियोजना प्रमाणे झाले परंतु यात शेवटी एक त्रुटी राहिलीच,त्या गडबडीत ती बाब कुणाच्या लक्षात सुद्धा आली नाही.ज्या मुलामध्ये ‘शिवदासने’ परकायाप्रवेश केला होता आणि  त्याने सोडण्यापूर्वी त्या मुलाच्या आत्म्याचे तेज शिवदासच्या आत्म्याशी लढताना कमी झाले.त्या मुलाचे मनोधर्य दुर्बल झाल्याने त्याने नंतर स्वतःचाच आत्मघात केला. खरे तर त्याला सुद्धा ‘श्री दत्त क्षेत्र गाणगापूर’ येथे न्यायला हवे होते,हे कुणाच्याच लक्षात आले नाही त्या नंतर आजीने सुद्धा लहान नातवाला त्रास होऊ नये तिथून काढता पाय घेतला.मला  त्या मूलचंद वाडीत कधी तिने परत नेले नाही.आम्ही दोघे गावीच निघून गेलो.
            ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.तुमच्याकडेही अशा काही भयाण किंवा रहस्यमय अनुभवांची कथा असेल तर comment मध्ये जरूर शेअर करा. 
  टीप - "ही कथा जुन्या काळापासून स्थानिक लोकांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथनांवर, लोकश्रुतींवर आणि अनुभवांवर आधारित आहे. या कथेतील काही घटना लोकविश्वासाचा भाग असून वाचकांनी त्याकडे त्या दृष्टीनेच पाहावे."

                                                                          समाप्त🖋️📖📚

   🔗 पूर्णगडकडे जाणारी वाट|रत्नागिरी, पूर्णगड किल्ला, निसर्ग, इतिहास आणि रहस्यमय दंतकथा- निसर्ग, इतिहास आणि एक अनोखी दंतकथा.

   पुढील लेख हा रत्नागिरी - पूर्णगड ह्या 25 किमी च्या मार्गावरील काही मोजक्या गावातील वैशिष्ट्यांचा आणि पूर्णगड किल्ला उभारणी मागील लपलेल्या दंतकथेचा आहे. 👉

 ✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा

पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.

तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा


SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved


🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

(ओमकार शिवलकर )

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...