अस्वीकरण - हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. याचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे किंवा नाम साधर्म्य असणे हा निव्वळ योगायोग आहे.या कथेत वर्णन केलेल्या गोष्टी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून केवळ कथानकाचा भाग आहेत. ही कथा काल्पनिक भयप्रधान आहे. यास्तव कमकुवत मनाच्या वाचकांनी काळजी घ्यावी
'शापित गेस्ट हाऊस' - या गेस्ट हाऊसमध्ये जाण्याची चूक करू नका'| थरारक मराठी भयकथा
शापित गेस्ट हाऊस, नावच पुरेसे होते
आत गेल्यावर मात्र शापित सत्य उमजले होते |
भिंती नव्हत्या तिथे, कर्ण छेदक किंकाळी होती,
त्या तिघांची पुण्याई त्यांच्या सोबत मात्र होती |

🔗 तो अनोळखी, गूढ माणूस: केळवा पुरातील जीवघेणा प्रवास | थरारक सत्यकथा..
अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात अडकलेले कुटुंब, मदतीचा कोणताही आधार नाही, आणि प्रत्येक सेकंद जीवावर बेतणारा लघु लेख मागच्या कथेत वाचला असेल..पुढील लघु कथा आहे..
शापित गेस्ट हाऊस - या गेस्ट हाऊसमध्ये जाण्याची चूक करू नका'| थरारक मराठी भयकथा वाचा..
एका पावसाळी रात्री घडलेला खरा अनुभव, जिथे गेस्ट हाऊसमध्ये काहीतरी अनोळखी शक्ती होती. ही Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल.
मराठी भयकथा आवडणाऱ्या वाचकांसाठी ही कथा भीती, रहस्य आणि गूढ अनुभवांनी भरलेली आहे. एका पावसाळी रात्री प्रवासादरम्यान एका निर्जन गेस्ट हाऊसमध्ये घडलेल्या अनाकलनीय घटनांनी सर्वांचे आयुष्य बदलून टाकले. तेथे खरोखरच एखादी अदृश्य शक्ती होती का, की त्या रात्री घडलेले सर्व काही केवळ योगायोग होता? या थरारक मराठी भयकथेत प्रत्येक क्षणी भीतीची चाहूल आणि रहस्याची उकल अनुभवायला मिळेल.
मानवजातीचा इतिहास हा केवळ लिखित स्वरूपातच नाही, तर अनेक अवशेष, वास्तू, शिलालेख आणि वस्तूंमध्ये दडलेला आहे. या सर्वांचा अभ्यास करून भूतकाळातील जीवनशैली, संस्कृती आणि प्रगती समजून घेणारे शास्त्र म्हणजे ‘पुरातत्त्वशास्त्र’ होय. भारतासारख्या प्राचीन आणि समृद्ध इतिहास असलेल्या देशात पुरातत्व विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
पुरातत्व विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे जमिनीत दडलेले ऐतिहासिक पुरावे शोधणे. वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन करून प्राचीन वस्तू आणि वास्तू शोधून काढल्या जातात. त्यामुळे उत्खनन हे भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरतो.
‘बचाव पुरातत्त्वशास्त्र’ ( Rescue Archaeology) म्हणजे विकासकामांमुळे (जसे की रस्ते, धरणे, मेट्रो प्रकल्प, इमारती) नष्ट होण्याच्या धोक्यात असलेल्या पुरातत्त्व स्थळांचे तातडीने संरक्षण व अभ्यास करण्याची प्रक्रिया होय. आधुनिक काळात वेगाने होत असलेल्या विकासामुळे अनेक प्राचीन स्थळे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी बचाव पुरातत्त्वशास्त्र ही पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण ती आपल्या इतिहासाचे रक्षण करण्यासाठी शेवटची संधी असते. बचाव पुरातत्त्वशास्त्रची प्रक्रिया ठराविक टप्प्यांत पार पडते,वेळ मर्यादित असल्यामुळे हे काम जलद पण अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. हे केवळ एक शास्त्रीय कार्य नसून, आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणारे आणि विकासकांना सहाय्यभूत ठरणारे महत्त्वाचे शास्त्र आहे.
