मुख्य सामग्रीवर वगळा

7)रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7)

 रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7)

"रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7) – पोर्ट एमेरादोतील लोकशाही पुनर्स्थापना दिनाचा भव्य सोहळा, हजारो नागरिक राष्ट्रध्वजांसह, पार्श्वभूमीत संसद भवन, शांत आकाशात उड्डाण करणारे विमान आणि नव्या लोकशाहीच्या विजयाचे प्रतीकात्मक दृश्य."

🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अंतिम तास (Episode 6) 👉

हा संपूर्ण मालिकेचा उत्कर्षबिंदू आहे. जनरल माँटेरो आणि लेफ्टनंट जनरल महारथ यांच्यातील बुद्धी, संयम आणि नेतृत्वाचा अंतिम सामना येथे घडतो. मध्यरात्रीच्या काही मिनिटांपूर्वी संपूर्ण रुथरी गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असतो; पण एका निर्णयामुळे रक्तपात टळतो. जनरल माँटेरो सत्तेचा राजीनामा देतो, सैन्य घटनात्मक पद्धतीने महारथ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र राहते या साठी मागचा भाग लिंक वर क्लिक करून वाचा त्यानंतर पुढील भाग 7 अवश्य वाचावा..

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7)

रक्ताचा एक थेंबही न सांडता,शांतपणे एका राष्ट्राने हुकूमशाहीवर विजय मिळवून लोकशाहीची पुनर्स्थापना कशी केली? 'रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट' या मालिकेच्या अंतिम भागात वाचा भीतीवर मात, शांततापूर्ण सत्तांतर आणि इतिहास बदलणाऱ्या एका विलक्षण मानसशास्त्रीय मोहिमेची प्रेरणादायी सांगता.
मागील भाग 6 वरून पुढे..

अ)उपसंहार - इतिहासाचा निकाल

सहा महिन्यांनंतर..

संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली रुथरीमध्ये अनेक दशकांनंतर प्रथमच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पडल्या.

जनरल महारथ यांनी प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला.

मुक्त वातावरणात निवडणूक झाल्याने रुथरीच्या जनतेने मतदानात उत्साहाने भाग घेतला.त्याचा परिणाम असा झाला की रिपब्लिक ऑफ रुथरी आयलंड मध्ये ऑल रुथरी नॅशनलिस्ट पार्टीचे उमेदवार बहुमताने निवडून आले. अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही असल्याने ऑल रुथरी नॅशनलिस्ट पार्टीचा प्रेसिडेंट प्रथमच सत्तेवर विराजमान झाला.तब्बल 39 वर्षांनंतर पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून आलेत.

लष्कर प्रमुख म्हणून महारथ यांनी केवळ शांततापूर्ण सत्तांतराची जबाबदारी पार पाडली आणि नंतर सत्ता लोकनियुक्त सरकारकडे विधिवत सुपूर्द केली.

जनरल माँटेरोवर न्यायालयात खटला चालला.

त्याला सूडाने नव्हे..

तर कायद्याने शिक्षा झाली.

काही महिन्यांनंतर एका पत्रकार परिषदेत लुईस आणि व्हिक्टर यांनी जगासमोर एकच वाक्य उच्चारले.

"त्या रात्री आमच्या वडिलांनी सत्ता गमावली पण रुथरीने खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकली."

इतिहासात त्या घटनेची नोंद केवळ एका विमान अपहरणाची म्हणून झाली नाही तर रक्ताचा एक थेंबही न सांडता एका राष्ट्राने हुकूमशाहीवर मिळवलेल्या सहज विजयाची झाली.

रिपब्लिक ऑफ रुथरीमध्ये नव्या सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले होते.

देशात पहिल्यांदाच मुक्त प्रसार माध्यमे कार्यरत होती.

राजकीय कैद्यांची सुटका झाली होती.

न्यायालये पुन्हा स्वतंत्रपणे काम करू लागली होती.

लष्कराला पुन्हा संविधानाच्या चौकटीत आणण्यात आले होते.

परदेशी खनिज करारांचे पुनरावलोकन सुरू झाले होते.

रुथरी हळूहळू भीतीतून विश्वासाकडे प्रवास करत होता.

राजधानी पोर्ट एमेरादोच्या मध्यभागी नव्याने उभारलेल्या "लोकशाही चौकात" हजारो नागरिक जमले होते.

त्या दिवशी "स्वातंत्र्य दिन" नव्हता...

तर तो होता "लोकशाही पुनर्स्थापना दिन."

लोकांनी हातात राष्ट्रीय ध्वज घेतला होता.

त्या व्यासपीठावर नाव नियुक्त राष्ट्रपतींचे भाषण झाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी संविधानाची प्रत उंचावत घोषणा केली

"आजपासून रुथरीमध्ये कोणताही माणूस कायद्यापेक्षा मोठा नाही."

हजारो लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

समारंभाच्या शेवटी जनरल महारथ यांना बोलावण्यात आले.

