अस्वीकरण.या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी वाचनात आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे
"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा"
“सकळांशी शहाणे करूनि सोडावे ।
आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”
आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”
(सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )
🔗 'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..
मागील कथा ही लघु लेख आहे म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.
'मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश' |रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा
'समर्थ रामदास स्वामी' यांच्या मनाचे श्लोकांमधील जीवन बदलणारे उपदेश आणि ३ प्रेरणादायी कथा जाणून घ्या. मन शांत, यशस्वी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी हे विचार आणि लघु कथा नक्की वाचा.
समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' हे केवळ काव्य नसून जीवनाला योग्य दिशा देणारे अमूल्य मार्गदर्शन आहे. सकारात्मक विचार, आत्मसंयम, धैर्य आणि सदाचार यांचे महत्त्व या श्लोकांमधून प्रभावीपणे सांगितले आहे. या लेखात मनाचे श्लोकांतील निवडक उपदेश, त्यांचा आजच्या जीवनाशी असलेला संबंध आणि त्यावर आधारित तीन प्रेरणादायी कथा सोप्या मराठीत मांडल्या आहेत. मन शांत, सकारात्मक आणि यशस्वी बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा लेख अवश्य वाचावा
महान संत समर्थ रामदास स्वामी यांनी २०५ उपदेशात्मक 'मनाचे श्लोक' रचलेले आहेत.हे श्लोक मनाला योग्य मार्गावर नेण्यासाठी, आत्मशुद्धी आणि सदाचार शिकवण्यासाठी लिहिले गेले आहेत.प्रत्येक श्लोक हा मानवी ‘मनाला’उद्देशून आहे. साध्या,सोप्या भाषेत प्रभावीपणे आत्मसंयम, भक्ती, विवेक, सदाचार याचे सम्यक ज्ञान ते देतात. ‘मनाचे श्लोक’ म्हणजे मनाला योग्य मार्ग दाखवणारा आध्यात्मिक दिपस्तंभ आहे.’मनाचे श्लोक’ हे एकूण २०५ असून ते ओवी छंदात रचलेले आहे. ते बोलीभाषेत, प्रवाही आणि उपदेशात्मक आहेत. समर्थ रामदास स्वामी यांचा ‘दासबोध ग्रंथ’ हा जीवन जगण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारा,आध्यात्मिक आणि व्यवहारिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे जीवन कसे जगावे ? जीवनात कसा विचार करावा ? आणि कसे यशस्वी व्हावे ? याचे मार्गदर्शन करणारा खजिना आहे. त्यात २० दशक (भाग) असून प्रत्येक दशकात १० समास (अध्याय) असे मिळून एकूण २०० समास आहेत.
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात मनाला शांतता आणि योग्य दिशा देणाऱ्या गोष्टींची गरज अधिक जाणवते. अशा वेळी आपल्या संत परंपरेतील विचार आपल्याला आधार देतात. 'समर्थ रामदास स्वामी' यांचे विचार याच संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहेत.त्यांच्या शिकवणीचा प्रसार आणि आचरण करण्यासाठी ‘श्री बैठक’ तथा ‘समर्थ बैठक’ हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो.समर्थ शिकवण प्रत्यक्ष जीवनात आचरणात कशी आणायची याचे कार्यात्मक उदाहरण म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांची ‘श्री समर्थ सेवा’. या तत्वाद्वारे सामाजिक कार्य केले जाते.समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत समर्थांचे विचार पोहोचविण्याचा या तत्वाचा प्रयत्न असतो.त्याच प्रमाणे त्यांनी समाजात सेवा, शिस्त आणि सदाचार यांचा प्रसार केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी आपले जीवन सकारात्मक दिशेने बदललेले आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवते. स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, व्यसन मुक्ती मोहीम,युवकांना मार्गदर्शन या व अश्या सारख्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे समाजात चांगले संस्कार रुजवले जात आहेत,तसेच समाजात जागरूकता निर्माण केली जात आहे.
या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सेवा भाव. हजारो स्वयंसेवक कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी कार्य करतात. त्या वेळी “समाजाची सेवा हीच ईश्वरसेवा” हा विचार त्यांच्या कामातून स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ही संस्था केवळ धार्मिक कार्यापुरती मर्यादित नसून समाजकल्याणासाठी सजग आणि सक्रियपणे कार्य करते. समर्थ बैठकां द्वारे साप्ताहिक किंवा विशेष दिवसांच्या वेळेला 'समर्थ रामदास स्वामीच्या' विचारांचे सोप्या भाषेत निरुपण केले जाते.
भारतीय संस्कृतीत “गुरू” या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पण ‘सदगुरू’ हा त्याहूनही श्रेष्ठ मानला जातो, कारण तो केवळ ज्ञान देत नाही तर जीवनाला योग्य दिशा देतो. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या “श्री समर्थ सेवा” या संकल्पनेत ‘सदगुरू’चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सदगुरू’ म्हणजे सत्याचा मार्ग दाखवणारा, अज्ञान दूर करणारा आणि शिष्याला योग्य जीवनपद्धती शिकवणारा मार्गदर्शक. ही संकल्पना ‘समर्थ रामदास स्वामी’यांच्या शिकवणीवर आधारित आहे. त्यांनी समाजाला शिस्त, सदाचार आणि भक्ती यांचे महत्त्व पटवून दिले, आणि हाच वारसा पुढे ‘श्री समर्थ सेवा’ मधून जपला जात आहे.
आज गावोगावी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या ‘समर्थ बैठका’आहेत. या समर्थ बैठकांद्वारे मनाचे आरोग्य कसे जपावे ? तसेच सदाचारी विचारांचा समाजाला कितपत उपयोग होईल ? या साठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांनी सन 1 ऑक्टोबर 1943 रोजी त्यांची पहिली ‘समर्थ बैठक’सुरु केली. तेव्हा त्यांचे अनुयायी हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतके म्हणजे इनमिन ‘पाच’अनुयायी होते. लोकोत्तर विभुतींना त्यांच्या समाजोपयोगी कार्यात प्रत्येक वेळी विरोध झालेला आहे. तसाच विरोध नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा झाला होता. असे असताना सुद्धा नानासाहेबांनी हाती घेतलेले आपले कार्य काही थांबविले नाही.शेवटी परिणाम काय झाला ? विरोध करणारे विरोधकच त्यांचे अनुयायी झाले. याला म्हणतात काळाचा महिमा.
समर्थ बैठकांचे बीज पेरले परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांनी, वृक्ष वाढवला, महाराष्ट्र भूषण,पद्मश्री श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी, परमपूज्य 'आप्पासाहेब'सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात ‘ग्राम महसूल अधिकारी’ होते. दिवसभर सरकारी काम आणि संध्याकाळी सर्व लोकांना एकत्र करून समर्थ बैठकीची सुरुवात हा त्यांचा नित्यक्रम होता. पितापुत्रांनी त्यांचा तो उपक्रम नेटाने पुढे नेला.आता त्या डेरेदार वृक्षाच्या संवर्धनाचे काम आप्पासाहेब यांचे चिरंजीव डॉ.श्री. सचिन दादा धर्माधिकारी करत आहेत. स्वतः पेशाने MBBS डॉक्टर असून ते ‘श्री समर्थ बैठक'चळवळ समर्थपणे पुढे नेत आहेत.‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’ही कुणा व्यक्तींची कथा राहिलेली नाही.तर ती आहे,तीन पिढ्यांनी घडवलेली एक समर्थ विचारसरणी. आज या विचारसरणीचे 1 कोटी पेक्षा अधिक साधक आहेत.सदर प्रतिष्ठानचे कार्यक्षेत्र मुख्यतः महाराष्ट्रात जरी असले तरी भारतातील इतर भागांत आणि परदेशातही त्याचा प्रभाव दिसून येतो. अनेक लोक या संस्थेशी जोडले गेले आहेत आणि समाजासाठी ते योगदान देत आहेत.
संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सेवा भाव. त्यांचे हजारो साधक हे स्वयंसेवक भूमिकेतून निरपेक्ष भावाने समाजासाठी कार्य करत असतात. “समाजाची सेवा हीच ईश्वरसेवा” हा विचार त्यांच्या कामातून स्पष्ट दिसून येतो. आजच्या तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक जीवनात 'वैफल्यग्रस्त' हा मनोविकार खूप वाढलाआहे.अशावेळी मानवी मनाला उभारी देणाऱ्या अशा संस्थांची समाजाला विशेष गरज आहे. या संस्था माणसाला केवळ यशस्वी नव्हे, तर चांगला आणि जबाबदार नागरिक सुद्धा बनवतात.
आजच्या आधुनिक युगात समाजाच्या विकासासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून नैतिक मूल्ये, शिस्त आणि सेवा भाव यांचीही तितकीच गरज आहे. अशा वेळी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या संस्था अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यापैकी 'नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'ही एक प्रभावी सामाजिक-आध्यात्मिक संस्था आहे.
'नानासाहेब धर्माधिकारी' हे ‘समर्थ रामदास स्वामी’ यांच्या शिकवणीचे अनुयायी होते. त्यांनी ‘श्री समर्थ सेवा’ या तत्त्वावर समाजात सेवा, शिस्त आणि सदाचार यांचा प्रसार केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी आपले जीवन सकारात्मक दिशेने बदलले.
शासन दरबारी 'नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या' लोकोपयोगी कार्याची उचित नोंद घेण्यात येऊन जेष्ठ निरुपणकार पद्मश्री श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च आणि मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भर दुपारच्या टळटळीत उन्हाची पर्वा न करता त्यांचे लाखो साधक तो सोहळा ‘याची डोळा, याची देही’ पाहण्यासाठी हजर होते. 'माणूस घडविण्याचे विद्यापीठ’ हे गौरवोद्गार त्या पुरस्कारा दरम्यान काढले गेले.'अप्पासाहेबांच्या' प्रति काढले गेलेले ते गौरवोद्गार अत्यंत सार्थ आहेत.
‘श्री बैठक’ म्हणजेच समर्थ बैठकांमुळे अनेक लोकांची आयुष्य बदलली आहेत,या बाबतच्या तीन लघु कथा या पुष्ठ्यर्थ्य पुढे…
माझी दुसऱ्या कार्यालयात बदली झाली आणि एक दिवस मला बातमी आली की ‘सुनील शुक्रे’ बेपता झाला आहे. पोलिस तपास सुरू झाला, परंतु त्याचा काही शोध लागेना म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या जागेवर नोकरीचा दावा केला.कार्यालयाने सांगीतले ‘लापता प्रकरण’ असल्याने नियमानुसार ‘सात वर्ष’ बेपत्ता व्यक्तीची वाट पहावी लागेल. तिचा दावा त्या नुसार तूर्त नाकारण्यात आला. घरच्या आणि ऑफिसच्या त्रासाला ‘सुनील’ खूप त्रासला होता. खूप झाले, सहनशक्तीच्या पलीकडे गेले. त्याने पळून जायचा निर्णय घेतला.भुसावळ हे जंक्शन आहे ,तिथून मग पुढे जिकडे वाट फुटेल तिकडे जायचे त्याचे ठरवले.खिशात आठवडाभर पुरेल इतकी कॅश होती.एटीएम कार्ड वापरले तर बायकोला आपला शोध लागेल म्हणून त्याने ते घरीच ठेवले होते. ट्रेनने भुसावळला आल्यावर, त्याला पुढे जायचा कंटाळा आला. आता इथेच थांबायचे त्याने ठरवले.
भुसावळ येथील त्याच्याच विभागाच्या एका ऑफिस मध्ये तो शिरला,त्याला तिथे कोणी ओळखत नव्हते. त्याने सर्व स्टाफची पाहणी केली. कोणता चेहरा आपल्याला मदत करेल ? याची तो चाचपणी करत होता. शेवटी त्यातील एकजण त्याला मदत करेल असे त्याला वाटले म्हणून तो त्याच्या बाजूला जाऊन बसला. “त्याने विचारले काय काम आहे ?” त्याने हळूच त्याची ओळख दिली आणि त्याचे ऑफिसचे ओळख पत्र त्याला दाखवल्यावर त्याचा त्यावर विश्वास बसला मग ‘सुनील’ ने त्याला सर्व त्याची कहाणी सांगितली आता “मला मुंबईला परत जायचे नाही, इथे भुसावळ ,मध्ये तुमच्या ओळखीने मला नोकरी मिळेल का ?” असे त्याने त्याला विचारले त्याने सांगितले “ठीक आहे, संध्याकाळी मला परत भेटा, ऑफिस सुटल्यावर मी तुम्हाला एके ठिकाणी घेऊन जाईन” त्या प्रमाणे ‘सुनील’ त्याला भेटल्यावर, तो संध्याकाळी त्याला एका शाळेत घेऊन गेला. नशिबाने त्यावेळी त्या शाळेचे ‘प्रिन्सिपल’ अजून शाळेत होते. त्याने ‘सुनीलची’ सर्व कहाणी, त्यांना सांगितली “त्याला तुमच्या शाळेच्या ऑफिस मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर काही दिवस कामाला ठेवा” प्रिन्सिपल म्हणाला “ठीक आहे”त्यांनी त्याला शिपाई क्वार्टर ची बाजूची रूम राहायला दिली.शाळेच्या ऑफिस मध्ये तो काम करायला लागला.
त्याच शाळेच्या एका वर्गात भुसावळ मधील ‘श्री सेवक’ दर रविवारी सकाळी महिला आणि संध्याकाळी पुरुष या प्रमाणे जमायचे आणि ‘समर्थ रामदास स्वामीच्या’ श्लोकांचे निरुपण करायचे.प्रार्थना,नामस्मरण,मार्गदर्शन,जीवन उपदेश असा बैठकीचा कार्यक्रम असायचा. सण किंवा विशेष दिवशी सुद्धा त्यांचा हाच कार्यक्रम असायचा.सर्व साधक ‘समर्थ बैठकीला’ भरभरून हजर रहायचे.’सुनील’ हा शाळेचा स्टाफ असल्याने ‘सुनील’ श्री सेवक मंडळी मध्ये सहज एकरूप झाला. आध्यात्मिक आणि सत्शील वातावरणात राहून ‘सुनील’ परत माणसात आला. त्याच्यात मनोधैर्य परत आले, हिंमत वाढली. दारू कायमची सुटली होती. आता त्याला घरची ओढ लागली होती. मुलगा, आईची आठवण येत होती.आता आईला आणि बायकोला सुद्धा मुंबईतील समर्थ बैठकीला घेवून जायचे त्याने मनोमन ठरवून टाकले.’समर्थ बैठकीने’संसारातून उठलेल्या एका माणसाला व्यसनमुक्त करून,सुधारून परत त्याच्या संसारात आणले.
मुंबईला निघताना,'सुनील'ने त्याची सर्व हकीकत उपस्थित साधकांना सांगितली.,सर्व श्री साधकांना वंदन करून, त्यांचे मनःपूर्वक आभार मानून,त्याने भुसावळचा निरोप घेतला आणि तो मुंबईत परतला. माझ्या बदली नंतर सुनीलच्या ऑफिस मध्ये कामानिमित्त मी एकदा गेलो होतो, तेव्हा ‘सुनील’ मला भेटला.पहिल्या पेक्षा आनंदी आणि उत्साही दिसला.त्याला त्या स्थितीत पाहून खूप बरे वाटले.