कोणतेही धरण बांधताना त्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या पुरातत्त्व स्थळांचे जतन करण्यासाठी बचाव पुरातत्त्वशास्त्र प्रक्रियांचा अगोदर त्या ठिकाणी वापर केला जातो. या प्रक्रियेमुळे पाण्याखाली जाण्यापूर्वी त्या ठिकाणचा इतिहास जतन करता येतो.
आंध्र प्रदेशातील ‘पोलावरम’ धरण प्रकल्पावर रामेश्वर ,अमोल ,पंचम असे 3 खासगी संस्थेचे ‘बचाव पुरातत्त्व तंत्रज्ञ’ म्हणून त्या प्रोजेक्ट वर काम करीत होते. दिवसभराचे काम संपल्यानंतर संध्याकाळी ते जवळच्या गेस्ट हाऊसकडे निघाले. तेवढ्यात प्रकल्पावर काम करणारे काही स्थानिक मजूर त्यांच्याजवळ आले आणि थोड्या संकोचाने म्हणाले,“साहेब, तुम्ही दुसऱ्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला का जात नाही? नाहीतर आमच्या घरी या,आमची काही हरकत नाही. तुमचे काम इथे अजून वीस दिवसांपेक्षा जास्त चालणार आहे आणि तुम्ही ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला जात आहात ना, ते झपाटलेले आहे.” मजुरांच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून तिघे क्षणभर थांबले, ही फक्त अफवा होती, की त्या मागे काहीतरी भयानक सत्य दडलेले होते ? असे ऐकताच ते तिघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि क्षणभरातच जोरजोरात हसायला लागले. त्या गंभीर वातावरणातला तणाव एकदम हलका झाला. त्यातला ‘पंचम’पुढे आला आणि हसतच म्हणाला.“अरे मित्रांनो, कसे आहे माहित आहे का? आमचे कामच असे आहे की तुम्ही जी माती उकरून काढता ना, त्यात आम्हाला माणसांचे सांगाडे, अस्थी सापडतात आणि त्यांचे परीक्षणही आम्हालाच करावे लागते.झपाटलेल्या जागा, पडके वाडे, जुने राजवाडे,अशा ठिकाणी आम्ही नेहमीच काम करतो. कधी कधी तर एवढा कमी वेळ दिला जातो की रात्रीसुद्धा तिथेच काम करावे लागते.तेव्हा तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी काहीच झाले नाही,आमच्या केसाला सुद्धा तिथे धक्का बसला नाही तर आता काय होणार आहे ?” त्याने समोर उभ्या असलेल्या स्थानिक मजुरांकडे पाहिले,जणू त्यांच्या भीतीची तो थट्टाच करत होता. मजूर मात्र शांतच उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हते.फक्त एक अनामिक भीती होती, जणू ते काहीतरी जाणून होते.
प्रोजेक्टच्या वाहनाने ते त्या गेस्ट हाऊसकडे निघाले. गेस्ट हाऊस साधारण नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर होते. संध्याकाळ हळूहळू गडद होत चालली होती. संधीप्रकाश अजूनही वातावरणात तरंगत होता.जणू मावळत्या सूर्याने आकाशाचा ड्रॉइंग पेपरसारखा उपयोग करून विविध रंगांचा सुंदर कोलाज चितारला होता. केशरी, जांभळे, निळसर, काळा अशा अनेक रंगीबेरंगी छटा एकमेकांत मिसळून निसर्गाने स्वतःची एक वेगळीच चित्रशैली उभी केली होती.पण त्या सौंदर्यामागे काहीतरी वेगळेच दडलेले जाणवत होते. हळूहळू रजनी तिचे अंधाराचे जाळे सर्वत्र पसरवू लागली होती. प्रकाशाचे शेवटचे धागेही विरत चालले होते आणि काळोख, जणू एखाद्या साम्राज्यासारखा, आपली सत्ता गाजवायला सज्ज झाला होता.