ते अजूनही साध्याच लष्करी गणवेशात आणि साध्या आवेशात होते.

छातीवर कोणतेही नवीन पदक नव्हते.

त्यांनी व्यासपीठावर येऊन फक्त काहीच वाक्ये बोलली.

"हा विजय माझा नाही."

"ज्यांनी भीतीपुढे गुडघे टेकण्यास नकार दिला आणि शांतपणे आंदोलन करत सत्तांतर केले, कुठेही हिंसेचे गालबोट लागू दिले नाही. रुथरी मधील त्या संयमी जनतेचा हा विजय आहे."

"हा विजय त्या सैनिकांचा आणि पोलिसांचा सुद्धा आहे, ज्यांनी संयमाने परीस्थिती हाताळत, जुलमी हुकूमशाहीला शेवटच्या क्षणी डोके वर काढायला दिले नाही."

"आणि हा विजय त्या चार जणांचा जास्त आहे.."

" ज्यांनी जीवावर उदार होऊन,एकही गोळी न झाडता संपूर्ण इतिहासच बदलला."

संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

त्या दिवशी पहिल्यांदाच त्या चार जणांची ओळख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

दोन एअर होस्टेस.

दोन फ्लाइट पर्सर.

त्यांच्या नावांवर कोणताही चित्रपट बनला नाही.

त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले नाही.

त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही.

ते पुन्हा आपल्या सामान्य आयुष्यात परतले.

कारण..

त्यांना प्रसिद्धी नको होती.

त्यांना त्यांच्या देशातील लष्करी हुकूमशाही मुळे होणारी,जनतेची घुसमट संपवायची होती.

लुईस आणि व्हिक्टर यांनीही सार्वजनिक जीवन स्वीकारले.

त्यांनी आपल्या वडिलांच्या राजवटीतील चुका उघडपणे मान्य केल्या.

एका मुलाखतीत पत्रकाराने त्यांना विचारले.

"त्या रात्री तुम्हाला सर्वात मोठा धक्का कशाचा बसला?"

लुईस हसला.

"आम्हाला वाटत होतं.."

" की आम्हाला बंदुकीने ओलीस ठेवलं आहे."

व्हिक्टर पुढे म्हणाला

"पण नंतर समजलं.."

"आम्हाला फक्त आणि फक्त भीतीने ओलीस ठेवलं होतं."

त्या घटने नंतर अनेक देशांच्या लष्करी अकादमींमध्ये आणि नेतृत्व प्रशिक्षण संस्थांमध्ये त्या मोहिमेचा अभ्यास सुरू झाला.

त्याला नाव देण्यात आले,

"ऑपरेशन सायलेंट चेकमेट."

एकही गोळी न झाडता.

कुणाला कोणत्याही प्रकारची क्षती न पोहचवता

एकही बॉम्ब न फुटता..

आणि हजारो लोकांचे प्राण वाचवत..

एका हुकूमशहाला सत्ता सोडण्यास भाग पाडणाऱ्या त्या कारवाईला आधुनिक इतिहासातील सर्वात विलक्षण मानसशास्त्रीय मोहिमांपैकी एक मानले गेले.

त्या नंतर राजधानी पोर्ट एमेरादोच्या एअरपोर्ट वरून अनेक  विमानांनी सिडनीच्या दिशेने उड्डाणे केलीत,

तेच आकाश..

तोच प्रशांत महासागर..

पण या वेळी कोणत्याही प्रवाशाच्या मनात भीती नव्हती.

होती फक्त स्वातंत्र्याची जाणीव.

विमान ढगांमध्ये हरवून गेले.

खाली अथांग महासागर शांत होता.

आणि इतिहास..

पुन्हा एकदा सिद्ध करत होता,

साम्राज्ये तलवारीने उभी राहू शकतात..

खरी लोकशाही ही नेहमी लोकांच्या संयमावर आणि शांततेत होणाऱ्या आंदोलनावर उभी असते. हे जगाला रुथरीच्या जनतेने दाखवून दिले..

समाप्त 🖋️📚📖

हा भाग आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील एपिसोड 2 साठी 'Sjomkar Blog | शब्दांची मुशाफिरी'ला अवश्य भेट द्या..
आम्हाला फॉलो करण्यासाठी Search 🔍☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

  👨🏻‍💼  Connect With Us

📧 Gmail: sjomkar21@gmail.com

🌐 Follow & Connect


📌 Pinterest

✍️ Quora

🧵 Threads

📖 Medium

💬 WhatsApp Channel

🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या. 

ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून  "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.


💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो

📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!










टिप्पण्या

  1. शांततेची ताकद अनेकदा शस्त्रांपेक्षा मोठी असते. रुथरीच्या जनतेने सिद्ध करून दाखवले.

    उत्तर द्याहटवा
  2. लोकशाहीचा खरा विजय हिंसेत नसतो, तर जनतेच्या संयमी आणि अहिंसक लढ्यात असतो. रुथरीची कहाणी प्रेरणादायी आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...