ब) जिद्द मनाची - साथ 'श्रीसेवकांची' -
माया एक शांत समाधानी सुखवस्तू साधी गृहिणी आहे. घर, संसार, मुले,सगळे काही सुरळीत चालले होते.तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिला सांगण्यात आले की “तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आहे”तो शब्द ऐकताच तिचे हातपाय लटपटले ती मनातून कोलमडली होती.भीती, नैराश्य, आणि एकच विचार,“आता माझे काय होणार? मी आता मरणार”
टाटा हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले,केमोथेरपी, औषधे.खूप त्रासदायक उपचार सुरू होते.शरीरापेक्षा मन हरले होते,तिचे मन खचले होते,एक सारखे मरणाचे विचार येत होते,मरणाचा विचार तिला अस्वस्थ करायचा. ती स्वतःशीच म्हणायची,“मी काही आता वाचणार नाही.”घरच्यांनी तिला खूप धीर दिला, पण ती आतून मात्र तुटत चालली होती,कोसळत होती.केमोथेरपीचे त्रासदायक उपचार संपल्यावर तिला घरी जाण्यासाठी ‘Discharge’ देण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले “तुमची बाजी आता तुमच्याच हातात आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, यातून स्वतःला फक्त आणि फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता,तुम्ही प्रयत्न करा, यातून सहिसलामत बाहेर पडाल” डॉक्टरांचे ते बोलणे तिच्या भावाने ऐकले, तो मायाच्या नवऱ्याला म्हणाला “भावोजी ,मी मायाला , माझ्या कडे ‘पालघरला’ काही दिवस घेऊन जातो, शुद्ध आणि आल्हाददायी वातावरण या मुळे तिच्यात नक्कीच फरक पडेल. मी ‘समर्थ बैठकीला’ जिकडे जातो, तिथे मायाला सुद्धा घेऊन जाईन”, माहेरला जायचे म्हटले की सर्व स्त्रिया खुशीत असतात.तशी 'माया'सुद्धा खुश झाली. तिची वहिनी सुध्दा प्रेमळ होती. वेदना,चिंता,दुःखाच्या स्थितीत माहेरचे नाव काढल्यावर तिच्या वेदनेवर पहिली फुंकर बसली होती. माहेराला जायला मिळेल म्हणून ती मनातून खुश होती.
एक दिवस रविवारी सकाळी तिची वहिनी “प्रीती”तिला समर्थ बैठकीला घेऊन गेली. बैठक एका मध्यम आकाराच्या हॉल मध्ये भरली होती. दरवाजावर ‘समर्थ बैठक’ म्हणून ऍक्रेलिक च्या नावाची छान पाटी होती.आत गेल्यावर स्वच्छ सतरंज्या अंथरल्या होत्या. भिंतीवर गणेश, श्रीराम ,हनुमंत,समर्थ रामदास स्वामी, यांच्या सुन्दर तसबिरी लावलेल्या होत्या. भिंतीवर मोठा देव्हारा होता त्यात ‘सदगुरू श्रीपाद वल्लभ’ यांची दोन हात पुढे दुमडलेली तसबीर होती त्या खाली ‘श्री राम समर्थ ‘ असे लिहिलेले होते.हॉल हवेशीर होता,सुगंधी आणि प्रफुल्लित वातावरण होते.रविवारी सकाळी महिलांसाठी तर संध्याकाळी पुरुषांची साधना असते, रविवार असल्याने सकाळच्या सत्रात अनिकेतची बायको ‘प्रीती’ मायाला घेऊन आली होती..
वहिनी सोबत,माया शांतपणे मागे बसली.मन मात्र भरकटलेले, अस्थिर, भेदरलेले होते.निरुपण अगदी वेळेवर सुरू झाले, त्या अगोदर हॉल साधकांनी पूर्ण भरलेला होता. ते भक्तिमय वातावरण पाहून तिच्या मनात आश्वासकता जागी झाली.प्रार्थना सुरू झाली,त्या प्रार्थनेमुळे तिच्या मनाला उभारी मिळाली, त्या नंतर निरूपण सुरू झाले.निरुपण करणाऱ्या महिला साधक होत्या.त्यांच्या स्पष्ट, धीर गंभीर आणि कर्णमधुर आवाजात त्यांनी म्हटले “आजार शरीराला होतो,पण हार कधी होते तर जेव्हा मन हरते, तेव्हा.” या वाक्याने माया थबकली.“देवाने दिलेले आयुष्य अपूर्ण नाही.आपण संकटा समोर हार मानून त्याला अपूर्ण करतोय. सतत नकारात्मक विचार करून, आपल्या जीवाचे खरे शत्रु आपणच असतो”तिच्या डोळ्यात पाणी आले “लढणे थांबवले की माणूस हरतो,लढत राहिला तर तो जिंकतो”त्या शब्दांनी तिच्या मनात एक ठिणगी पेटली.त्या दिवसानंतर माया नियमित बैठकीत जाऊ लागली.ती स्वतःशी म्हणू लागली.“मी आजाराशी नाही,माझ्या भीतीशी लढतेय.” हळूहळू तिचे मन मजबूत होऊ लागले.
उपचार सुरूच होते पण आता ती रडत नव्हती,ती हसायला लागली.इतर रुग्णांनाही धीर द्यायला लागली.डॉक्टरही म्हणाले,“तुमचा Attitude आता बदललाय, तुम्ही आता फुल पॉझिटिव्ह झालेले आहात, हे उपचाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.”“विजय कशाला म्हणतात? परिस्थितीवर मात करणे कशाला म्हणतात ? हे तुम्ही सर्वांना दाखवून द्यायला लागला आहात” काही महिन्यांनी तिची प्रकृती सुधारू लागली.ती पुन्हा घरी, मुलांमध्ये , संसारात रमू लागली.एक दिवस कोणी तरी विचारले,“तू कशी बरी झालीस ?”ती शांतपणे म्हणाली,“औषधांनी शरीर वाचवले पण समर्थ बैठकीच्या निरूपणाने माझे मन वाचवले,आजार शरीराला होतो,पण जिद्द मनाला बळ देते,आणि तेच खरे उपचार असतात.”
‘पालघर’ वरून परतल्यावर तिने ‘समर्थ बैठक’ काही सोडली नाही. ती मुंबईत ‘मालाड’येथे राहत होती, ती जवळच्या समर्थ बैठकीत जाऊ लागली. आता 'माया ' कडे पाहिले तर ती तरी कधी आजारी होती कां ? हे कुणाला कळणार सुद्धा नाही.ती पहिल्या सारखी झाली आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा समर्थ बैठकीला तिने पाठवायला सुरुवात केली. “सदगुरू सदा सहाय्यते” याची प्रचिती मायाला आली होती.