गाडी पुढे सरकत होती आणि प्रत्येक किलोमीटर सोबत वातावरणातली शांतता अधिकच गूढ, अधिकच अस्वस्थ करणारी होत चालली होती.रस्ता नागरी वस्तीतून जात नव्हता.तो सरळ जंगलाच्या कुशीत शिरत होता, हे आता स्पष्ट जाणवत होते. आजूबाजूला कुठेही घरे नव्हती, ना एखादे गाव फक्त दाट झाडी, सावल्या आणि वाढत जाणारी शांतता. ही व अशी परिस्थिती त्यांच्यासाठी नवीन नव्हती. त्यांच्या कामाचे स्वरूपच असे होते की जिथे मानवी अस्तित्वाचे कोणतेच चिन्ह दिसत नाही, अशा निर्जन ठिकाणीच त्यांना दिवस-रात्र घालवावे लागत होते. रजनीच्या अंधारमय पांघरुणा सोबतच रिमझिम पावसानेही हळूच सुरुवात केली. सुरुवातीला हलकासा, कुजबुजणारा पाऊस पण काही क्षणातच त्याने जोर धरला. त्याचे थेंब उघड्या जीपमध्ये शिरू लागले. थंडगार पाण्याचे तुषार चेहऱ्यावर पडताच एक वेगळीच जाणीव झाली जणू निसर्ग स्वतः त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.
पाऊस वाढू लागल्यावर ड्रायव्हरने जीपचे ‘साईड कर्टन’ खाली केले. बाहेरचे दृश्य हळूहळू धूसर होत गेले आणि आत एक बंदिस्त, किंचित गुदमरवणारी शांतता पसरली. गाडी पुढे चालूच होती पण त्या शांततेत आता एक अनामिक ताण दडलेला होता.थोड्याच वेळात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्याचा अखंड फेर सुरू झाला. आता बाहेर नेमके काय सुरू आहे, हे समजणेच कठीण होऊन बसले होते. दृष्टीपुढे सगळे काही धूसर झाले होते. फक्त गाडीच्या काचेवर सतत आपटणाऱ्या पावसाच्या धारांना बाजूला सारण्याचे काम वायपर इमाने इतबारे करत होता. ते ही क्षणाक्षणाला अपुरे पडत होते. ‘फ्रंट लाईट’च्या फिकट प्रकाशात काचेपलीकडचा रस्ता फक्त धूसर रेषांसारखा दिसत होता, जणू कुठेतरी अंधारात हरवत चाललेला. ड्रायव्हरने मंद आवाजात ‘तेलुगू गाणी’ लावली होती. त्या सुरांमध्ये एक विचित्र शांतता होती, ना पूर्णपणे सुखावणारी, ना पूर्णपणे भीतीदायक पण त्या गूढ वातावरणात ती अधिकच अनाकलनीय वाटत होती.
जीपच्या आत बसलेले तिघेही आता शांत झाले होते. कुणी काही बोलत नव्हते पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुमत होता “आपण खरेच कुठे चाललो आहोत ? वायपरने काच स्वच्छ केल्यावर समोर एक मजली, रुंद इमारत नजरेस पडली. त्या इमारतीभोवती कुठलेच प्रखर दिवे नव्हते फक्त अत्यंत मंद, पिवळसर प्रकाश तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. पावसाच्या सरींमधून ती इमारत जणू एखाद्या सावलीसारखी दिसत होती. ड्रायव्हर, जो आतापर्यंत गप्प बसून हळू आवाजात गाणी ऐकत होता, तो अचानक बोलला,“साहेब हेच ते गेस्ट हाऊस पण खरे सांगू कां ? तुम्हाला अजून दुसरी कोणतीच जागा मिळाली नाही का ?” त्याच्या आवाजात एक विचित्र भीती होती. तो पुढे म्हणाला,“आज अमावस्या आहे आणि या ठिकाणाबद्दल बऱ्याच गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. पाहिजे तर मी तुम्हाला दुसऱ्या गेस्ट हाऊसवर घेऊन जातो पण ते इथून दोन तासांवर आहे. आणि बाहेर हा असा जोरदार पाऊस पडतोय” गाडीच्या काचांवर पावसाचे थेंब जोरात आपटत होते. आत क्षणभर शांतता पसरली होती. “काय करता साहेब ?” ड्रायव्हरने पुन्हा विचारले.तिघांनी एकमेकांकडे पाहिले आणि एका सुरात उत्तर दिले,“नाही”. कारण बाहेर पाऊस जोरदार पडत होता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे,त्यांचा भूतप्रेतांवर अजिबात विश्वास नव्हता. तिघेही जीपमधून उतरले. पाऊस अजूनही कोसळत होता. उतरतानाच ‘रामेश्वर’चे कानाला अडकवलेले ‘श्रवण यंत्र’अचानक निसटून पाण्यात पडले. काही क्षण तो स्तब्धच उभा राहिला मग घाईघाईने ते उचलले. ते पूर्ण ओले झाले होते.’रामेश्वर’ कर्णबधिर असल्यामुळे त्याला आधीच नीट ऐकू येत नव्हते आणि आता ते यंत्र पूर्णपणे बंद पडले होते. त्याने ते रुमालाने स्वच्छ पुसून शांतपणे पॅन्टच्या खिशात ठेवले. ड्रायव्हर म्हणाला,“साहेब, तुम्ही चेक-इन होईपर्यंत मी थांबतो ” ते म्हणाले “ठीक आहे”
गाडी पोर्चमध्ये उभी असल्यामुळे तिघेही न भिजता गेस्ट हाऊसमध्ये शिरले. आत मध्ये शिरताच एक विचित्र, ओलसर शांतता त्यांना जाणवली.“मॅनेजर… मॅनेजर…!” त्यांनी हाका मारल्या पण कुठलाही प्रतिसाद नाही. कॉरिडॉरमध्ये एकामागोमाग एक सगळ्या खोल्यांना कुलूपे होती.फक्त शेवटची एक खोली तिचे दार मात्र बंद होते, पण त्याला मात्र कुलूप नव्हते.“मॅनेजर…!”बाहेरून पुन्हा जोरात हाक मारली, दाराच्या पलीकडून काहीच उत्तर आले नाही.शेवटी त्यांनी दार जोरजोरात हलवायला सुरुवात केली आणि अचानक दार कडकडत उघडले गेले.आतून एक मध्यमवयीन केअर टेकर बाहेर आला.
त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.त्याने लगेच कानाला हात लावून खुणेनेच दाखवीले कीतो कर्णबधिर आहे. तिघे क्षणभर एकमेकांकडे पाहू लागले. केअरटेकरने काही न बोलता ‘की-बोर्ड’ ‘ वरची चावी काढली आणि त्यांच्या हातात दिली. त्याने बोटांनी वरच्या दिशेला इशारा केला. पहिल्या मजल्यावरची खोली. त्यांपैकी एकाने विचारले की ,“अरे, इथल्या सर्व रूम्स बंद आहेत. मग त्यातली एखादी रूम तू आम्हाला कां देत नाहीस ?” केअरटेकर काही बोलला नाही.फक्त हातांची बोटे हलवत खुणेनेच सांगू लागला की इथल्या रूम्स या सिंगल,डबल आहेत आणि तीन बोटे वरती करून वरच्या रूम्स या ट्रिपल बेड आहेत, असे त्याला म्हणायचे असेल. त्याच्या हालचाली विचित्र होत्या.जणू काही तो काहीतरी लपवत होता.कॉरिडॉरमधली शांतता आणखी दाट झाली. चावी मिळाल्यावर त्यांनी ड्रायव्हरला खुणेनेच जायला सांगितले, “उद्या सकाळी १० वाजता या,” त्यांपैकी एकाने ड्रायव्हरला सांगितले.
ड्रायव्हरने क्षणभर त्या इमारतीकडे पाहिले जणू काही त्याला परत काही तरी सांगायचे होते, पण तो गप्प राहिला. मग मान हलवून त्याने जीप सुरू केली. बाहेर पावसाने अजून जोर धरला होता.जीप हळूहळू पोर्चमधून बाहेर निघाली आणि काही क्षणांतच पावसाच्या पडद्यामध्ये विरून गेली. साचलेल्या पाण्यातून गाडीची दोन्ही चाके जाताना मोठमोठे फवारे उडवत गेली. जाताना जीपच्या आवाजाने वातावरणातली शांतता क्षणभर भंग पावली होती मग पुन्हा सर्व काही स्तब्ध. आता तिथे फक्त ते चौघे आणि ते ओसाड जंगलामधील गेस्ट हाऊस. तिघांपैकी एकाने केअर टेकरकडे वळून हाताने खुण केली की “जेवण ?” कधी मिळेल.केअर टेकरने निर्विकार चेहऱ्याने नऊ बोटे दाखवली, म्हणजे नऊ वाजता.