“बरे झाले साहेब, आज तुम्ही एकटेच आहात ,मला तुमच्याशी खासगी बोलायचे आहे.आमची कामे आपुलकीने करणारे तुम्ही आहात, म्हणून मी तुम्हाला सांगतोय ” असे म्हणून तो थोडावेळ शांत झाला.मी म्हटले, "अरे बोल की मित्रा, असा थांबलास का ? मनात काहीही त्रास देणारे साठवून ठेवायचे नसते, त्याचाच माणसाला जास्त त्रास होतो” असे मी म्हणण्याचा अवकाश लगेच तो भडाभडा बोलायला लागला. “साहेब, मला जीव द्यायचा आहे” त्याने असे म्हणताच, मी जागेवरच उडालो, मन क्षणभर सुन्न झाले होते, मनातच म्हटले “हा असा काय बोलतोय” ? मी शांत होऊन त्याला म्हणालो “तू अगोदर शांत हो” माझ्या हातातली पाण्याची बाटली त्याच्या पुढे केली आणि त्याला म्हटले “अगोदर पाणी पी, मग आपण बोलू “ तो गटागट पाणी प्यायला. मी त्याला शांतपणे म्हटले “आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्या मुळे तू हा अविचार सोडून दे”त्यावर तो म्हणाला,“साहेब, मी जीवनाला इतका वैतागलो आहे, की बस रे बस ! मी जीव देतो, बघाच आता तुम्ही, समोरून येणाऱ्या ट्रक खाली आता मी झोपतो” मी त्याचा हात पकडून ठेवला आणि म्हणालो “अरे मित्रा, मला कशाला तू प्रॉब्लेम मध्ये आणतोयस ? शेवटी क्षणी, तुझ्या बरोबर मी होतो, म्हणून मला जास्त त्रास होईल, आत्महत्या करणे हा पळपुटेपणा आणि वेडेपणा आहे, हे अगोदर लक्षात घे, मानवी जीवन असे सहजच प्राप्त होत नाही.त्या साठी त्या जीवात्म्याला ८४ लाख योनींमधून भ्रमण करावे लागते आणि त्यानंतरच हा मानवी जन्म मिळतो ” मी पुढे म्हणालो “अमित, असे काय झाले तुझ्या जीवनात की तुला जीव द्यावासा वाटतोय ? मला शांतपणे नीट सांग.” मी म्हणालो “तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे आहे. सांग मला”
त्याचे डोळे आत गेले होते, डोळ्या खाली काळेपणा आला होता.आवाजात अनामिक भीती होती,तो बोलायला लागला “ साहेब,नोकरी, घर, मित्र,सगळे काही माझे व्यवस्थित आहे परंतु आतून मी हळूहळू रिकामा होत चाललोय. दिवसा मागून दिवस संपायचे पण त्याचे मला काहीच वाटायचे नाही. रात्री झोपच लागत नाही. झोपते वेळी अनामिक भीती निर्माण होते.दरदरून घाम फुटतो.मी झोपेसाठी वळवळत असतो,छताकडे बघतच मी स्वतःलाच विचारतो,की माझे आयुष्य नेमके कशासाठी आहे?कुणासाठी आहे? मी जन्माला येऊन असे काय केले आहे ?माझे जीवन व्यर्थ आहे” असे तो म्हणाल्यावर,मी त्याला म्हणालो “अरे बाबा,माणूस जेव्हा वैफल्यग्रस्त होतो,मनाने थकतो तेव्हाच अशी भावना त्याच्या मनात डोकावते ,तुला काहीही झालेले नाही” “तू एखाद्या चांगल्या Psychiatrist कडे जा.तसेच माझा एक जवळचा मित्र आध्यात्मिक क्षेत्रात आहे. त्याला मी आताच कॉल करून विचारतो. तू त्याला जॉइन हो” माझ्या त्या मित्राला मी लगेच मोबाईल वरून कॉल करून त्याला 'अमित'बद्दल सर्व सांगितले, त्यावर तो म्हणाला “तो बाजूला असेल तर त्याला फोन दे” तो मित्र अमितशी फोन वरून खूप वेळ बोलत होता. तो ज्या आध्यात्मिक संस्थेत जात आहे.त्या बद्दलची इत्यंभूत माहिती त्याने त्याला दिली आणि त्याने अमितचा मोबाईल नंबर घेतला.अमित आता जरा रिलॅक्स झाल्या सारखा वाटला.मला म्हणाला “रविवारी तुमचे ते मित्र मला त्यांच्या सोबत ‘समर्थ बैठकीला’ घेवून जाणार आहेत” त्यावर मी म्हटले “तू नक्कीच जा, तुला त्यामुळे खूप फरक पडेल” त्या प्रमाणे ‘अमित’ माझ्या मित्रा सोबत त्या बैठकीला नित्यनेमाने जायला लागला त्याने ‘ट्रीटमेंट’सुद्धा सुरू केली. औषधांसोबत आध्यात्मिक 'मनशक्ती'ने अमित मध्ये लक्षणीय फरक पडला. त्याने नंतर कॉल करून मलाजी माहिती दिली ती अशी,
‘समर्थ बैठक’ हॉल खूप मोठा आहे.त्यामध्ये भरपूर लोक बसले होते. हॉल मध्ये पूर्ण शांतता होती. सर्व साधक वेळेवर येवून बसले होते, कोणताही गोंधळ नाही, मोबाईल नाही, फक्त शांतपणे ऐकणारे चेहरे. मी मागच्या बाजूला जाऊन बसलो. तुमचे ते मित्र पुढे बसले. माझे मन भरकटलेले,अस्थिर होते,सुरुवातीला प्रार्थना झाली आणि मग निरूपण सुरू झाले.निरुपणकारांनी एक मनाचा श्लोक म्हणून त्याचा संपूर्ण अर्थ सांगितला आणि पुढे म्हणाले “ माणसाला जीव द्यायची इच्छा ही, त्याची जगायची इच्छा संपली म्हणून नसते,तर ती फक्त मन थकले म्हणून असते.”अमित दचकला. जणू कुणीतरी त्याच्याशीच बोलत होते.“तुम्ही कमकुवत नाही,तुम्ही फक्त एकटे आहात, मनाने थकलेले,भागलेले. आहात ” ते निरुपण ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.“जीवनात कधीच अंधार कायमचा नसतो ,त्यात आपण खूप वेळ थांबलो तर तो अंधार आपल्याला कायमचा वाटतो.”त्या शब्दांनी त्याच्या मनात हलकासा प्रकाश निर्माण झाला. त्याच्या मनात हिंमत आली.मला त्याचे ते बोलणे ऐकून खूप बरे वाटले.
त्या दिवसानंतर 'अमित' नित्यनेमाने 'समर्थ 'बैठकीत जाऊ लागला. सुरुवातीला तो फक्त बसून ऐकायचा, नंतर हळूहळू तेथील इतर साधकांशी तो बोलू लागला. मन मोकळे करू लागला. स्वतःला वेळ देऊ लागला.काही दिवसांनी त्याने आरशात स्वतःकडे पाहिले आणि पहिल्यांदाच स्वतःला हसताना त्याने पाहिले.“मी अजून इथे आहे, म्हणजे माझे कार्य अजून बाकी आहे.” हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले. तो पुन्हा कामात रमू लागला. मित्रांशी बोलू लागला. आणि सर्वात महत्त्वाचे,तो स्वतःला स्वीकारू लागला.
आता पूर्णपणे बदलला होता. तो अजूनही त्या बैठकीत न चुकता जातोय पण आता ऐकण्यासाठी नाही, तर इतरांना उभे करण्यासाठी. कधी कधी माणूस जेव्हा मरायचा विचार करतो तेव्हा तो फक्त जगायचा मार्ग हरवलेला आणि मनाने थकलेला असतो.योग्य शब्द, योग्य विचार त्याला परत जगायला शिकवतात. काही विचारांमध्ये अलौकिक ताकद असते, माणसाला जीवनात कसे जगावे ? कसे वागावे याचे ते सम्यक ज्ञान देते.
काही दिवसांनी,ऑफिस मध्ये खास वेळकाढून मला तो भेटायला आला, तो हसतमुख आणि उत्साही दिसत होता. तो हळूच म्हणाला “साहेब, माझे लग्न ठरले आहे” मी म्हणालो “ वा छान ! तुझ्या मनात लग्नाचा विचार आला, याचाच अर्थ तू आता खऱ्या अर्थाने मनाने आणि शरीराने खंबीर झालेला आहेस, पुढील जीवन अनुभवण्यासाठी”. “शुभम भवतू” म्हणून मी त्याला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तो जाताना म्हणाला “साहेब,माझ्या लग्नाचे जेव्हा मी आमंत्रण देईन तेव्हा तुम्हाला सहपरिवार यावे लागेल” मी म्हणालो “जरूर,नक्की येणार”
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात मनाला शांतता आणि योग्य दिशा देणाऱ्या गोष्टींची गरज अधिक जाणवते. अशा वेळी आपल्या संत परंपरेतील विचार आपल्याला आधार देतात. 'समर्थ रामदास स्वामी' यांचे विचार याच संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहेत.त्यांच्या शिकवणीचा प्रसार आणि आचरण करण्यासाठी ‘श्री बैठक’ तथा ‘समर्थ बैठक’ हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो.समर्थ शिकवण प्रत्यक्ष जीवनात आचरणात कशी आणायची याचे कार्यात्मक उदाहरण म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांची ‘श्री समर्थ सेवा’. या तत्वाद्वारे सामाजिक कार्य केले जाते.समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत समर्थांचे विचार पोहोचविण्याचा या तत्वाचा प्रयत्न असतो.त्याच प्रमाणे त्यांनी समाजात सेवा, शिस्त आणि सदाचार यांचा प्रसार केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी आपले जीवन सकारात्मक दिशेने बदललेले आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवते. स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, व्यसन मुक्ती मोहीम,युवकांना मार्गदर्शन या व अश्या सारख्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे समाजात चांगले संस्कार रुजवले जात आहेत,तसेच समाजात जागरूकता निर्माण केली जात आहे.