घड्याळात साडेसात वाजले होते.“ठीक आहे ” त्यांनी एकमेकांकडे पाहत हलकीच मान हलवली. पण त्या शांततेत काहीतरी वेगळेच होते. जणू गेस्ट हाऊसने त्यांना आत घेतले होते आणि आता ते सहज बाहेर जाऊ देणार नव्हते. ते फ्रेश होऊन, थोड्या गप्पा मारत नऊ वाजता मेस रूममध्ये जेवायला आले. किचनमध्ये तोच केअर टेकर शांतपणे जेवण बनवत होता. कुठलाही आवाज नाही. फक्त भांड्यांचा हलका ठणठण आवाज,बनणाऱ्या व्यंजनाचा घमघमाट आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा गडगडाट फक्त आम्हाला जाणवत होता .बरोबर नऊ वाजता तो तीन भरलेली ताटे घेऊन आला एकामागून एक त्यांच्यासमोर ठेवली. जेवणाचा सुगंध मात्र अप्रतिम होता. पहिला घास घेताच ते तिघेही थोडेसे आश्चर्यचकित झाले. जेवण तर एकदम लज्जतदार आणि रुचकर होते.“इतक्या ओसाड ठिकाणी इतके छान जेवण मिळते ?” अमोल हळूच पुटपुटला. पण केअरटेकर काहीच बोलला नाही. तो फक्त निर्विकार नजरेने त्यांच्याकडे पाहत उभा होता. तिघांनी पोटभर जेवण केले.
केअर टेकर कर्णबधिर असल्यामुळे त्याच्याशी जास्त संवाद होणे शक्यच नव्हते म्हणून ते शांतपणे उठले आणि त्यांच्या खोलीकडे निघाले. रूमवर गेल्यावर त्यांनी घरच्यांशी फोनवर सविस्तर बोलणे सुरू केले. त्यांच्या त्या गप्पांमध्ये त्या सर्वांचा कधी एक तास निघून गेला,ते त्यांना कळले सुद्धा नाही. दरम्यान ‘रामेश्वर’ने त्याचे ‘श्रवण यंत्र’पंख्याच्या हवेवर सुकायला ठेवले होते. ‘अमोल’ला थंडी जाणवत असल्यामुळे त्याने कानात कापूस घातला आणि त्यावर कानटोपी ओढून घेतली. ‘पंचम’ने मोबाईलमध्ये डाउनलोड केलेली गाणी लावली.हेडफोन कानाला लावला आणि गाणी ऐकता ऐकता तो कधी झोपला, हे त्याला सुद्धा कळले नाही. रामेश्वर,जो आधीपासूनच काहीच ऐकू शकत नव्हता. तो पूर्ण शरीरावर चादर ओढून गाढ झोपला. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि त्या गेस्ट हाऊसमध्ये आता एकही माणूस “ऐकू” शकत नव्हता.
रात्रीचे बारा होते. पहिल्या मजल्याच्या लॉबीमध्ये असलेल्या मोठ्या जुन्या घड्याळाने जोरात ठोके द्यायला सुरुवात केली.ठण…ठण…ठण…प्रत्येक बारा ठोके त्या ओसाड गेस्ट हाऊसमध्ये घुमत होते. कॉरिडॉर, भिंती, बंद दरवाजे सगळे काही त्या आवाजाने हलत असल्यासारखे वाटत होते. बारावा ठोका पडला आणि अचानक संपूर्ण शांतता.एक क्षण,दोन क्षण आणि मग मध्येच एक भली मोठी, कर्णकर्कश किंकाळी हवेत घुमली! ती इतकी तीव्र होती की जणू कानाचे पडदे फाडून टाकणारी,मेंदू सुन्न आणि बधिर करणारी होती. ती किंकाळी संपूर्ण गेस्ट हाऊसमध्ये पसरली.पण त्या खोलीत झोपलेले तिघे मात्र ती किंकाळी ऐकण्याच्या स्थितीतच नव्हते. ‘अमोल’,कानात कापूस घालून आणि त्यावर फिट्ट कानटोपी ओढून शांत झोपला होता तर पंचम हेडफोन कानावर लावून आणि त्यावर सुरू असलेल्या गाण्यांमध्ये स्वतःला हरवून डाराडूर झोपलेला होता तर ‘रामेश्वर’ कर्णबधिर आणि त्यात कानापासून पायापर्यंत चादर ओढून गार झोपला होता. शारीरिक आणि मानसिक अतिश्रमांमुळे ते झोपेच्या निचेतन अवस्थेत होते. त्यामुळे तिघांसाठी ती कर्णकर्कश,पिशाच्च किंकाळी कधी झालीच नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता,परंतु वातावरणात अजूनही ओलसर गारवा होता.तिघे अंघोळ करून नाश्त्यासाठी एकमेकांशी बोलत आणि हसत खेळत खाली आले. त्यांना बोलताना आणि हसताना पाहून केअर टेकर स्तब्ध होऊन त्यांच्याकडे काही क्षण पाहतच उभा राहिला होता.त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य उमटले होते.तो थरथरत्या आवाजात म्हणाला,“तुम्हाला, ऐकायला कसे येतेय?” या प्रश्नावर ते तिघेही एकमेकांकडे आश्चर्याने,अचंबित होऊन पाहू लागले.त्यांपैकी एकाने लगेच विचारले “आणि तू कधी पासून बोलायला आणि ऐकायला लागलास काल तर मूकबधिर होतास ?” असे तो म्हणताच क्षणभर तिथे शांतता पसरली. केअर टेकर पुढे म्हणाला “तुम्हाला काल रात्री विचित्र,भेसूर, कर्णकर्कश किंकाळी ऐकायला आली की नाही ?” अमोल पुढे येत म्हणाला, “बिलकुल नाही, आम्हाल खूप शांत आणि निवांत झोप लागली” “मी कानटोपी घातली होती, पंचमने हेडफोन लावला होता आणि रामेश्वरने त्याचे ओले झालेले हिअरिंग एड कानातच घातले नव्हते.” केअर टेकरच्या डोळ्यांत भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसू लागले होते.तो हळू आवाजात म्हणाला“म्हणजे, तुम्ही तिघे काल वाचलात तर” असे त्याने म्हणताच ”तिघांच्या अंगावर भीतीचा शहारा सरकन उभा राहिला.
तो पुढे म्हणाला,“इथे प्रत्येक अमावस्येला,एक कर्णकर्कश, भेसूर आणि शापित किंकाळी घुमते.” “ती ज्याला ऐकू येते,तो कायमचा मुक व कर्णबधिर होतो.” तिघांचे चेहरे पांढरे फटक पडले. केअर टेकरने खाली मान घातली आणि थरथरत्या आवाजात पुढे सांगू लागला की “अशा प्रकारे मूक-कर्णबधिर झालेल्यांची आणि तुमच्यासारख्या सुदैवी लोकांची तरी सुटका होते. पण माझी इथून कधीच सुटका होणार नाही. मी सुद्धा एके काळी इतरांसारखाच होतो. एका काळ्याकुट्ट रात्री त्या पिशाच्च शक्तीच्या कचाट्यात सापडलो आणि तेव्हापासून इथेच कायमचा अडकलो आहे. आता माझ्यासाठी बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही.एका अमावस्येच्या रात्री, त्या भेदक किंकाळीने मला मूक आणि कर्णबधिर करून टाकले आणि पुढच्या अमावस्येला, तीच किंकाळी मला पुन्हा बोलायला पुन्हा ऐकायला भाग पाडते.”तो क्षणभर थांबला डोळे मिटले आणि जड आवाजात म्हणाला “हा एक शाप आहे जो प्रत्येक महिन्याला पुन्हा पुन्हा मला अनुभवावा लागतो."