या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सेवा भाव. हजारो स्वयंसेवक कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी कार्य करतात. त्या वेळी “समाजाची सेवा हीच ईश्वरसेवा” हा विचार त्यांच्या कामातून स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ही संस्था केवळ धार्मिक कार्यापुरती मर्यादित नसून समाजकल्याणासाठी सजग आणि सक्रियपणे कार्य करते. समर्थ बैठकां द्वारे साप्ताहिक किंवा विशेष दिवसांच्या वेळेला 'समर्थ रामदास स्वामीच्या' विचारांचे सोप्या भाषेत निरुपण केले जाते.
भारतीय संस्कृतीत “गुरू” या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पण ‘सदगुरू’ हा त्याहूनही श्रेष्ठ मानला जातो, कारण तो केवळ ज्ञान देत नाही तर जीवनाला योग्य दिशा देतो. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या “श्री समर्थ सेवा” या संकल्पनेत ‘सदगुरू’चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सदगुरू’ म्हणजे सत्याचा मार्ग दाखवणारा, अज्ञान दूर करणारा आणि शिष्याला योग्य जीवनपद्धती शिकवणारा मार्गदर्शक. ही संकल्पना ‘समर्थ रामदास स्वामी’यांच्या शिकवणीवर आधारित आहे. त्यांनी समाजाला शिस्त, सदाचार आणि भक्ती यांचे महत्त्व पटवून दिले, आणि हाच वारसा पुढे ‘श्री समर्थ सेवा’ मधून जपला जात आहे.
आज गावोगावी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या ‘समर्थ बैठका’आहेत. या समर्थ बैठकांद्वारे मनाचे आरोग्य कसे जपावे ? तसेच सदाचारी विचारांचा समाजाला कितपत उपयोग होईल ? या साठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांनी सन 1 ऑक्टोबर 1943 रोजी त्यांची पहिली ‘समर्थ बैठक’सुरु केली. तेव्हा त्यांचे अनुयायी हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतके म्हणजे इनमिन ‘पाच’अनुयायी होते. लोकोत्तर विभुतींना त्यांच्या समाजोपयोगी कार्यात प्रत्येक वेळी विरोध झालेला आहे. तसाच विरोध नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा झाला होता. असे असताना सुद्धा नानासाहेबांनी हाती घेतलेले आपले कार्य काही थांबविले नाही.शेवटी परिणाम काय झाला ? विरोध करणारे विरोधकच त्यांचे अनुयायी झाले. याला म्हणतात काळाचा महिमा.
समर्थ बैठकांचे बीज पेरले परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांनी, वृक्ष वाढवला, महाराष्ट्र भूषण,पद्मश्री श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी, परमपूज्य 'आप्पासाहेब'सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात ‘ग्राम महसूल अधिकारी’ होते. दिवसभर सरकारी काम आणि संध्याकाळी सर्व लोकांना एकत्र करून समर्थ बैठकीची सुरुवात हा त्यांचा नित्यक्रम होता. पितापुत्रांनी त्यांचा तो उपक्रम नेटाने पुढे नेला.आता त्या डेरेदार वृक्षाच्या संवर्धनाचे काम आप्पासाहेब यांचे चिरंजीव डॉ.श्री. सचिन दादा धर्माधिकारी करत आहेत. स्वतः पेशाने MBBS डॉक्टर असून ते ‘श्री समर्थ बैठक'चळवळ समर्थपणे पुढे नेत आहेत.‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’ही कुणा व्यक्तींची कथा राहिलेली नाही.तर ती आहे,तीन पिढ्यांनी घडवलेली एक समर्थ विचारसरणी. आज या विचारसरणीचे 1 कोटी पेक्षा अधिक साधक आहेत.सदर प्रतिष्ठानचे कार्यक्षेत्र मुख्यतः महाराष्ट्रात जरी असले तरी भारतातील इतर भागांत आणि परदेशातही त्याचा प्रभाव दिसून येतो. अनेक लोक या संस्थेशी जोडले गेले आहेत आणि समाजासाठी ते योगदान देत आहेत.
संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सेवा भाव. त्यांचे हजारो साधक हे स्वयंसेवक भूमिकेतून निरपेक्ष भावाने समाजासाठी कार्य करत असतात. “समाजाची सेवा हीच ईश्वरसेवा” हा विचार त्यांच्या कामातून स्पष्ट दिसून येतो. आजच्या तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक जीवनात 'वैफल्यग्रस्त' हा मनोविकार खूप वाढलाआहे.अशावेळी मानवी मनाला उभारी देणाऱ्या अशा संस्थांची समाजाला विशेष गरज आहे. या संस्था माणसाला केवळ यशस्वी नव्हे, तर चांगला आणि जबाबदार नागरिक सुद्धा बनवतात.
आजच्या आधुनिक युगात समाजाच्या विकासासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून नैतिक मूल्ये, शिस्त आणि सेवा भाव यांचीही तितकीच गरज आहे. अशा वेळी समाजाला योग्य दिशा देणाऱ्या संस्था अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यापैकी 'नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'ही एक प्रभावी सामाजिक-आध्यात्मिक संस्था आहे.
'नानासाहेब धर्माधिकारी' हे ‘समर्थ रामदास स्वामी’ यांच्या शिकवणीचे अनुयायी होते. त्यांनी ‘श्री समर्थ सेवा’ या तत्त्वावर समाजात सेवा, शिस्त आणि सदाचार यांचा प्रसार केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी आपले जीवन सकारात्मक दिशेने बदलले.
शासन दरबारी 'नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या' लोकोपयोगी कार्याची उचित नोंद घेण्यात येऊन जेष्ठ निरुपणकार पद्मश्री श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च आणि मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भर दुपारच्या टळटळीत उन्हाची पर्वा न करता त्यांचे लाखो साधक तो सोहळा ‘याची डोळा, याची देही’ पाहण्यासाठी हजर होते. 'माणूस घडविण्याचे विद्यापीठ’ हे गौरवोद्गार त्या पुरस्कारा दरम्यान काढले गेले.'अप्पासाहेबांच्या' प्रति काढले गेलेले ते गौरवोद्गार अत्यंत सार्थ आहेत.
‘श्री बैठक’ म्हणजेच समर्थ बैठकांमुळे अनेक लोकांची आयुष्य बदलली आहेत,या बाबतच्या तीन लघु कथा या पुष्ठ्यर्थ्य पुढे…
अ ) परतीचे वारे -
माझ्या एका कार्यालयात ‘सुनील शुक्रे’ हा माझा सहाय्यक होता. मुलगा,सालस,सभ्य ,सदाचारी आणि कामसू होता.खरे तर अशा मुलाला समाजात कुणाचा त्रास असेल असे वाटणार सुद्धा नाही परंतु त्याला समाजात नव्हे तर त्याच्या स्वतःच्या कुटुंबात खरा त्रास होत होता.अनेक वर्ष तो त्रास सहन करीत होता परंतु त्याची सहनशीलता प्रचंड असल्याने निमुटपणे तो ते सर्व सहन करायचा. तो मुलगा शांत, सुस्वभावी होता. तर त्याची पत्नी त्याच्या उलट, खाष्ट आणि कजाग होती.ही बाब कुणालाच ,माहित नव्हती. मला सुद्धा तिसऱ्या व्यक्ती कडून ती कळाली. त्याच्या बायकोचे त्याच्या आई बरोबर पटत नव्हते,त्यांची सदानकदा भांडणे व्हायची. त्यांच्या भांडणात बिचारा तो भरडला जायचा. या सर्वाला वैतागून, कधी दारू न पिणारा मुलगा मित्रांच्या संगतीला लागला आणि पक्का दारूबाज झाला. ऑफिस मध्ये सुद्धा तो दारू पिऊन यायला लागला .जवळ उभा राहिला तरी दारूचा भपका यायचा. त्याच्या वर कार्यालयाने कार्यवाही करण्याचे अनेक वेळा ठरवले होते. परंतु प्रत्येक वेळेला आम्ही हस्तक्षेप करून त्याच्यावर होणारी कारवाई थोपवली होती.माझी दुसऱ्या कार्यालयात बदली झाली आणि एक दिवस मला बातमी आली की ‘सुनील शुक्रे’ बेपता झाला आहे. पोलिस तपास सुरू झाला, परंतु त्याचा काही शोध लागेना म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या जागेवर नोकरीचा दावा केला.कार्यालयाने सांगीतले ‘लापता प्रकरण’ असल्याने नियमानुसार ‘सात वर्ष’ बेपत्ता व्यक्तीची वाट पहावी लागेल. तिचा दावा त्या नुसार तूर्त नाकारण्यात आला. घरच्या आणि ऑफिसच्या त्रासाला ‘सुनील’ खूप त्रासला होता. खूप झाले, सहनशक्तीच्या पलीकडे गेले. त्याने पळून जायचा निर्णय घेतला.भुसावळ हे जंक्शन आहे ,तिथून मग पुढे जिकडे वाट फुटेल तिकडे जायचे त्याचे ठरवले.खिशात आठवडाभर पुरेल इतकी कॅश होती.एटीएम कार्ड वापरले तर बायकोला आपला शोध लागेल म्हणून त्याने ते घरीच ठेवले होते. ट्रेनने भुसावळला आल्यावर, त्याला पुढे जायचा कंटाळा आला. आता इथेच थांबायचे त्याने ठरवले.
भुसावळ येथील त्याच्याच विभागाच्या एका ऑफिस मध्ये तो शिरला,त्याला तिथे कोणी ओळखत नव्हते. त्याने सर्व स्टाफची पाहणी केली. कोणता चेहरा आपल्याला मदत करेल ? याची तो चाचपणी करत होता. शेवटी त्यातील एकजण त्याला मदत करेल असे त्याला वाटले म्हणून तो त्याच्या बाजूला जाऊन बसला. “त्याने विचारले काय काम आहे ?” त्याने हळूच त्याची ओळख दिली आणि त्याचे ऑफिसचे ओळख पत्र त्याला दाखवल्यावर त्याचा त्यावर विश्वास बसला मग ‘सुनील’ ने त्याला सर्व त्याची कहाणी सांगितली आता “मला मुंबईला परत जायचे नाही, इथे भुसावळ ,मध्ये तुमच्या ओळखीने मला नोकरी मिळेल का ?” असे त्याने त्याला विचारले त्याने सांगितले “ठीक आहे, संध्याकाळी मला परत भेटा, ऑफिस सुटल्यावर मी तुम्हाला एके ठिकाणी घेऊन जाईन” त्या प्रमाणे ‘सुनील’ त्याला भेटल्यावर, तो संध्याकाळी त्याला एका शाळेत घेऊन गेला. नशिबाने त्यावेळी त्या शाळेचे ‘प्रिन्सिपल’ अजून शाळेत होते. त्याने ‘सुनीलची’ सर्व कहाणी, त्यांना सांगितली “त्याला तुमच्या शाळेच्या ऑफिस मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर काही दिवस कामाला ठेवा” प्रिन्सिपल म्हणाला “ठीक आहे”त्यांनी त्याला शिपाई क्वार्टर ची बाजूची रूम राहायला दिली.शाळेच्या ऑफिस मध्ये तो काम करायला लागला.
त्याच शाळेच्या एका वर्गात भुसावळ मधील ‘श्री सेवक’ दर रविवारी सकाळी महिला आणि संध्याकाळी पुरुष या प्रमाणे जमायचे आणि ‘समर्थ रामदास स्वामीच्या’ श्लोकांचे निरुपण करायचे.प्रार्थना,नामस्मरण,मार्गदर्शन,जीवन उपदेश असा बैठकीचा कार्यक्रम असायचा. सण किंवा विशेष दिवशी सुद्धा त्यांचा हाच कार्यक्रम असायचा.सर्व साधक ‘समर्थ बैठकीला’ भरभरून हजर रहायचे.’सुनील’ हा शाळेचा स्टाफ असल्याने ‘सुनील’ श्री सेवक मंडळी मध्ये सहज एकरूप झाला. आध्यात्मिक आणि सत्शील वातावरणात राहून ‘सुनील’ परत माणसात आला. त्याच्यात मनोधैर्य परत आले, हिंमत वाढली. दारू कायमची सुटली होती. आता त्याला घरची ओढ लागली होती. मुलगा, आईची आठवण येत होती.आता आईला आणि बायकोला सुद्धा मुंबईतील समर्थ बैठकीला घेवून जायचे त्याने मनोमन ठरवून टाकले.’समर्थ बैठकीने’संसारातून उठलेल्या एका माणसाला व्यसनमुक्त करून,सुधारून परत त्याच्या संसारात आणले.
मुंबईला निघताना,'सुनील'ने त्याची सर्व हकीकत उपस्थित साधकांना सांगितली.,सर्व श्री साधकांना वंदन करून, त्यांचे मनःपूर्वक आभार मानून,त्याने भुसावळचा निरोप घेतला आणि तो मुंबईत परतला. माझ्या बदली नंतर सुनीलच्या ऑफिस मध्ये कामानिमित्त मी एकदा गेलो होतो, तेव्हा ‘सुनील’ मला भेटला.पहिल्या पेक्षा आनंदी आणि उत्साही दिसला.त्याला त्या स्थितीत पाहून खूप बरे वाटले.
जनी वंद्य ते सर्व भावे करावे
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे ।
जनी मान्य ते सर्व मानून घ्यावे
जनी अमान्य ते सर्व टाकून द्यावे ॥
जे समाजात आदरणीय (चांगले) आहे, ते मनापासून आचरणात आणावे.
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे,जे वाईट, निंदनीय आहे ते पूर्णपणे सोडून द्यावे.
जनी मान्य ते सर्व मानून घ्यावे, जे योग्य व स्वीकारलेले आहे ते स्वीकारावे.
जनी अमान्य ते सर्व टाकून द्यावे,जे अयोग्य/अस्वीकार्य आहे ते टाळावे.
ब) जिद्द मनाची - साथ 'श्रीसेवकांची' -
माया एक शांत समाधानी सुखवस्तू साधी गृहिणी आहे. घर, संसार, मुले,सगळे काही सुरळीत चालले होते.तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिला सांगण्यात आले की “तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आहे”तो शब्द ऐकताच तिचे हातपाय लटपटले ती मनातून कोलमडली होती.भीती, नैराश्य, आणि एकच विचार,“आता माझे काय होणार? मी आता मरणार”
टाटा हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले,केमोथेरपी, औषधे.खूप त्रासदायक उपचार सुरू होते.शरीरापेक्षा मन हरले होते,तिचे मन खचले होते,एक सारखे मरणाचे विचार येत होते,मरणाचा विचार तिला अस्वस्थ करायचा. ती स्वतःशीच म्हणायची,“मी काही आता वाचणार नाही.”घरच्यांनी तिला खूप धीर दिला, पण ती आतून मात्र तुटत चालली होती,कोसळत होती.केमोथेरपीचे त्रासदायक उपचार संपल्यावर तिला घरी जाण्यासाठी ‘Discharge’ देण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले “तुमची बाजी आता तुमच्याच हातात आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, यातून स्वतःला फक्त आणि फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता,तुम्ही प्रयत्न करा, यातून सहिसलामत बाहेर पडाल” डॉक्टरांचे ते बोलणे तिच्या भावाने ऐकले, तो मायाच्या नवऱ्याला म्हणाला “भावोजी ,मी मायाला , माझ्या कडे ‘पालघरला’ काही दिवस घेऊन जातो, शुद्ध आणि आल्हाददायी वातावरण या मुळे तिच्यात नक्कीच फरक पडेल. मी ‘समर्थ बैठकीला’ जिकडे जातो, तिथे मायाला सुद्धा घेऊन जाईन”, माहेरला जायचे म्हटले की सर्व स्त्रिया खुशीत असतात.तशी 'माया'सुद्धा खुश झाली. तिची वहिनी सुध्दा प्रेमळ होती. वेदना,चिंता,दुःखाच्या स्थितीत माहेरचे नाव काढल्यावर तिच्या वेदनेवर पहिली फुंकर बसली होती. माहेराला जायला मिळेल म्हणून ती मनातून खुश होती.
एक दिवस रविवारी सकाळी तिची वहिनी “प्रीती”तिला समर्थ बैठकीला घेऊन गेली. बैठक एका मध्यम आकाराच्या हॉल मध्ये भरली होती. दरवाजावर ‘समर्थ बैठक’ म्हणून ऍक्रेलिक च्या नावाची छान पाटी होती.आत गेल्यावर स्वच्छ सतरंज्या अंथरल्या होत्या. भिंतीवर गणेश, श्रीराम ,हनुमंत,समर्थ रामदास स्वामी, यांच्या सुन्दर तसबिरी लावलेल्या होत्या. भिंतीवर मोठा देव्हारा होता त्यात ‘सदगुरू श्रीपाद वल्लभ’ यांची दोन हात पुढे दुमडलेली तसबीर होती त्या खाली ‘श्री राम समर्थ ‘ असे लिहिलेले होते.हॉल हवेशीर होता,सुगंधी आणि प्रफुल्लित वातावरण होते.रविवारी सकाळी महिलांसाठी तर संध्याकाळी पुरुषांची साधना असते, रविवार असल्याने सकाळच्या सत्रात अनिकेतची बायको ‘प्रीती’ मायाला घेऊन आली होती..
वहिनी सोबत,माया शांतपणे मागे बसली.मन मात्र भरकटलेले, अस्थिर, भेदरलेले होते.निरुपण अगदी वेळेवर सुरू झाले, त्या अगोदर हॉल साधकांनी पूर्ण भरलेला होता. ते भक्तिमय वातावरण पाहून तिच्या मनात आश्वासकता जागी झाली.प्रार्थना सुरू झाली,त्या प्रार्थनेमुळे तिच्या मनाला उभारी मिळाली, त्या नंतर निरूपण सुरू झाले.निरुपण करणाऱ्या महिला साधक होत्या.त्यांच्या स्पष्ट, धीर गंभीर आणि कर्णमधुर आवाजात त्यांनी म्हटले “आजार शरीराला होतो,पण हार कधी होते तर जेव्हा मन हरते, तेव्हा.” या वाक्याने माया थबकली.“देवाने दिलेले आयुष्य अपूर्ण नाही.आपण संकटा समोर हार मानून त्याला अपूर्ण करतोय. सतत नकारात्मक विचार करून, आपल्या जीवाचे खरे शत्रु आपणच असतो”तिच्या डोळ्यात पाणी आले “लढणे थांबवले की माणूस हरतो,लढत राहिला तर तो जिंकतो”त्या शब्दांनी तिच्या मनात एक ठिणगी पेटली.त्या दिवसानंतर माया नियमित बैठकीत जाऊ लागली.ती स्वतःशी म्हणू लागली.“मी आजाराशी नाही,माझ्या भीतीशी लढतेय.” हळूहळू तिचे मन मजबूत होऊ लागले.
उपचार सुरूच होते पण आता ती रडत नव्हती,ती हसायला लागली.इतर रुग्णांनाही धीर द्यायला लागली.डॉक्टरही म्हणाले,“तुमचा Attitude आता बदललाय, तुम्ही आता फुल पॉझिटिव्ह झालेले आहात, हे उपचाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.”“विजय कशाला म्हणतात? परिस्थितीवर मात करणे कशाला म्हणतात ? हे तुम्ही सर्वांना दाखवून द्यायला लागला आहात” काही महिन्यांनी तिची प्रकृती सुधारू लागली.ती पुन्हा घरी, मुलांमध्ये , संसारात रमू लागली.एक दिवस कोणी तरी विचारले,“तू कशी बरी झालीस ?”ती शांतपणे म्हणाली,“औषधांनी शरीर वाचवले पण समर्थ बैठकीच्या निरूपणाने माझे मन वाचवले,आजार शरीराला होतो,पण जिद्द मनाला बळ देते,आणि तेच खरे उपचार असतात.”
‘पालघर’ वरून परतल्यावर तिने ‘समर्थ बैठक’ काही सोडली नाही. ती मुंबईत ‘मालाड’येथे राहत होती, ती जवळच्या समर्थ बैठकीत जाऊ लागली. आता 'माया ' कडे पाहिले तर ती तरी कधी आजारी होती कां ? हे कुणाला कळणार सुद्धा नाही.ती पहिल्या सारखी झाली आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा समर्थ बैठकीला तिने पाठवायला सुरुवात केली. “सदगुरू सदा सहाय्यते” याची प्रचिती मायाला आली होती.
“जगी सर्व सुखी असा कोण आहे |
विचारी मना तूच शोधुनी पाहे |”
प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख,संकटे असतात परंतु त्याला कसे समोर जायचे हे महत्वाचे आहे.क) ‘तमोहर प्रकाश’
त्या वेळी मी जोगेश्वरी येथे एका कार्यालयात कार्यरत होतो. माझे गोरेगावचे घर तेव्हा हाकेच्या अंतरावर असल्याने एका महत्त्वाच्या कामानिमित्त मला घरी जावे लागत होते.मी पायीच घरी जायला निघालो. तेव्हा शाळा /कॉलेजचे अनेक प्रतिनिधी वेगवेगळ्या कारणास्तव माझ्या कडे कामानिमित्त यायचे. सर्वांशी संबंध चांगले असल्याने कधी कधी त्यातला कोणी तरी एखादा स्वतःचे दुःख माझ्या कडे व्यक्त करायचा, घरी जात असताना मधेच एका शाळेचा प्रतिनिधी ‘अमित डोके’ मला वाटेत भेटला.“बरे झाले साहेब, आज तुम्ही एकटेच आहात ,मला तुमच्याशी खासगी बोलायचे आहे.आमची कामे आपुलकीने करणारे तुम्ही आहात, म्हणून मी तुम्हाला सांगतोय ” असे म्हणून तो थोडावेळ शांत झाला.मी म्हटले, "अरे बोल की मित्रा, असा थांबलास का ? मनात काहीही त्रास देणारे साठवून ठेवायचे नसते, त्याचाच माणसाला जास्त त्रास होतो” असे मी म्हणण्याचा अवकाश लगेच तो भडाभडा बोलायला लागला. “साहेब, मला जीव द्यायचा आहे” त्याने असे म्हणताच, मी जागेवरच उडालो, मन क्षणभर सुन्न झाले होते, मनातच म्हटले “हा असा काय बोलतोय” ? मी शांत होऊन त्याला म्हणालो “तू अगोदर शांत हो” माझ्या हातातली पाण्याची बाटली त्याच्या पुढे केली आणि त्याला म्हटले “अगोदर पाणी पी, मग आपण बोलू “ तो गटागट पाणी प्यायला. मी त्याला शांतपणे म्हटले “आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्या मुळे तू हा अविचार सोडून दे”त्यावर तो म्हणाला,“साहेब, मी जीवनाला इतका वैतागलो आहे, की बस रे बस ! मी जीव देतो, बघाच आता तुम्ही, समोरून येणाऱ्या ट्रक खाली आता मी झोपतो” मी त्याचा हात पकडून ठेवला आणि म्हणालो “अरे मित्रा, मला कशाला तू प्रॉब्लेम मध्ये आणतोयस ? शेवटी क्षणी, तुझ्या बरोबर मी होतो, म्हणून मला जास्त त्रास होईल, आत्महत्या करणे हा पळपुटेपणा आणि वेडेपणा आहे, हे अगोदर लक्षात घे, मानवी जीवन असे सहजच प्राप्त होत नाही.त्या साठी त्या जीवात्म्याला ८४ लाख योनींमधून भ्रमण करावे लागते आणि त्यानंतरच हा मानवी जन्म मिळतो ” मी पुढे म्हणालो “अमित, असे काय झाले तुझ्या जीवनात की तुला जीव द्यावासा वाटतोय ? मला शांतपणे नीट सांग.” मी म्हणालो “तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे आहे. सांग मला”
त्याचे डोळे आत गेले होते, डोळ्या खाली काळेपणा आला होता.आवाजात अनामिक भीती होती,तो बोलायला लागला “ साहेब,नोकरी, घर, मित्र,सगळे काही माझे व्यवस्थित आहे परंतु आतून मी हळूहळू रिकामा होत चाललोय. दिवसा मागून दिवस संपायचे पण त्याचे मला काहीच वाटायचे नाही. रात्री झोपच लागत नाही. झोपते वेळी अनामिक भीती निर्माण होते.दरदरून घाम फुटतो.मी झोपेसाठी वळवळत असतो,छताकडे बघतच मी स्वतःलाच विचारतो,की माझे आयुष्य नेमके कशासाठी आहे?कुणासाठी आहे? मी जन्माला येऊन असे काय केले आहे ?माझे जीवन व्यर्थ आहे” असे तो म्हणाल्यावर,मी त्याला म्हणालो “अरे बाबा,माणूस जेव्हा वैफल्यग्रस्त होतो,मनाने थकतो तेव्हाच अशी भावना त्याच्या मनात डोकावते ,तुला काहीही झालेले नाही” “तू एखाद्या चांगल्या Psychiatrist कडे जा.तसेच माझा एक जवळचा मित्र आध्यात्मिक क्षेत्रात आहे. त्याला मी आताच कॉल करून विचारतो. तू त्याला जॉइन हो” माझ्या त्या मित्राला मी लगेच मोबाईल वरून कॉल करून त्याला 'अमित'बद्दल सर्व सांगितले, त्यावर तो म्हणाला “तो बाजूला असेल तर त्याला फोन दे” तो मित्र अमितशी फोन वरून खूप वेळ बोलत होता. तो ज्या आध्यात्मिक संस्थेत जात आहे.त्या बद्दलची इत्यंभूत माहिती त्याने त्याला दिली आणि त्याने अमितचा मोबाईल नंबर घेतला.अमित आता जरा रिलॅक्स झाल्या सारखा वाटला.मला म्हणाला “रविवारी तुमचे ते मित्र मला त्यांच्या सोबत ‘समर्थ बैठकीला’ घेवून जाणार आहेत” त्यावर मी म्हटले “तू नक्कीच जा, तुला त्यामुळे खूप फरक पडेल” त्या प्रमाणे ‘अमित’ माझ्या मित्रा सोबत त्या बैठकीला नित्यनेमाने जायला लागला त्याने ‘ट्रीटमेंट’सुद्धा सुरू केली. औषधांसोबत आध्यात्मिक 'मनशक्ती'ने अमित मध्ये लक्षणीय फरक पडला. त्याने नंतर कॉल करून मलाजी माहिती दिली ती अशी,
‘समर्थ बैठक’ हॉल खूप मोठा आहे.त्यामध्ये भरपूर लोक बसले होते. हॉल मध्ये पूर्ण शांतता होती. सर्व साधक वेळेवर येवून बसले होते, कोणताही गोंधळ नाही, मोबाईल नाही, फक्त शांतपणे ऐकणारे चेहरे. मी मागच्या बाजूला जाऊन बसलो. तुमचे ते मित्र पुढे बसले. माझे मन भरकटलेले,अस्थिर होते,सुरुवातीला प्रार्थना झाली आणि मग निरूपण सुरू झाले.निरुपणकारांनी एक मनाचा श्लोक म्हणून त्याचा संपूर्ण अर्थ सांगितला आणि पुढे म्हणाले “ माणसाला जीव द्यायची इच्छा ही, त्याची जगायची इच्छा संपली म्हणून नसते,तर ती फक्त मन थकले म्हणून असते.”अमित दचकला. जणू कुणीतरी त्याच्याशीच बोलत होते.“तुम्ही कमकुवत नाही,तुम्ही फक्त एकटे आहात, मनाने थकलेले,भागलेले. आहात ” ते निरुपण ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.“जीवनात कधीच अंधार कायमचा नसतो ,त्यात आपण खूप वेळ थांबलो तर तो अंधार आपल्याला कायमचा वाटतो.”त्या शब्दांनी त्याच्या मनात हलकासा प्रकाश निर्माण झाला. त्याच्या मनात हिंमत आली.मला त्याचे ते बोलणे ऐकून खूप बरे वाटले.
त्या दिवसानंतर 'अमित' नित्यनेमाने 'समर्थ 'बैठकीत जाऊ लागला. सुरुवातीला तो फक्त बसून ऐकायचा, नंतर हळूहळू तेथील इतर साधकांशी तो बोलू लागला. मन मोकळे करू लागला. स्वतःला वेळ देऊ लागला.काही दिवसांनी त्याने आरशात स्वतःकडे पाहिले आणि पहिल्यांदाच स्वतःला हसताना त्याने पाहिले.“मी अजून इथे आहे, म्हणजे माझे कार्य अजून बाकी आहे.” हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले. तो पुन्हा कामात रमू लागला. मित्रांशी बोलू लागला. आणि सर्वात महत्त्वाचे,तो स्वतःला स्वीकारू लागला.
आता पूर्णपणे बदलला होता. तो अजूनही त्या बैठकीत न चुकता जातोय पण आता ऐकण्यासाठी नाही, तर इतरांना उभे करण्यासाठी. कधी कधी माणूस जेव्हा मरायचा विचार करतो तेव्हा तो फक्त जगायचा मार्ग हरवलेला आणि मनाने थकलेला असतो.योग्य शब्द, योग्य विचार त्याला परत जगायला शिकवतात. काही विचारांमध्ये अलौकिक ताकद असते, माणसाला जीवनात कसे जगावे ? कसे वागावे याचे ते सम्यक ज्ञान देते.
काही दिवसांनी,ऑफिस मध्ये खास वेळकाढून मला तो भेटायला आला, तो हसतमुख आणि उत्साही दिसत होता. तो हळूच म्हणाला “साहेब, माझे लग्न ठरले आहे” मी म्हणालो “ वा छान ! तुझ्या मनात लग्नाचा विचार आला, याचाच अर्थ तू आता खऱ्या अर्थाने मनाने आणि शरीराने खंबीर झालेला आहेस, पुढील जीवन अनुभवण्यासाठी”. “शुभम भवतू” म्हणून मी त्याला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तो जाताना म्हणाला “साहेब,माझ्या लग्नाचे जेव्हा मी आमंत्रण देईन तेव्हा तुम्हाला सहपरिवार यावे लागेल” मी म्हणालो “जरूर,नक्की येणार”
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
समर्थांच्या वचन । न मानू नका ॥
मन जर शांत, स्थिर आणि सकारात्मक असेल तर जीवनातील कोणतेही कार्य साध्य होऊ शकते.मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे दुःख वाढते ,विचार बदलले सकारात्मक विचार आले की जीवन बदलते.
"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश जीवन बदलणाऱ्या 3"कथा या मधून समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोकांमधून मिळणारे अमूल्य जीवन ज्ञान तसेच मन शांत, यशस्वी आणि सकारात्मक कसे ठेवावे ? बाबतचे विचार आणि प्रेरणादायी ३ कथा जाणून घेतली असेल आता पुढची लघु कथा आहे.
समाप्त🖋️📖📚
👉🔗 समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकार | शब्दांच्या पलीकडची साधना | सद्गुरू भक्तीच्या प्रेरणादायी 3 कथा
🔗 'प्रेमाचा त्रिकोण -एकतर्फी प्रेम अपूर्ण नाती आणि चुकीच्या निर्णयांची भावनिक मराठी कथा..
“प्रेम असणं महत्त्वाचं आहे पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं त्याहून महत्त्वाचं आहे.” हे आपण वरील कथेत पाहिले असेल..👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )
📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!
नवीन पोस्ट लगेच मिळवा!

अत्यंत प्रेरणादायी आहे. या कथा मनाला शांतता, सकारात्मकता आणि योग्य दिशा देतात. खूप सुंदर मांडणी.
उत्तर द्याहटवासुंदर अभिप्राय!
हटवाधन्यवाद !
हटवाकथा आणि विचार खरोखरच जीवन बदलणारे आहेत. मनाला उभारी देणारी उत्कृष्ट मांडणी.
उत्तर द्याहटवाखूप छान मत मांडले आहे!
हटवाThanx!
हटवाखूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाछान पोस्ट आहे..खूप आवडली
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवाखूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाSadguru karaychi Uttam mandni
हटवामनस्वी धन्यवाद !!
उत्तर द्याहटवा