बाकीचे लोक कायमचे मूक-कर्णबधिर होतात आणि परत घरी जातात. मी ही या गूढ घटनेमुळे कर्णबधिर होऊन घरी गेलो होतो. घरच्यांनी माझ्यावर खूप उपचार केले पण सर्व काही व्यर्थ ठरले. शेवटी एका मांत्रिकाने यावर एक उपाय सांगितला ‘त्याला पुन्हा त्या ठिकाणी घेऊन जा जिथे ती किंकाळी ऐकू येते. पण यावेळी तो एकटाच गेला पाहिजे.’
अमावस्येच्या त्या कर्कश किंकाळीने मी तर वाचलो, पण माझ्या मागोमाग काळजीपोटी इथवर आलेल्या घरच्यांना त्या पिशाच्च शक्तीने सोडले नाही. माझी बायको आणि मुलगा दोघांनाही मूक-कर्णबधिर केले आणि हळूहळू त्यांना वेडेपणाच्या अंधारात ढकलले. आजही ते दोघे माझ्यासोबत इथेच अडकून आहेत. क्षणभर सगळीकडे भयाण शांतता पसरली. तो मग हळूहळू म्हणाला “हे गुपित मी फक्त त्यांनाच सांगतो जे यातून वाचलेले आहेत. तुम्हीही हे कुणालाही कधी सांगू नका. नाहीतर तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो ” हे शब्द उच्चारताना त्याच्या नजरेतला गंभीर इशारा,त्या तिघांसाठी पुरेसा होता.
तिघांची भीतीने गाळण उडाली होती.निघताना अमोल म्हणाला की “आपण किती मोठ्या संकटातून वाचलो,हे माहित आहे का ?” हा विचार त्यांच्या अंगावर काटा आणणारा होता. तेवढ्यात बरोबर १० वाजता जीपचा हॉर्न वाजला. तिघांनी एकही क्षण न दवडता आपापल्या बॅगा उचलल्या आणि मागे वळून न पाहता ते तडक बाहेर पडले. जाता जाता त्यांच्यापैकी एकाने केअर टेकरच्या हातात २००० रुपये टेकवले. केअर टेकर काहीच बोलला नाही. फक्त त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. जीप हळूहळू गेटबाहेर निघाली आणि गेस्ट हाऊस पुन्हा एकदा शांततेत बुडून गेले.
“जीप गेटबाहेर निघून गेली तिघांनीही बिलकुल मागे वळून पाहिले नाही.गेस्ट हाऊस पुन्हा एकटे पडले होते. तळ मजल्याच्या लॉबीमध्ये,तोच केअरटेकर शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हळूच एक विचित्र हसू उमटले म्हणाला “वाचलात तुम्ही परत कधी येऊ नका”आणि अचानक त्याच्या मागच्या बंद दरवाज्यांमधून एका मागोमाग एक कुणाच्यातरी श्वासांचे जोरात आवाज यायला लागले.कारण त्या खोल्या बंद असल्या तरी त्या रिकाम्याच नव्हत्या.
जर तुम्हाला “शापित गेस्ट हाऊस” ही कथा आवडली असेल, तर अशाच आणखी भयानक आणि थरारक कथा वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या. आम्ही तुम्हाला दरवेळी नवीन Horror Story Marathi, Real Haunted Experiences आणि True Ghost Stories देत राहू.
समाप्त🖋️📖📚

🔗 "तहान की शाप - धावजी बाबांनी वाचवले"|कमळगड ट्रेकवरील थरारक मराठी भयकथा
कमळगड ट्रेक दरम्यान घडलेली एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी कथा. तहानेने व्याकूळ झालेल्या सुनीलने विहिरीचे पाणी प्यायल्यावर सुरू होतो एक भयानक अनुभव पण शेवटी धावजी बाबांच्या कृपेने संकटातून सुटका होते.Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल.पुढे वाचा..👉
📖 🌐 "शापित गेस्ट हाउस" इस कहानी को अन्य भाषाओं में पढ़ें..
🌍 English
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.
तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.
धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved
(ओमकार शिवलकर)
📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा